एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

...तर नोव्हेंबर महिन्याआधी राम मंदिराचा प्रश्न सुटणार

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळातील सर्वात संवेदनशील खटल्याचा निकाल आता दृष्टीक्षेपात आहे. 6 ऑगस्टपासून अयोध्या प्रकरणाची नियमित सुनावणी सुरु होणार असल्याचे आज (2 ऑगस्ट) सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळातील सर्वात संवेदनशील खटल्याचा निकाल आता दृष्टीक्षेपात आहे. 6 ऑगस्टपासून अयोध्या प्रकरणाची नियमित सुनावणी सुरु होणार असल्याचे आज (2 ऑगस्ट) सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. परंतु सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पुन्हा तारीख पे तारीख होत हे प्रकरण लांबणार की तातडीने निकाल लागणार? सध्याचे सरन्यायाधीश रंजन गोगोई हे 17 नोव्हेंबर 2019 ला निवृत्त होत आहेत. सुप्रीम कोर्टाची जी साधारण परंपरा आहे, त्यानुसार ज्या खंडपीठाकडे प्रकरण येतं, त्याच खंडपीठाच्या कालावधीत निकाल लागतो. त्यामुळे 6 ऑगस्टला हे प्रकरण सरन्यायाधीशांचा समावेश असलेल्या खंडपीठाकडे आलं तर त्याचा अर्थ त्यांच्या निवृत्तीआधी खटल्याचा निकाल लागण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टात नियमित सुनावणीसाठी प्रकरण आल्यानंतर साधारणपणे 100 दिवसांत त्याचा निकाल लागतो. केशवानंद भारती केसमध्ये आजवर सर्वात जास्त काळ सुनावणी चालली. कामकाजाच्या 68 दिवसांमध्ये ही सुनावणी पूर्ण झाली होती. त्यानंतर नंबर येतो आधार केसचा, कामकाजाच्या 38 दिवसांमध्ये ही सुनावणी पूर्ण झाली होती. 6 आँगस्ट ते 17 नोव्हेंबर या कालावधीत 72 दिवस येतात. सुनावणी प्रत्येक आठवड्यात मंगळवार, बुधवार आणि गुरुवार अशी होणार आहे. त्यामुळे साधारण सुनावणीचे 40 दिवस सरन्यायाधीशांच्या निवृत्तीआधी खंडपीठाला मिळू शकतात. अयोध्या प्रकरणात 30 सप्टेंबर 2010 रोजी अलाहाबाद हायकोर्टाने निकाल दिला होता. त्यानंतर गेल्या आठ-नऊ वर्षात सर्वोच्च न्यायालयात त्यासंदर्भातली मोठी घडामोड घडलेली नव्हती. त्यामुळे आता 6 ऑगस्टपासून सुरु होणारी ही सुनावणी देशाला अयोध्या प्रश्नावरचं अंतिम उत्तर कधी देते याकडे सगळ्यांचं लक्ष असेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आंबेडकरी समाज 6 डिसेंबरला दु:खात बुडालेला असतो, महायुतीचा 5 डिसेंबरचा शपथविधी पुढे ढकला, 'या' नेत्याची राज्यपालांकडे मागणी
आंबेडकरी समाज 6 डिसेंबरला दु:खात बुडालेला असतो, महायुतीचा 5 डिसेंबरचा शपथविधी पुढे ढकला, 'या' नेत्याची राज्यपालांकडे मागणी
Maharashtra CM : शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Numerology : अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच म्हणणं करतात खरं
अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच करतात खरं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  30 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 30 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines :  6:30 AM : 30 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSpecial Report Eknath Shinde : काळजीवाहू मुख्यमंत्र्यांना कोणती काळजी सतावतेय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आंबेडकरी समाज 6 डिसेंबरला दु:खात बुडालेला असतो, महायुतीचा 5 डिसेंबरचा शपथविधी पुढे ढकला, 'या' नेत्याची राज्यपालांकडे मागणी
आंबेडकरी समाज 6 डिसेंबरला दु:खात बुडालेला असतो, महायुतीचा 5 डिसेंबरचा शपथविधी पुढे ढकला, 'या' नेत्याची राज्यपालांकडे मागणी
Maharashtra CM : शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Numerology : अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच म्हणणं करतात खरं
अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच करतात खरं
Eknath Shinde: भाजपच्या गोटात प्रचंड अस्वस्थता, एकनाथ शिंदेंची गृहखात्याची मागणी सरकार स्थापनेतील अडसर, आता काय घडणार?
भाजपच्या गोटात प्रचंड अस्वस्थता, एकनाथ शिंदेंची गृहखात्याची मागणी सरकार स्थापनेतील अडसर, आता काय घडणार?
Maharashtra Ekikaran Samiti : बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
Waqf Board : काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
AR Rahman Net Worth : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
एआर रहमान : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
Embed widget