एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ऑगस्ट क्रांतीतील रणरागिणी : स्वातंत्र्यलढ्यातील महिलांचं योगदान
या आंदोलनात पुरुषांच्या जोडीला अनेक महिला स्वातंत्र्य सेनानींही सहभाग घेतला होता. परंतु इतिहासाच्या पानावर त्यांचा कुठेही उल्लेख नसला तरीही त्यांच योगदान मोलाचं होतं.
मुंबई : मुंबईत 1942 मध्ये भरलेल्या कॉंग्रेस अधिवेशनात राष्ट्रपिता महात्मा गांधींनी केलेली 'छोडो भारत'ची गर्जना आणि 'करेंगे या मरेंगे'चा दिलेला मंत्र 9 ऑगस्टच्या दिवशी संपूर्ण देशात पसरला होता. या आंदोलनात पुरुषांच्या जोडीला अनेक महिला स्वातंत्र्य सेनानींही सहभाग घेतला होता. परंतु इतिहासाच्या पानावर त्यांचा कुठेही उल्लेख नसला तरीही त्यांच योगदान मोलाचं होतं.
उषा मेहता
भारतातील विविध भागात इंग्रजांविरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलनाला जोर आला होतो. अशावेळी उषा मेहता या 'भारत छोडो' आंदोलनाला आवाज देण्यासाठी भूमिगत रेडिओ स्टेशन चालवत होत्या. खरंतर उषा मेहता या गांधीजींच्या शिष्या होत्या. 1927 मध्ये त्यांची गांधीजींसोबत पहिली भेट झाली आणि स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्याची प्रेरणा मिळाली. ऑगस्ट क्रांती आंदोलनात त्यांचा मोलाचा वाटा होता. भूमिगत रेडिओद्वारे संदेश पाठवण्याचं काम त्या करत होत्या. परंतु त्याची कुणकुण इंग्रजांना लागली आणि तपासणी सुरु झाली. यातच त्यांना अटक होऊन चार वर्षांचा कारावास भोगावा लागला.
अरुणा असफ अली
यासोबत ऑगस्टक्रांती आंदोलनात अरुणा असफ अली यांनी मोलाची कामगिरी बजावली. या चळवळीच्या वेळी अनेक मोठ्या नेत्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर या आंदोलनाची कमान अरुणा असफ अली यांनी सांभाळली. 9 ऑगस्टला त्यांनी इंग्रजांना न जुमानता मुंबईच्या गोवालिया टँकवर तिरंगा फडकवला. या घटनेमुळे इंग्रजांनी अरुणा असफ अली यांना पकडून देण्यासाठी पाच हजार रुपयांच्या बक्षिसाची घोषणी केली. परंतु इंग्रजांचे सर्व प्रयत्न फोल ठरले. याचाच फायदा घेत अरुणा असफ अली भूमिगत झाल्या आणि आंदोलनाला त्यांनी पाठबळ दिलं. स्वातंत्र्यानंतरही त्यांनी देशसेवेची जबाबदारी कायम ठेवली. 1958 मध्ये त्या दिल्लीच्या पहिल्या महापौर म्हणून निवडून आल्या. राष्ट्रसेवासाठी त्यांना पद्मविभूषण आणि भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
मातंगिनी हाजरा
मातंगिनी हाजरा हे एक असं नाव आहे जे भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनात सन्मानाने घेतलं जात. 'भारत छोडो' आंदोलनात त्यांचा मोलाचा सहभाग होता, गांधीजींनी सुरु केलेल्या या आंदोलनात त्यांनी आपल्या वयाचा विचार न करता सहभाग घेतला. या आंदोलनात सहभागी होण्याचा त्यांचा एक उद्देश होता तो म्हणजे स्वातंत्र्य. त्यावेळी 8 डिसेंबरला तामलुकमध्ये झालेल्या एका आंदोलनात पोलिसांच्या गोळीबारात तीन स्वातंत्र्यसेनानी शहीद झाले. याविरोधात जनतेने 19 डिसेंबरला मोठी रॅली काढण्याचा निर्णय घेतला. या रॅलीसाठी मातंगिनी यांनी घरोघरी जाऊन पाच हजार लोकांना सहभागी केलं. हातात तिरंगा घेऊन या रॅलीचं नेतृत्व मातंगिनी करत होत्या. या रॅलीला विरोध करण्यासाठी इंग्रज सरकारकडून गोळीबार करण्यात आला. याच गोळीबारात तीन गोळ्या लागून मातंगिनी शहीद झाल्या आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात अमर झाल्या आहेत.
ताराराणी श्रीवास्तव
बिहारमधील ताराराणी श्रीवास्तव यांचा बालविवाह स्वातंत्र्यसेनानी फुलेंदू बाबू यांच्यासोबत झाला. त्यामुळे आपल्या पतीसोबत त्यांनीही या स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला. 'भारत छोडो' चळवळीमध्ये सहभागी होऊन त्या महिलांचं प्रतिनिधत्व करत होत्या. या चळवळीचा उद्देश होता सिवान ठाण्याच्या छतावरती तिरंगा फडवण्याचा. पोलिसांनी जमावाला थोपवण्यासाठी लाठीचार्ज आणि गोळीबार करण्यास सुरुवात केली. यावेळी फुलेंदू बाबूंनाही गोळी लागली आणि ते खाली कोसळले. ताराराणी यांनी आपल्या पतीच्या जखमेवर साडीने पट्टी बांधली आणि त्या परत चळवळीत सहभागी झाल्या आणि त्यांनी तिरंगा फडकवून आपल्या चळवळीचा उद्देश साध्य केला. पण जेव्हा त्या आपली पतीजवळ परत आल्या तोपर्यंत फुलेंदू बाबू शहीद झाले होते. त्यानंतरही ताराराणी श्रीवास्तव स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होऊन देशासाठी लढत राहिल्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement