एक्स्प्लोर

दुपारनंतर ATM सुरु होण्याची चिन्हं, बँकांंसमोर रांगा

मुंबई: नरेंद्र मोदी सरकारच्या नव्या अर्थक्रांतीला सामान्यांनी पाठिंबा दिला असला, तरी आता मात्र तेच सामान्य लोक, आर्थिक व्यवहार ठप्प झाल्यानं मेटाकुटीला आले आहेत. आज सकाळपासून एटीएम सुरु होणार असल्याचा वादा खुद्द मोदींनी आणि बँकांनी केला होता. पण राज्यभरातल्या एटीएमचे शटर आजही डाऊन असल्यानं लोकांची पंचाईत झाली आहे.  आज दुपारनंतर एटीएममधून पैसे काढता येऊ शकतील. नोटा बदलण्यासाठी 5 सोप्या टिप्स काल रात्रभर एटीएममध्ये पैसे भरण्याचं काम सुरु होतं. पण ते काम आजही सुरु राहिल्यानं एटीएममधून पैसे काढताच येत नाहीत. तुमच्या ATM वरुन किती पैसे काढू शकाल? या सगळ्याचा थेट परिणाम बँकांच्या सेवांवर झाला आहे. कारण एटीएममध्ये पैसे न मिळालेले ग्राहक पैसे काढण्यासाठी बँकांसमोर जाऊन रांगेत उभे आहेत. तर दुसरीकडे नोटा बदलण्यासाठीच्या रांगाही वाढत चालल्या आहेत. त्यामुळे वीकेन्डच्या तोंडावर झालेल्या आर्थिक उपवासामुळे ग्राहक मेटाकुटीला आले आहेत. दरम्यान असं असलं, तरी शनिवार आणि रविवार काम सुरु ठेऊन बँकांनीही सामान्य ग्राहकांना सेवा पुरवण्याची हमी दिली आहे. जुन्या नोटांनी बिलं भरा दुसरीकडे पेट्रोलपंप, टोल, एसटी प्रवास, वीज बिल यासाठी केवळ आजच जुन्या नोटा तुम्हाला वापरता येणार आहेत. कारण, सरकारनं याठिकाणी जुन्या नोटा स्वीकारण्यासाठी जी मुदत दिली होती. ती आज मध्यरात्रीनंतर संपते आहे. त्यामुळे उद्यापासून तुम्हाला तुमच्याकडच्या पाचशे आणि हजाराच्या नोटा बदलून घ्यायच्या असतील, तर केवळ बँक आणि पोस्ट ऑफिस हे दोनच एकच पर्याय तुमच्याकडे शिल्लक असणार आहे. वाद होऊ नयेत, म्हणून मुंबई पेट्रोलपंप असोसिएशननं मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत पेट्रोलपंप बंद ठेवण्याचाही निर्णय घेतला आहे. त्यामुळे तुमच्याकडच्या जुन्या नोटांच्या माध्यमातून तुम्हाला वीज, संपत्ती कर, वा पाणीपट्टी अशी बिलं भरायची असतील, तर ती आजच भरणं गरजेचं आहे. बँकांचा निर्णय ग्राहकांचा त्रास कमी करण्यासाठी बँकांनी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललंय. 31 डिसेंबरपर्यंत ग्राहकांकडून एटीएमच्या ट्रॅन्झॅक्शनवर कोणतंही अतिरिक्त शुल्क न आकारण्याचा निर्णय झाला आहे. सध्या आयसीआयसीआय, पंजाब नॅशनल, आयडीबीआय बँकेनं हा निर्णय घेतला आहे. याशिवाय इतर बँकाही या निर्णयाचं अनुकरण करण्याची शक्यता आहे. आतापर्यंत महिन्याभरात एटीएमवर 5 ट्रॅन्झॅक्शन मोफत होते. मात्र आता ग्राहकांना 31 डिसेंबरपर्यंत कितीही वेळा ट्रॅन्झॅक्शन करता येणार आहे.  ज्यावर कोणतंही शुल्क नसेल. बँक  आणि पोस्ट ऑफिस तुमचं खातं असलेल्या कोणत्याही बँकेत, कोणत्याही शाखेत 30 डिसेंबरपर्यंत दिवसाला 4 हजार रुपयांपर्यंतच्या नोटा बदलून घेता येतील. पण त्यासाठी रिझर्व्ह बँकेने जारी केलेला फॉर्म भरून द्यावा लागेल. केवळ पैसे बदलण्यासाठीच हा फॉर्म भरावा लागेल. तुमच्या खात्यात पैसे भरायचे असतील, तर या फॉर्मची गरज नाही. पैसे बदलण्यासाठी पॅन कार्ड आणि आधारकार्ड किंवा मान्यताप्राप्त ओळखपत्र सोबत असणं आवश्यक आहे. समजा तुमच्याकडे 500 रुपयाच्या 20 नोटा म्हणजे 10 हजार रुपये असतील, तर त्यापैकी 4000 रुपयेच एका दिवसात बदलून मिळतील. म्हणजे तुमच्याकडच्या 500 रुपयाच्या 8 नोटाच बँकेत/पोस्टातून एका दिवसात बदलून घेता येऊ शकतील. परत दुसऱ्या दिवशी हीच प्रक्रिया असेल. पण तुम्ही तुमच्या खात्यावर कितीही रक्कम भरू शकता. केवळ बदलून घेण्यासाठीच 4 हजार रुपयांची ही मर्यादा असेल. 10 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबरपर्यंत दिवसाला 4 हजार रुपये तुम्ही बदलून घेऊ शकता. त्यानंतर यामध्ये वाढ होईल. पैसे बदलण्यासाठी मर्यादा, मात्र अकाऊंटमध्ये भरण्याला नाही बँकेतून पैसे बदलून घेण्यासाठी मर्यादा आहेत, मात्र तुमच्याकडे 500 किंवा हजार रुपयाच्या कितीही नोटा असतील, तर त्या डिपॉझिट करण्यासाठी किंवा खात्यावर भरण्यासाठी मर्यादा नाही. त्यामुळे तुमच्याकडील सर्व पैसे तुमच्या खात्यावर भरल्यास काहीही अडचण नाही. खात्यावरुन किती पैसे काढू शकाल? तुम्ही तुमच्या खात्यावरील दिवसाला 10 हजार रुपये आणि आठवड्याला 20 हजारपर्यंतची रक्कम काढू शकाल. समजा तुम्ही उद्या 8 हजार रुपये काढले, तर तुम्हाला आठवडाभरात 12 हजार रुपयेच काढता येतील. पण प्रत्येकवेळी तुम्हाला दहा हजारची मर्यादा असेल.(त्यामुळे 12 हजार काढायचे असतील तर दहा हजार निघतील, त्यानंतर दुसऱ्या दिवशी दोन हजार काढावे लागतील) त्यानंतर पुढच्या आठवड्यात पुन्हा 20 हजार रुपये काढता येतील. ही मर्यादा नोटांचा पुरेसा साठा उपलब्ध होईपर्यंत असेल. त्यानंतर कोणतीही मर्यादा नसेल. प्रत्येक एटीएमवरुन दिवसाला 2 हजार रुपयांची मर्यादा तुमच्या अकाऊंटवर कितीही रुपये असले तरी एटीएमवरुन तुम्ही दिवसाला एका कार्डवरुन 2 हजार रुपयेच काढू शकाल. 18 नोव्हेंबरपर्यंत ही मर्यादा असेल.त्यानंतर ही मर्यादा 4 हजारपर्यंत वाढवण्यात येईल. ही मर्यादा नोटांचा पुरेसा साठा उपलब्ध होईपर्यंत असेल. त्यानंतर कोणतीही मर्यादा नसेल.

संबंधित बातम्या

बँकेत पैसे जमा करताच थेट आयकर विभागाला माहिती पश्चिम रेल्वेच्या फर्स्ट, सेकंड एसी वेटिंग तिकिटांवर बंदी कर्नाटकच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना कर्ज वाटल्यामागचं व्हायरल सत्य लाचखोर अधिकाऱ्याचेही चोचले, शंभरच्याच नोटा देण्याची तंबी एक हजाराची नवी नोट लवकरच येणार!, अर्थ मंत्रालयाची माहिती नोटा बदलण्यासाठी 5 सोप्या टिप्स बँकेकडून 100 ऐवजी, 10, 20 किंवा चिल्लरही हातात येऊ शकते! बँक, पोस्ट ऑफिसमध्ये जुन्या नोटा बदलून मिळणार सर्व बँका गुरुवारी एक तास आधी सुरु, शनिवार-रविवारीही सुट्टी नाही सर्व रुग्णालयांनी 500 आणि 1000 च्या नोटा स्वीकारणं बंधनकारक मुंबईत सुट्ट्या पैशांसाठी नागरिकांची दलालांकडून लूट मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही मुंबई मेट्रो प्रशासनाची मुजोरी कायम नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचं स्वागत : पवार 500, 1000 च्या नोटांसंबंधीच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नोटा रद्द करण्याच्या निर्णयानंतर सोन्याचा दर वधारला एकच फाईट, वातावरण टाईट, सोशल मीडियावर विनोदांची त्सुनामी टोलनाका, एटीएम, पेट्रोल पंपावर गर्दी, सामान्यांना मनस्ताप आरबीआयकडून 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटांची झलक देशभरातील सर्व एटीएम आज बंद, बँकांचे व्यवहारही ठप्प कधीपर्यंत 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा जमा करता येणार? 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा कुठे जमा करता येणार? 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा अन् मी एकमेकांचे चेहरे पाहत होतो, पण खचायचं नाही हे ठरवलं: प्रफुल पटेल
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Jalgaon Crime: धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यातDhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..Hasan Mushrif Washim : श्रद्धा-सबुरी ठेवली पाहिजे, वाशिम पालकमंत्री पदावरून मुश्रीफ म्हणाले...Chhagan Bhujbal : जे काही काम करू शकत नाही त्यांचे बदल झाले पाहिजे :छगन भुजबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा अन् मी एकमेकांचे चेहरे पाहत होतो, पण खचायचं नाही हे ठरवलं: प्रफुल पटेल
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Jalgaon Crime: धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Nitesh Rane : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
Mumbai High Court : ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मनु भाकरच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, मायेची सावली हरपली; रस्त्यावरील भीषण अपघातात आजी अन् मामाचा मृत्यू
मनु भाकरच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, मायेची सावली हरपली; रस्त्यावरील भीषण अपघातात आजी अन् मामाचा मृत्यू
Embed widget