Asteroid : पृथ्वीच्या दिशेने पुढे सरकतोय धोकादायक ॲस्टरॉयड , दोन विमानांएवढा मोठा आकार; नासाने दिली माहिती
Asteroid News : पृथ्वीच्या दिशेने एक मोठं संकट पुढे सरकत आहे. या लघुग्रहाची पृथ्वीसोबत टक्कर झाल्यास काय होईल.
![Asteroid : पृथ्वीच्या दिशेने पुढे सरकतोय धोकादायक ॲस्टरॉयड , दोन विमानांएवढा मोठा आकार; नासाने दिली माहिती asteroid coming towards earth what will happen if it hits or collides World Marathi news Asteroid : पृथ्वीच्या दिशेने पुढे सरकतोय धोकादायक ॲस्टरॉयड , दोन विमानांएवढा मोठा आकार; नासाने दिली माहिती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/07/701002d8bb681675688f3ef76ceff6451715081208054785_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : अंतराळात (Space) अनेक ग्रह, तारे, उल्का यासोबतच इतरही अनेक गोष्टी आहेत. अंतराळात मोठ-मोठ्या आकाराचे अनेक उल्काही (Meteor) आहे. हे ग्रह (Planet) आणि उल्कापिंड (Meteorite) अंतराळात फिरत असतात. कधी-कधी यांची एकमेकांसोबत टक्कर होण्याची भीतीही असते. सध्या असंच एक संकट पृथ्वीच्या दिशेने पुढे सरकत आहे. पृथ्वीच्या दिशेने एक मोठा ॲस्टरॉयड (Asteroid News) म्हणजेच लघुग्रह पुढे सरकत आहे.
पृथ्वीच्या दिशेने पुढे सरकतोय धोकादायक ॲस्टरॉयड
एक मोठा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने पुढे सरकत आहे. पृथ्वीसाठी हा धोका मानला जात आहे. या लघुग्रहाचा आकार दोन विमानाएवढा असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे हा लघुग्रह पृथ्वीजवळ येत असून या दोघांची टक्कर झाल्यास मोठी आपत्ती येऊ शकते. अमेरिकन अंतराळ संसोधन संस्था नासाने याबाबत मोठी माहिती दिली आहे.
नासाने दिली मोठी माहिती
मीडिया रिपोर्टनुसार, सध्या पृथ्वीच्या दिशेने एक विशाल लघुग्रह पुढे सरकत आहे. या लघुग्रहाचा आकार इतका विशाल आहे की, यामध्ये दोन विमाने सहज मावतील. नासाने या लघुग्रहाला 2024 FH2 असं नाव दिलं आहे. नासाने दिलेल्या माहितीनुसार, 2024 FH2 हा लघुग्रह 3.8 मिलियन मैल अंतरावरुन जाणार आहे. हा ॲस्टरॉयड पृथ्वीवर आदळण्याचा धोका नाही. त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही.
हेही वाचा : NASA Psyche Mission : पृथ्वीवरील गरीबी एका झटक्यात होईल नष्ट, 'या' लघुग्रहावर नासा अंतराळात खास मोहिम पाठवणार
लघुग्रह पृथ्वीवर आदळल्यास काय होईल?
सुमारे 65 दशलक्ष वर्षांपूर्वी एक लघुग्रह पृथ्वीवर आदळला होता, ज्यामुळे डायनासोर नष्ट झाले होते, असं सांगितलं जातं. त्यावेळी पृथ्वीवर डायनासोर राज्य करत होते, पण लघुग्रहामुळे सर्व काही नष्ट झाले होते, असं बोललं जातं. आता मानव पृथ्वीवर आहे. अशा परिस्थितीत एखादा लघुग्रह पृथ्वीवर आदळला तर तीच परिस्थिती पु्न्हा उद्भवू शकते.
अंतराळातील घटनांवर नासाचं लक्ष
लाखो वर्षांपूर्वी पृथ्वीवर लघुग्रह आदळल्याचं म्हटलं जातं. पृथ्वीवर लघुग्रह आदळण्याची घटना पुन्हा घडू नये, यासाठी नासा दररोज या लघुग्रहांचा मागोवा घेत अंतराळातील घडामोडींवर लक्ष ठेवते. तसेच, जर कधी लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याची परिस्थिती निर्माण झाली, तर लघुग्रह पृथ्वीवर आदळण्यापूर्वी त्याची दिशा अंतराळयानाद्वारे वळवली जाऊ शकते. ज्यामुळे तो पृथ्वीवर आदळणार नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
काय सांगता? शास्त्रज्ञांनी पृथ्वीवरच बनवला कृत्रिम मंगळ ग्रह, 4 वर्षानंतर राबवणार 'मिशन
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)