एक्स्प्लोर

NASA Psyche Mission : पृथ्वीवरील गरीबी एका झटक्यात होईल नष्ट, 'या' लघुग्रहावर नासा अंतराळात खास मोहिम पाठवणार

NASA Asteroid Psyche Mission : नासा आता सायकी उल्कापिंडावर खास मोहिम पाठवणार आहे. ही लघुग्रह पृथ्वीवरील एकूण संपत्तीपेक्षाही जास्त मौल्यवान आहे.

NASA Psyche Mission : अंतराळात अद्यापही अनेक रहस्य दडलेली आहेत. यासाठी जगभरातील देश विविध संशोधन करत आहेत. आता नासा आणखी एका मोहिमेसाठी सज्ज झाला आहे. नासाने अंतराळातील सोन्याचा साठा शोधला असून तेथे आता मोहिम पाठवण्याची तयारी सुरु आहे. मंगळ आणि गुरू यांच्यातील एका लघुग्रहाकडे सध्या जगाच्या नजरा लागल्या आहेत. हा लघुग्रह 16 सायकी या नावाने ओळखलं जात आहे.

नासा अंतराळात खास मोहिम पाठवणार

16 सायकी हा लघुग्रह मौल्यवान धातूंपासून बनलेला आहे. काही महिन्यांआधीच अमेरिकन अंतराळ संस्था नासाने या लघुग्रहावर मौल्यवान धातूंचा साठा असल्याचा दावा केला होता. हा मौल्यवान साठा मानवाच्या हाती लागल्यास संपूर्ण पृथ्वीवर सर्वजण अब्जाधीश होतील. हे उल्कापिंड मौल्यवान धातू आणि खनिजांपासून बनलेलं आहे. शास्त्रज्ञांच्या मते, या लघुग्रहाची किंमत पृथ्वीवरील सर्व एकूण संपत्तीपेक्षा कितीतरी पटीने जास्त मौल्यवान असू शकते.

मौल्यवान धातूंपासून बनलेला उल्कापिंड

नासा आपल्या सूर्यमालेत असलेल्या या मौल्यवान धातूच्या लघुग्रहावर संशोधनासाठी एक अवकाशयान पाठवणार आहे. शास्त्रज्ञांच्या मते, सायकी नावाचं या लघुग्रहाचा संबंध इतर ग्रहांच्या निर्माणाशी असू शकते. यामुळे सूर्यमालेतील रहस्य उलगडण्यास मदत होणार आहे. हा लघुग्रह मंगळ आणि गुरू ग्रह यांच्या दरम्यान असलेल्या लघुग्रहांच्या पट्ट्यात आहे. हा लघुग्रह पूर्णपणे धातूपासून बनलेला आहे. नासा सायकी लघुग्रहावर अंतराळयान पाठवणार आहे. याआधी, नासाने पृथ्वीच्या जवळ असलेल्या आणि पृथ्वीसाठी धोका ठरू शकणार्‍या बेन्नू लघुग्रहासंदर्भात एक मोहीम राबवली होती.

अंतराळात कुठे सापडली 'सोन्याची खाण'?

मंगळ आणि गुरू यांच्यामध्ये 16 Psyche नावाचा लघुग्रह आहे. बटाट्याच्या आकाराचा हा लघुग्रह सोने, मौल्यवान धातू प्लॅटिनम, लोखंड आणि निकेलपासून बनलेला असल्याचं सांगितलं जात आहे. सोन्यापासून बनवलेल्या या लघुग्रहाचा व्यास सुमारे 226 किमी आहे. या लघुग्रहावर भरपूर लोह असल्याचा शास्त्रज्ञांचा दावा आहे. 

बटाट्याच्या आकाराचा लघुग्रह 

इटालियन खगोलशास्त्रज्ञ अॅनिबेल डी गॅस्परिस यांनी 17 मार्च 1852 रोजी सायकी या लघुग्रहाचा शोध लावला. हा लघुग्रह सौरमालेतील सर्वात मोठ्या धातूच्या लघुग्रहांपैकी एक आहे. नासाच्या मते, हा लघुग्रह बटाट्याच्या आकाराचा आहे. त्याची कमाल रुंदी 280 किमी आणि लांबी 232 किमी आहे. सेंट्रल फ्लोरिडा विद्यापीठातील एक्सोलिथ प्रयोगशाळेचे विज्ञान सल्लागार डॉ. जो लँड्समन म्हणाले की, सायकी लघुग्रह लोह, निकेल आणि इतर धातूंनी बनलेला असल्याचं रडार आणि दुर्बिणीच्या निरीक्षणातून दिसून आलं आहे. 

महत्वाच्या इतर बातम्या :

16 Psyche Asteroid : अंतराळात सापडली 'सोन्याची खाण', नासानं आणखी एक रहस्य उलगडलं; ...तर पृथ्वीवरील प्रत्येकजण होईल अब्जाधीश

महत्त्वाच्या बातम्या

Pakistan Blast: पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
इंडोनेशियातील मदुरा बेटाजवळ जहाजाला आग, 5 जणांचा मृत्यू, तर 41 जण बेपत्ता, 225 जणांना वाचवण्यात यश
इंडोनेशियातील मदुरा बेटाजवळ जहाजाला आग, 5 जणांचा मृत्यू, तर 41 जण बेपत्ता, 225 जणांना वाचवण्यात यश
CWG 2026: 'ईशान्य भारत अन् काश्मीर गायब'; ग्लासगोतील रेस्टॉरंटच्या नॅपकिनवर भारताचा अपूर्ण नकाशा, स्टार बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन आणि BFI चा तीव्र आक्षेप
'ईशान्य भारत अन् काश्मीर गायब'; ग्लासगोतील रेस्टॉरंटच्या नॅपकिनवर भारताचा अपूर्ण नकाशा, स्टार बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन आणि BFI चा तीव्र आक्षेप
Middle East Crisis: 'मिडल ईस्ट सोडा', अमेरिकेकडून नागरिकांना महत्त्वाचा अलर्ट, इराणसोबतच्या तणावात मोठा भडका उडणार?
'मिडल ईस्ट सोडा', अमेरिकेकडून नागरिकांना महत्त्वाचा अलर्ट, इराणसोबतच्या तणावात मोठा भडका उडणार?

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
Embed widget