एक्स्प्लोर

Assam Flood : आसाममध्ये पावसानं हाहाकार; 20 जिल्हे पाण्याखाली, अनेक ठिकाणी भूस्खलन

Assam Flood : आसाममध्ये संततधार पावसामुळे 20 जिल्ह्यांतील सुमारे दोन लाख लोकसंख्या प्रभावित झाली आहे. दिमा हासाओ जिल्ह्यातील डोंगराळ भागात भूस्खलनामुळे रेल्वे आणि रस्ते संपर्क तुटले आहेत.

Assam Flood : उत्तर भारतात सातत्यानं उष्णतेच्या झळा वाढताना दिसत आहेत. संपूर्ण उत्तर भारत उष्णतेच्या लाटेचा सामना करत आहे. पण आसाममध्ये मात्र पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. आसाममध्ये सातत्यानं कोसळणाऱ्या पावसामुळे पूर आला असून भूस्खलनाची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे आसामच्या 20 जिल्ह्यांमध्ये जवळपास 2 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. सोमवारी प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेल्या माहितीनुसार, दिमा हासाओ (Dima Hasao) जिल्ह्यातील डोंगराळ प्रदेशात भूस्खलनामुळे रेल्वे आणि रस्ते संपर्क तुटल्यानं त्याचा उर्वरित राज्याशी संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. 

प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार, आसामच्या कछार (Cachar) जिल्ह्यात पुरामुळे दोन मृत्यूची नोंद झाली आहे, तर दिमा हासाओमध्ये भूस्खलनामुळे तीन मृत्यूची नोंद झाली आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एएसडीएमए) च्या वतीनं देण्यात आलेल्या माहितीनुसार, पुराचा जवळपास 1,97,248 लोकांना फटका बसला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. ज्यामध्ये प्रामुख्यानं होजई (Hojai) आणि कछार (Cachar) मधील क्रमशः 78,157 आणि 51,357 लोकांना फटका बसला आहे. 

प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेल्या अधिकृत माहितीनुसार, 20 जिल्ह्यांतील 46 महसूल मंडळातील एकूण 652 गावांना आतापर्यंत पावसाचा फटका बसला आहे. यासोबतच पूरग्रस्त भागातून बाहेर काढण्यात आलेल्या लोकांना सात जिल्ह्यांमध्ये उभारण्यात आलेल्या सुमारे 55 मदत शिबिरांमध्ये हलवण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत एकूण 32,959 लोकांना आश्रय देण्यात आला आहे. त्याचसोबतच, बाधित भागांत 12 मदत वितरण केंद्रं देखील स्थापन करण्यात आली आहेत.

आसाममध्ये पावसानंतर आलेल्या पुरानंतर एनडीआरएफ आणि एसडीआरएफ, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकं घटनास्थळी रवाना झाली आहेत. पुरात अडकलेल्या लोकांसाठी बचाव कार्य सुरु करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत अनेक जिल्ह्यांमध्ये 16 ठिकाणी बंधारे तुटल्याची माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे अनेक भागात रस्ते, पूल आणि घरांचे अंशत: नुकसान झाले आहे.

सध्या पुरामुळे दिमा हासाओ येथील कम्युनिकेशन चॅनल बंद करण्यात आलं आहे. "भूस्खलनामुळे जिल्ह्याबाहेरून संपर्क साधता येत नाही. हाफलाँगकडे जाणारे सर्व रस्ते आणि रेल्वे मार्ग 15 मे पासून ब्लॉक करण्यात आले आहेत," असं बुलेटिनमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, गुवाहाटी येथील ईशान्य फ्रंटियर रेल्वे (NFR) च्या रिलीझनं सांगितले की, दिमा हासाओमधील लुमडिंग-बदरपूर सेक्शनवर गेल्या दोन दिवसांपासून भूस्खलन आणि रुळांवर पाणी साचल्यामुळे अडकलेल्या दोन गाड्यांमधील सुमारे 2,800 प्रवाशांना वाचवण्याचे काम सोमवारी सुरू होतं, ते पूर्ण झालं असून सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Marathwada: 'दुष्काळी' मराठवाड्यावर आभाळमाया! आठही जिल्ह्यांत पावसाने शंभरी ओलांडली, कुठे किती झाला पाऊस?
'दुष्काळी' मराठवाड्यावर आभाळमाया! आठही जिल्ह्यांत पावसाने शंभरी ओलांडली, कुठे किती झाला पाऊस?
Mumbai Local :मुंबईकरांसाठी मोठी बातमी, सलग पाच दिवस पश्चिम रेल्वेवरील 150 लोकल रद्द होणार, जाणून घ्या नेमकं कारण...
मोठी बातमी, पश्चिम रेल्वेवरील 150 लोकल 4 ऑक्टोबरपर्यंत रद्द, जाणून घ्या कारण...
Maharashtra Assembly Election 2024: भाजपच्या संजय कुटेंविरोधात वंचितचा डाव, जळगाव जामोदमधून डॉ.प्रवीण पाटील रिंगणात?
भाजपच्या संजय कुटेंविरोधात वंचितचा डाव, जळगाव जामोदमधून डॉ.प्रवीण पाटील रिंगणात?
IIFA 2024 अवॉर्ड्सनंतर व्हायरल होतोय अभिषेक-ऐश्वर्याचा Unseen Video; दोघांमध्ये सगळं ठीक? चिंतेनं चाहते हैराण!
IIFA 2024 अवॉर्ड्सनंतर व्हायरल होतोय अभिषेक-ऐश्वर्याचा Unseen Video; दोघांमध्ये सगळं ठीक? चिंतेनं चाहते हैराण!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 30 सप्टेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 30 सप्टेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सVijay Wadettiwar on  Dharamrao Baba Atram : आत्रम यांच्या मुलीचा पराभव होईल - विजय वडेट्टीवारShaikh Subhan Ali :

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Marathwada: 'दुष्काळी' मराठवाड्यावर आभाळमाया! आठही जिल्ह्यांत पावसाने शंभरी ओलांडली, कुठे किती झाला पाऊस?
'दुष्काळी' मराठवाड्यावर आभाळमाया! आठही जिल्ह्यांत पावसाने शंभरी ओलांडली, कुठे किती झाला पाऊस?
Mumbai Local :मुंबईकरांसाठी मोठी बातमी, सलग पाच दिवस पश्चिम रेल्वेवरील 150 लोकल रद्द होणार, जाणून घ्या नेमकं कारण...
मोठी बातमी, पश्चिम रेल्वेवरील 150 लोकल 4 ऑक्टोबरपर्यंत रद्द, जाणून घ्या कारण...
Maharashtra Assembly Election 2024: भाजपच्या संजय कुटेंविरोधात वंचितचा डाव, जळगाव जामोदमधून डॉ.प्रवीण पाटील रिंगणात?
भाजपच्या संजय कुटेंविरोधात वंचितचा डाव, जळगाव जामोदमधून डॉ.प्रवीण पाटील रिंगणात?
IIFA 2024 अवॉर्ड्सनंतर व्हायरल होतोय अभिषेक-ऐश्वर्याचा Unseen Video; दोघांमध्ये सगळं ठीक? चिंतेनं चाहते हैराण!
IIFA 2024 अवॉर्ड्सनंतर व्हायरल होतोय अभिषेक-ऐश्वर्याचा Unseen Video; दोघांमध्ये सगळं ठीक? चिंतेनं चाहते हैराण!
CM Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांचाही आनंद दिघेंप्रमाणे घात करण्याचा डाव होता, शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा
एकनाथ शिंदे यांचाही आनंद दिघेंप्रमाणे घात करण्याचा डाव होता, शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
Khatron Ke Khiladi 14: करण वीर मेहरा ठरला खतरों के खिलाडी 14 चा विजेता; नव्याकोऱ्या कारसह, लाखोंच्या प्राईज मनीचा ठरला मानकरी
करण वीर मेहरा ठरला खतरों के खिलाडी 14 चा विजेता; नव्याकोऱ्या कारसह, लाखोंच्या प्राईज मनीचा ठरला मानकरी
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
Embed widget