एक्स्प्लोर
Asian Paints | मनोबल वाढावं म्हणून एशियन पेंट्सने कर्मचाऱ्याचं वेतन वाढवलं
कोरोनामुळं अर्थव्यवस्था आणि रोजगारावर मोठा परिणाम झाला आहे. एशियन पेंट्सनं कोरोना संकटात कामगारांचं वेतन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
नवी दिल्ली : एशियन पेंट्स कंपनीने कर्मचाऱ्यांच्या पगारी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांचं मनोबल वाढवण्याच्या दृष्टीने कंपनीने हा निर्णय घेतला आहे. एशियन पेंट्स याआधीच कंपनी केंद्र आणि राज्य सरकारच्या कोविड-19 फंडामध्ये 35 कोटी रुपयांची मदत केली आहे. कोरोनाविरोधातील या लढाईच कंपनीकडून वेगवेगळ्या पद्धतीनं मदत केली आहे.
कोरोनामुळं अर्थव्यवस्था आणि रोजगारावर मोठा परिणाम झाला आहे. मात्र एशियन पेंट्सनं कोरोना संकटात देखील कंपनीतील कामगारांची कपात तसंच त्यांच्या वेतनात कपात करण्याऐवजी त्यांचं वेतन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
कंपनीचं म्हणणं आहे की, यामुळं कर्मचाऱ्यांचं मनोबल वाढेल. कंपनीने विक्रेत्यांना मदत करण्याचा निर्णय देखील घेतला आहे. विक्री चॅनेलचा भाग असलेल्या ठेकेदारांच्या खात्यात कंपनीने 40 कोटी रुपये ट्रांसफर केले आहेत. कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर अमित शिंगले म्हणतात 'आम्हाला खऱ्या नेतृत्वाचं आदर्श उदाहरण द्यायचं आहे. एक संस्था म्हणून आम्ही आमच्या हितचिंतकांची काळजी घेत आहोत, हे आम्हाला सिद्ध करायचं आहे. मी आमच्या बोर्डाला देखील अशा निर्णयांबाबत कळवत असतो. बोर्ड सदस्यांनी देखील कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या निर्णयाला सहमती दर्शवली आहे.'
शिंगले यांचं म्हणणं आहे की, कोरोना संकटाचा हा काळ कर्मचाऱ्यांच्या जवळ जाण्याची एक चांगली संधी आहे. अनिश्चित असलेल्या या मार्केटमध्ये कर्मचाऱ्यांच्या चिंतांचं समाधान करणं आमची प्राथमिकता आहे. आम्ही कर्मचाऱ्यांना ठेवा किंवा काढून टाका या तत्वावर विश्वास ठेवत नाहीत. आम्ही एक ब्रॅंड म्हणून कर्मचाऱ्यांना आश्वासित करतो की, या संकटाच्या काळात आपण सगळे सोबत आहोत.
एशियन पेंट्स कंपनीने 35 कोटी रुपये केंद्रीय आणि राज्य कोविड-19 फंडात दान केले आहेत. सोबतच कंपनी कोरोनाची लढाई लढणाऱ्यांसाठी मदत म्हणून सॅनिटायझर बनवत आहे.
कोरोना व्हायरसमुळं जगभरात मोठं संकट उभं राहिलं आहे. भारतात देखील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. कोरोना रुग्णांच्या बाबतीत भारत जगात बाराव्या स्थानावर आहे. भारतात आत्ता कोविडचे 82,103 रुग्ण आहेत. तर 2649 बळी कोरोनामुळं गेले आहेत.
" आम्हाला खऱ्या नेतृत्वाचं आदर्श उदाहरण द्यायचं आहे. एक संस्था म्हणून आम्ही आमच्या हितचिंतकांची काळजी घेत आहोत, हे आम्हाला सिद्ध करायचं आहे. मी आमच्या बोर्डाला देखील अशा निर्णयांबाबत कळवत असतो. बोर्ड सदस्यांनी देखील कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या निर्णयाला सहमती दर्शवली आहे. "
-
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
रायगड
Advertisement