एक्स्प्लोर
पोस्टमार्टम करणाऱ्या मोहम्मद अफसर यांची दरियादिली, कोरोनाविरोधातील लढाईसाठी दिले एका महिन्याचे वेतन
कोरोनाविरोधातील लढाईसाठी अनेकजण पुढे येऊन मदतीसाठी हात देत आहेत. बुलडाण्यात देखील असंच एक आदर्श उदाहरण पाहायला मिळालं आहे.
बुलडाणा : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाविरोधातील लढाई डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, पोलिस आणि अत्यावश्यक सेवेतील सर्व कर्मचारी जोखीम पत्करुन लढत आहेत. या लढाईसाठी अनेकजण पुढे येऊन मदतीसाठी हात देत आहेत. बुलडाण्यात देखील असंच एक आदर्श उदाहरण पाहायला मिळालं आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात पोस्टमार्टम करणाऱ्या मोहम्मद अफसर यांनी कोरोना विरोधातील लढाईसाठी आपले एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिले आहे. मोहम्मद अफसर यांनी 23 हजार रुपये मदत म्हणून जमा केले आहेत.
पोस्टमार्टमसाठी येणारी प्रेतं अनेकदा अपघात, आत्महत्या अशा प्रकारची येत असतात. अशा प्रेतांचं पोस्टमार्टम करण्याचं काम अफसर बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात करतात. मात्र पोस्टमार्टम करणाऱ्यांचं मनं किती संवेदनशील असतं हे मोहम्मद अफसर यांच्या कृतीवरुन दिसून आलं आहे.
त्यांनी आपलं एका महिन्याचे मिळालेले 23 हजार रुपये वेतन कोरोनासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देवून एक आदर्श निर्माण करत सर्वांना प्रेरणा दिली आहे.
दिलासादायक... पहिला रुग्ण सापडल्याच्या 100 दिवसानंतर केरळमध्ये केवळ एकच नवीन कोरोना रुग्ण
सध्या देशासह आपला महाराष्ट्र कोरोनाच्या मोठ्या संकटातून जातोय. या लढाईत प्रत्येक जण आपल्या परीने योगदान देतोय. आपले फायटर्स कोरोनाशी लढत आहेत. या शासनाने आतापर्यंत मला सांभाळलंय. या सरकारमुळंच माझ्या परिवार फुललाय. माझ्या आयुष्यातील सर्व गोष्टी या नोकरी वर झाल्या आहेत. आज माझी गरज माझ्या शासनाला आहे, त्यामुळे मी माझी पगार कोरोनासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली, अशा भावना मोहम्मद अफसर यांनी व्यक्त केल्या.
जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित यांनी मोहम्मद अफसरच्या कृतीचं कौतुक केलंय. ही नक्कीच अभिमान आहे अशा कर्मचाऱ्यांमुळे काम करण्याचं बळ मिळत, असं डॉ. प्रेमचंद पंडित यांनी म्हटलंय.
कोरोनाचं म्युटेशन हे आव्हान, पण सीरम इन्स्टिट्यूटची लस सर्व म्युटेशनवर प्रभावी ठरेल : अदर पूनावाला
बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात शव विच्छेदनाचे काम करणारे मोहम्मद अफसर हे किती महत्वाचं काम करतायत हे त्यांनी आपल्या कर्तव्यातून करून दाखवल आहे. त्यांचं काम तर महत्वाचं आहेच मात्र आपल्या कामाला कर्तव्याची जोड दिली तर ते दुसऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरते आणि याचाच आदर्श सर्वांना घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement