एक्स्प्लोर

Congress President Election : सस्पेन्स संपला, राहुल गांधींच्या नकारानंतर अशोक गेहलोत निवडणुकीच्या रिंगणात, अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार  

Congress President Election : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) हे काँग्रेसच्या अध्यक्षपदाची  निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी स्वत: या निर्णयाची घोषणा केली आहे.

Congress President Election : काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक (Congress President Election) जसजशी जवळ येत आहे, तसतसे सारे चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अध्यक्षपदाच्या दावेदारीवरुन राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु आहेत. मात्र, हळूहळू चित्र स्पष्ट होत आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) हे काँग्रेसच्या अध्यक्षपदाची  निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी स्वत: या निर्णयाची घोषणा केली आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आपण अध्यक्षपदाच्या शर्यतीत नसल्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं आता गेहलोत हे अध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

अशोक गेहलोत (Ashok Gehlot) हे आत्तापर्यंत राहुल गांधींचे मन वळवण्याचा प्रयत्न केला जाईल, त्यानंतरच निर्णय घेतला जाईल, असे उत्तर देत होते. मात्र, काल (22 सप्टेंबर)  गेहलोत हे राहुल गांधींसोबत केरळमध्ये भारत जोडो यात्रेत सामील झाले. यादरम्यान राहुल गांधींचे मन वळवण्याचा शेवटचा प्रयत्न त्यांनी केला. मात्र, राहुल गांधी यांनी निवडणूक लढवण्या स्पष्ट नकार दिला. त्यानंतर गेहलोत यांनी आपण काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केलं आहे. त्यामुळं आता सस्पेन्स संपला आहे.

गेहलोत राजस्थानचे मुख्यमंत्रीपद सोडणार

निवडणूक लढवण्याच्या घोषणेसोबतच अशोक गेहलोत यांनीही आपण राजस्थानचे मुख्यमंत्रीपद सोडणार असल्याचे स्पष्ट केले आहे. एक व्यक्ती एक पद यानुसार मी राजस्थानचे मुख्यमंत्रीपद सोडणार असल्याचे गेहलोत यांनी स्पष्ट केलं आहे. पुढचा मुख्यमंत्री कोण असेल याबाबतचा निर्णय सोनिया गांधी आणि प्रदेश प्रभारी ठरवतील असेही ते म्हणाले. त्यामुळं आता अशोक गेहलोत हे काँग्रसचे अध्यक्ष बनणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

अशोक गेहलोत यांच्याबरोबर 'या' नेत्यांच्या नावांची चर्चा

अशोक गेहलोत यांच्याशिवाय शशी थरुर, मनीष तिवारी तसेच अन्य काही नेतेही अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. मात्र, गेहलोत यांना सर्वात मोठे दावेदार मानले जात आहेत. अशोक गेहलोत 24 सप्टेंबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची अधिसूचना 22 सप्टेंबर रोजी जारी करण्यात आली आहे. त्यानंतर 24 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 8 ऑक्टोबर आहे. एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास 17 ऑक्टोबरला मतदान होईल आणि 19 ऑक्टोबरला अध्यक्षपदाचा निकाल जाहीर केला जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
Ajit Pawar : बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा अन् मी एकमेकांचे चेहरे पाहत होतो, पण खचायचं नाही हे ठरवलं: प्रफुल पटेल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यातDhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..Hasan Mushrif Washim : श्रद्धा-सबुरी ठेवली पाहिजे, वाशिम पालकमंत्री पदावरून मुश्रीफ म्हणाले...Chhagan Bhujbal : जे काही काम करू शकत नाही त्यांचे बदल झाले पाहिजे :छगन भुजबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
Ajit Pawar : बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा अन् मी एकमेकांचे चेहरे पाहत होतो, पण खचायचं नाही हे ठरवलं: प्रफुल पटेल
Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Jalgaon Crime: धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
Nitesh Rane : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
Mumbai High Court : ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
Embed widget