Owaisi Vehicle Attacked: असदुद्दीन ओवेसींच्या गाडीवर यूपीत गोळीबार; मेरठवरुन परतताना गाडीवर चार राऊंड फायर झाल्याचा दावा
Owaisi Vehicle Attacked: एमआयएमचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवेसींच्या गाडीवर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडलीय. सुदैवाने त्यांना कोणतीही हानी झाली नसल्याची माहिती त्यांनी ट्विटरवरून दिली आहे.
नवी दिल्ली: एमआयएमचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्या गाडीवर उत्तर प्रदेशातील मेरठजवळ गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. त्यांच्या गाडीवर एकूण चार राऊंड फायर करण्यात आल्याची माहिती आहे. यामध्ये असदुद्दीन ओवेसींना कोणतीही हानी झाली नसून ते सुखरुप असल्याची माहिती त्यांनी स्वत: दिली आहे.
मेरठवरुन परत येत असताना आपल्या गाडीवर चार राऊंड फायर झाल्याचा दावा खासदार असदुद्दीन ओवेसींनी केला आहे. त्यानंतर आपली गाडी पंक्चर झाली आणि आपण दुसऱ्या गाडीच्या मदतीने त्या ठिकाणाहून निघाल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
कुछ देर पहले छिजारसी टोल गेट पर मेरी गाड़ी पर गोलियाँ चलाई गयी। 4 राउंड फ़ायर हुए। 3-4 लोग थे, सब के सब भाग गए और हथियार वहीं छोड़ गए। मेरी गाड़ी पंक्चर हो गयी, लेकिन मैं दूसरी गाड़ी में बैठ कर वहाँ से निकल गया। हम सब महफ़ूज़ हैं। अलहमदु’लिलाह। pic.twitter.com/Q55qJbYRih
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) February 3, 2022
मेरठ पोलीस अधीक्षकांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी या ठिकाणी भेट दिली असून या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, या घटनेचे अनेकजण साक्षीदार आहेत, त्यामुळे आता यूपी पोलिसांनी गोळीबार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांंनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- '18 वर्ष झाल्यावर पंतप्रधान निवडू शकतो तर पार्टनर का नाही', मुलींचं लग्नाचं वय वाढवण्याला ओवेसींचा विरोध
- मुस्लिमांनाही शिकायचंय त्यांना आरक्षण द्या, असदुद्दीन ओवेसींचा सरकारवर हल्लाबोल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha