मुस्लिमांनाही शिकायचंय त्यांना आरक्षण द्या, असदुद्दीन ओवेसींचा सरकारवर हल्लाबोल
Owaisi in Mumbai : ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कलम 144 लावण्यात आले आहे. डिंसेबरमध्ये राहुल गांधीचा दौरा आहे. त्यावेळी देखील तुम्ही 144 लावणार का? असा सवाल ओवेसी यांनी केला.
Owaisi in Mumbai : मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरुन एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. मुस्लिम मुलांनाही शिकायचं आहे, त्यांनाही आरक्षण द्या, असं म्हणत मुंबईच्या चांदिवलीत एमआयएमची सभा पार पडली. तर सेक्युलिरझम या शब्दामुळे मुस्लिम समाजाचं नुकसान झालं असाही घणाघात केला.
मुस्लिमांनी आता यांच्यावर विश्वास ठेवू नये : असदुद्दीन ओवेसी
मुस्लिम आरक्षणावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने भाषणे दिली. परंतु आरक्षण कुठे आहे? कधीपर्यंत तुम्ही अशीच फसवणूक करून घेणार आहे. शरद पवार, राहुल गांधी यांनी शिवसेना किती धर्मनिरपेक्ष आहे हे सांगावे. तुम्ही सन 1992 मध्ये काय झाले हे विसरलेत का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभागृहात म्हणतात की, बाबरी मशिद आम्ही पाडली आणि धर्मनिरपेक्ष काँग्रेस, राष्ट्रवादीला काही वाटले नाही का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. मुस्लिमांनी आता यांच्यावर विश्वास ठेवू नये. आपल्या मतांचा त्यांनी योग्य वापर करावा असेही ओवेसी यांनी म्हटले.
मुस्लिमांना आरक्षण का नाही?
महाराष्ट्रातील 93 टक्के मुस्लिमांकडे स्वत:च्या जमिन नाही.ज्यांच्याकडे जमिन आहे, त्यांना आरक्षण दिले जात आहे. तर, ज्यांच्याकडे काही नाही, त्यांना आरक्षण नाही. असेही ओवेसी यांनी म्हटले. संविधानामध्ये जे सेक्युलॅरिसम आहे त्याला मी मानतो. राजकारणातील सेक्युलॅरिसम मी मानत नाही. देशाच्या संविधानामध्ये सांगितले आहे की कोणाला आरक्षण मिळायला हवे. कोर्टाने सांगितलं की, मुस्लिमांना आरक्षण मिळायला हवे. पण हे थ्री इन वन सरकार हे विसरले आणि आता मराठा आरक्षणाचा गप्पा करत आहेत.
राहुल गांधी आल्यावर देखील 144 लावणार का?
औरंगाबादहून मुंबईत येताना जलील यांना अनेक ठिकाणी अडवण्यात आलं आहे. मानखुर्दमध्ये, औरंगाबाद, खारघर, वाशीमध्ये जलील यांना अडवण्यात आलं. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कलम 144 लावण्यात आले आहे. डिंसेबरमध्ये राहुल गांधीचा दौरा आहे. त्यावेळी देखील तुम्ही 144 लावणार का? तेव्हा तुम्ही काय करणार असा सवाल देखील महाविकासआघाडी सरकारला त्यांनी या वेळी केली आहे.
शिवसेना राष्ट्रवाद विसरली का?
मुस्लिम आरक्षणासाठी आजच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तिरंगा रॅलीमुळे महाविकास आघाडीला आडचण आली आहे. तिरंगा म्हणजे भारताची देशाची ओळख आहे. स्वातंत्र्यलढ्यात सहभागी न झालेले देखील राष्ट्रवाद सांगतात. शिवसेना राष्ट्रवाद विसरली का? असा सवाल करत महाविकासआघाडी सरकार आता तिरंग्याविरोधात गेले असल्याची खंत असद्दुदीन ओवेसी यांनी व्यक्त केली आहे.
एकत्र येऊन काम केल्यास यश नक्की मिळेल
समाजासाठी यशासाठी सर्वांनी एकत्र लढायला हवे, आपण सर्व एकत्र येऊन आपण काम करुयात, मिळून काम केल्यास यश नक्की मिळेल , असे असद्दुदीन ओवेसी म्हणाले.
संबंधित बातम्या :