(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Delhi Liquor Policy Case : सीएम अरविद केजरीवालांची सीबीआयकडून चौकशी; आप नेत्यांची दिल्ली पोलिसांकडून धरपकड
दिल्ली पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या सर्व आप नेत्यांना ताब्यात घेतले आहे. खासदार संजय सिंह, आतिशी, सौरभ भारद्वाज, राघव चढ्ढा आणि पंजाब आणि दिल्ली सरकारच्या कॅबिनेट मंत्र्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
Delhi Excise Policy Case : कथित अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी सीबीआयकडून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना समन्स बजावल्यानंतर आज (16 एप्रिल) चौकशीसाठी राजधानी दिल्लीतील सीबीआय मुख्यालयात दाखल झाले आहेत. केजरीवाल यांनी हा आपल्या अटकेचा कट असल्याचा आरोप केला आहे. सीबीआयकडून शनिवारी समन्स बजावण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चौकशीला समोर जाणार असल्याचे सांगितले होते. केजरीवाल यांना समन्स बजावल्यानंतर भाजप आणि आपमध्ये आरोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत.
कायर मोदी ने ज़ुल्म की सारी सीमाएं पार की!
— AAP (@AamAadmiParty) April 16, 2023
तानाशाह Modi की Delhi Police द्वारा दिल्ली सरकार की कैबिनेट, Punjab के मंत्रियों, AAP MPs और नेताओं को किसी अज्ञात स्थान पर ले जाया जा रहा है।#KejriwalRukegaNahi pic.twitter.com/8rbruk7jx3
दिल्ली पोलिसांकडून सर्व आपचे नेते ताब्यात
दिल्ली पोलिसांनी सीबीआय मुख्यालयाबाहेर आंदोलन करणाऱ्या सर्व आप नेत्यांना ताब्यात घेतले आहे. खासदार संजय सिंह, आतिशी, सौरभ भारद्वाज, राघव चढ्ढा आणि पंजाब आणि सर्व दिल्ली सरकारच्या इतर कॅबिनेट मंत्र्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.राघव चढ्ढा यांनी ट्विट करून म्हटले आहे की, 'दिल्ली पोलिसांनी आम्हाला शांततेत बसल्याबद्दल अटक केली आहे आणि अज्ञात ठिकाणी नेले जात आहे. ही कसली हुकूमशाही?
दिल्ली पुलिस ने हमें शांतिपूर्वक ढंग से बैठने के जुर्म में गिरफ्तार कर लिया है और किसी अनजान जगह पर लेके जा रही है... ये कैसी तानाशाही है ? pic.twitter.com/3yDvdAVOXT
— Raghav Chadha (@raghav_chadha) April 16, 2023
पोलिसांनी 1500 लोकांना अटक केली, गोपाल राय यांचा आरोप
आप नेते गोपाल राय यांनी सांगितले की, 'ISBT मधून 120, राजघाटातून 12, मुकरबा चौकातून 12, आनंद विहारमधून 100, द्वारका मोडमधून 50, IIT गेटमधून 17, अजमेरी गेटमधून 22, ओखलामधून 22, राहरौलीतून 70, गाझीपूरमधून 70 जण दिल्ली पोलिसांनी 150 जणांना अटक केली आहे. राजेश ऋषी, सोमनाथ भारती, पवन शर्मा, गिरीश सोनी, अमानतुल्ला खान, करतार सिंग आदींसह ३२ आमदारांना अटक करण्यात आली आहे. एकूण 1500 जणांना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक करण्यात आली आहे. अनेकांना बसमधून जाण्यास भाग पाडले जात आहे. कुठे घेऊन जाणार माहीत नाही.
ये लड़ाई सिर्फ़ @AamAadmiParty की नहीं है,
— Rajesh Gupta (@rajeshgupta) April 16, 2023
ये लड़ाई है आपके बच्चे की शिक्षा की,
ये लड़ाई है फ्री दवाई की,
ये लड़ाई सिर्फ़ @ArvindKejriwal की नहीं बल्कि हर उस आदमी की है जो इस देश की तरक़्क़ी के सपने देखने की जुर्रत करे#KejriwalRukegaNahi pic.twitter.com/me5tA6PHrf
दिल्लीच्या सीमेवर 20 आमदार ताब्यात
आप नेते गोपाल राय यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, 'मुख्यमंत्री केजरीवाल यांना पाठिंबा देण्यासाठी पंजाबचे आमदार आणि मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासोबत येत होते. दिल्लीच्या सीमेवर 20 आमदारांना अटक करण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या