Article 370 | जम्मू काश्मीरमधील शाळा आणि सरकारी कार्यालये सुरु
जम्मू-काश्मीरमध्ये अनेक अफवा पसवल्या जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर जम्मूमधील पाच जिल्ह्यातील इंटरनेट सेवा रविवारी पुन्हा बंद करण्यात आली.
श्रीनगर : कलम 370 हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमधील जनजीनव हळूहळू पूर्वपदावर येत आहे. आज काश्मीरमधील शाळा, सरकारी कार्यालये सुरु झाले आहेत. श्रीनगरमध्ये 190 शाळा आज सुरु झाल्या आहेत. लासजान, सांगरी, पंथचौक, नौगाम, राजबाग, जवाहर नगर, गगरीबाल, धारा, थीड, बाटमालू आणि शाल्टेंग येथील शाळांचा यामध्ये समावेश आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये अनेक अफवा पसवल्या जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर जम्मूमधील पाच जिल्ह्यातील इंटरनेट सेवा रविवारी पुन्हा बंद करण्यात आली. जवळपास दोन आठवड्यानंतर शुक्रवारी आणि शनिवारी रात्री जम्मू, सांबा, कठुआ, उधमपूर आणि रियासी जिल्ह्यामध्ये मोबाइल इंटरनेट सेवा सुरु करण्यात आली होती. मात्र आता अफवांना रोखून शांतता कायम राखण्यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
येत्या काही दिवसात जम्मू काश्मीरमधील लागू करण्यात आलेल्या बंदी उठवण्यात येतील. परिस्थिती पूर्वपदावर येत असताना शांती राखण्यासाठी लोकाचं सहकार्य लक्षात घेत योग्य ती पावलं उचलली जातील, असं प्रशासनानं म्हटलं आहे.
जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 हटवल्यानंतर परिस्थिती चिघळू नये यासाठी 5 ऑगस्ट रोजी अनेक बंदी घालण्यात आल्या होत्या. राज्यातील बहुतांश भागात संचारबंदी लागू करण्यात आली होती. तसेच इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली होती.
संबंधित बातम्या