एक्स्प्लोर

Dr Kalam Jayanti : नावाड्याचा मुलगा ते वैज्ञानिक अन् देशाचे राष्ट्रपती, डॉ. अब्दुल कलामांचा प्रेरणादायी प्रवास

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची आज जयंती. मिसाईल मॅन अशा नावानं देखील त्यांची ओळख. एका नावाड्याचा मुलगा ते महान वैज्ञानिक आणि देशाचा राष्ट्रपती अशी डॉ. कलामांची ही वाटचाल थक्क करणारी आहे.

मुंबई : भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची आज जयंती. मिसाईल मॅन अशा  नावानं देखील त्यांची ओळख. एका नावाड्याचा मुलगा ते महान वैज्ञानिक आणि देशाचा राष्ट्रपती अशी डॉ. कलामांची ही वाटचाल थक्क करणारी आहे. डॉ. कलाम यांनी अॅरोनॉटिकल इंजिनीअर म्हणून कारकीर्दीची सुरुवात केली असली तरी शाळेच्या दिवसात त्यांनी घराघरात पेपर टाकण्याचं काम केलं होतं. पेपर टाकण्यापासून देशाला शक्तिशाली देश बनवणं आणि त्यानंतर भारताचे राष्ट्रपती बनणं हे मोठं यश आहे. डॉ. कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी झाला तर 27 जुलै 2015 रोजी त्यांचं निधन झालं. त्यांना भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. देशाच्या दोन मोठ्या यंत्रणांचे प्रमुख अब्दुल कलाम भारताच्या दोन मोठ्या यंत्रणांचे, अर्थात डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) आणि इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो)चे प्रमुख होते. दोन्ही यंत्रणांमध्ये त्यांनी उल्लेखनीय काम केलं होतं. भारताचं पहिलं रॉकेट एसएलव्ही-3 बनवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. पोलर सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल (पीएसएलव्ही) बनवण्यातही त्यांचा मोठा वाटा होता. त्याशिवाय भारताचं पहिलं क्षेपणास्त्र 'पृथ्वी' आणि त्यानंतर 'अग्नी' क्षेपणास्त्र बनवण्यातही डॉक्टर अब्दुल कलाम यांचं मोलाचं योगदान होतं. अण्वस्त्र कार्यक्रमात भूमिका भारताने 1998 मध्ये जी अण्वस्त्र चाचणी केली होती, त्यातही डॉ. कलाम यांची भूमिका होती. त्यावेळी ते डीआरडीओचे प्रमुख होते. भारताला शक्तीशाली देश बनवण्यात अब्दुल कलाम यांची मोठी भूमिका आहे. जगातील मोजकेच राष्ट्राध्यक्ष असे असतील जे उच्चविद्याविभूषित असतील. जागतिक राजकारणात त्यांची भूमिका महत्त्वाची होती. ते मानवतावादी होते. इतकंच नाही तर ते मृत्यूदंडाच्याविरोधात होते, विशेषत: न्यायालयामार्फत देण्यात येणारी शिक्षा. त्यांच्यासारखा दुसरा होणं अशक्य कलाम हे त्यांच्यासारखे एकमेव होते. त्यांच्यासारखं दुसरं होणं अशक्य आहे. मुलांशी असलेलं त्यांचं नातं हे अवर्णनीय होतं. ते मोठे वैज्ञानिक तर होतेच पण राष्ट्रपती बनल्यानंतरही त्यांना मुलांमध्ये रमत होते. ते मुलांसोबत लहान मुलांसारखंच बोलत असत. डॉ. कलाम जन्माने मुस्लिम होते, पण त्यांचा जन्म हिंदूबहुल रामेश्वरम शहरात झाला होता. कलाम यांचं 'अग्निपंख' हे पुस्तक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या भाषणांनी ते तरुणांमध्ये नवी उमेद जागी करत. ज्यांचे विचार थोर असतील आणि विज्ञानात रस असेल, तेच असं कार्य करु शकतात.

महत्त्वाच्या बातम्या

Election Commission : 'कोणी नागरिक आहे की नाही ठरवण्याचा अधिकार ECI ला नाही'; सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायमूर्तींचा निवडणूक आयोगाच्या कामावर प्रश्नचिन्ह
'कोणी नागरिक आहे की नाही ठरवण्याचा अधिकार ECI ला नाही'; सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायमूर्तींचा निवडणूक आयोगाच्या कामावर प्रश्नचिन्ह
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा; शहरात आजपासून दर गुरुवारी पूर्ण पाणीकपात; ऑगस्ट 2027 पर्यंत पाणी जपण्याचे महापालिकेचे नियोजन, काय आहे पालिकेचा प्लॅन
पुणेकरांनो पाणी जपून वापरा; शहरात आजपासून दर गुरुवारी पूर्ण पाणीकपात; ऑगस्ट 2027 पर्यंत पाणी जपण्याचे महापालिकेचे नियोजन, काय आहे पालिकेचा प्लॅन
Nana Patekar Death: तुकाराम मुंढे ते वर्षा उसगांवकर; नाना पाटेकरांच्या प्रार्थना सभेत कोण कोण आलं? मराठी कलाकारांकडून आठवणींना उजाळा
तुकाराम मुंढे ते वर्षा उसगांवकर; नाना पाटेकरांच्या प्रार्थना सभेत कोण कोण आलं? मराठी कलाकारांकडून आठवणींना उजाळा
Gunaratna Sadavarte on Pradeep Purnekar case: प्रदीप पूर्णेकरांना संपवण्यात दाढीवाल्या अजगराचा हात? मी ही केस लढायला गेलो तर एकनाथ शिंदे आडवे येतील, गुणरत्न सदावर्तेंचं खळबळजनक वक्तव्य
प्रदीप पूर्णेकरांना संपवण्यात दाढीवाल्या अजगराचा हात? मी ही केस लढायला गेलो तर एकनाथ शिंदे आडवे येतील, गुणरत्न सदावर्तेंचं खळबळजनक वक्तव्य
Nana Patekar Condolence Meet Jaywant Wadkar: नाना पाटेकरांच्या शोकसभेत जयवंत वाडकरांकडे सगळे पाहतच राहिले, खुर्चीवर न बसता जमिनीवर बसले, नेमकं काय घडलं? VIDEO
नाना पाटेकरांच्या शोकसभेत जयवंत वाडकरांकडे सगळे पाहतच राहिले, खुर्चीवर न बसता जमिनीवर बसले, नेमकं काय घडलं? VIDEO
IND vs WI 4th T20 : वारंवार तीच घोडचूक, चौथ्या टी-20 मध्ये भारताचा लाजीरवाणा पराभव! टीम इंडियाला बुडवणारे 5 खेळाडू, कोण आहेत ते?
वारंवार तीच घोडचूक, चौथ्या टी-20 मध्ये भारताचा लाजीरवाणा पराभव! टीम इंडियाला बुडवणारे 5 खेळाडू, कोण आहेत ते?
Nana Patekar Death Tanushree Dutta: 'अंधारात अंत्य संस्कार का करण्यात आले? नाना अजूनही जिवंत...'; नाना पाटेकरांच्या निधनावर तनुश्री दत्ताने उपस्थित केले प्रश्न, म्हणाली...
'अंधारात अंत्य संस्कार का करण्यात आले? नाना अजूनही जिवंत...'; नाना पाटेकरांच्या निधनावर तनुश्री दत्ताने उपस्थित केले प्रश्न, म्हणाली...
Solapur Crime News: पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाच्या बायकोला आईनं दिली ऑफर; 39 लाखांची मागणी अन् आरोपातून मुक्तता..., सोलापुरात नेमकं काय घडलं?
पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाच्या बायकोला आईनं दिली ऑफर; 39 लाखांची मागणी अन् आरोपातून मुक्तता..., सोलापुरात नेमकं काय घडलं?
Tukaram Mundhe on Nana Patekar: नाना पाटेकरांनी फोनवर बोललेलं 'ते' शेवटचं वाक्य आज मनाला बोचतंय, तुकाराम मुंढे शोकसभेत सर्वांदेखत भावूक झाले
नाना पाटेकरांनी फोनवर बोललेलं 'ते' शेवटचं वाक्य आज मनाला बोचतंय, तुकाराम मुंढे शोकसभेत सर्वांदेखत भावूक झाले
Embed widget