Cheetah Dies: कुनो नॅशनल पार्कमध्ये आणखी एक चित्ता मृत्यूमुखी; चार महिन्यात 8 चित्त्यांनी प्राण गमावले
Cheetah Dies: या वर्षी मार्चपासून श्योपूर जिल्हा उद्यानात मृत्यूमुखी पडलेल्या चित्त्यांची संख्या आठ झाली आहे. आफ्रिकेतून आणलेल्या तेजस या नर चित्ताचा तीन दिवसांपूर्वी उद्यानात मृत्यू झाला होता.
Cheetah Dies: मध्य प्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये (Kuno National Park) शुक्रवारी आफ्रिकेतून आणलेल्या आणखी एका चित्त्याचा मृत्यू (Cheetah Dies) झाला आहे. नर जातीचा चित्ता सूरज याचा आज मृत्यू झाला. वन अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. या वर्षी मार्चपासून श्योपूर जिल्हा उद्यानात मृत्यूमुखी पडलेल्या चित्त्यांची संख्या आठ झाली आहे. आफ्रिकेतून आणलेल्या तेजस या नर चित्ताचा तीन दिवसांपूर्वी उद्यानात मृत्यू झाला होता.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, सूरजला शुक्रवारी सकाळच्या सुमारास निरीक्षण पथकाने पालपूर पूर्व रेंजमधील मसावनी भागात जखमी अवस्थेत दिसून आला. जमिनीवर पडलेल्या सूरजच्या मानेवर किडे संचार करत होते. अशा अवस्थेत तो उठून पळू लागला.
पाठ आणि मानेवर जखमा
पशुवैद्यकीय डॉक्टर आणि वन अधिकार्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास बिबट्या मृतावस्थेत आढळून आला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मुक्त क्षेत्रात बिबट्याचा मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ असून त्याच्या पाठीवर आणि मानेवर जखमेच्या खुणा असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
काही दिवसांपूर्वी नर चित्त्याचा मृत्यू
दरम्यान, 11 जुलै रोजी मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्क (KNP) मध्ये आणखी एका नर चित्ताचा मृत्यू झाला होता. नर चित्ता तेजस हा निरीक्षण पथकाला जखमी अवस्थेत आढळून आला. यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले मात्र त्यानंतरही त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत. तेजसच्या मृत्यूनंतर कुनो नॅशनल पार्कमध्ये 4 चित्ता आणि 3 शावक शिल्लक राहिले होते.
नर चित्ता तेजसच्या मृत्यूच्या एका दिवसानंतर, त्याच्या पोस्टमार्टम अहवालात असे दिसून आले की तो "कमकुवत" होता आणि मादी चिेत्तेशी झालेल्या हिंसक संघर्षानंतर त्याला धक्का बसला. या धक्क्यातून तो सावरू शकला नसल्याची माहिती देण्यात आली. मार्चपासून कुनो नॅशनल पार्कमध्ये सात चित्ते मरण पावले आहेत.
तेजस चित्त्याचे वजन सुमारे 43 किलो होते. सामान्य नर चित्त्याच्या वजनापेक्षा कमी आहे आणि त्याच्या शरीराचे अंतर्गत अवयव योग्यरित्या काम करत नव्हते. अशा परिस्थितीत तो बरा होण्याची शक्यता फारच कमी असल्याचे सांगण्यात आले आहे.
सुप्रीम कोर्टाने व्यक्त केली होती चिंता
चित्त्यांच्या मृत्यूबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. मे महिन्यात झालेल्या सुनावणीत खंडपीठाने चिंता व्यक्त केली होती. केवळ एकाच ठिकाणी चित्तांचा बंदोबस्त करणं योग्य होणार नाही, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले होते. इतर अभयारण्यातही त्यांचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न व्हायला हवा. तसेच, सुनावणीदरम्यान न्यायमूर्तींनी आपण सरकारवर प्रश्न उपस्थित करत नसल्याचं स्पष्ट केले. तसेच, त्यांना फक्त चित्यांबाबत चिंता वाटत असल्याचे त्यांनी म्हटले.