एक्स्प्लोर

लोकपाल बिल : अण्णा हजारे पुन्हा दिल्लीत उपोषणाला बसणार!

लोकायुक्तांची नियुक्ती व्हावी, तसेच शेतकऱ्यांबाबतच्या स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात, यासाठी ते उपोषण करणार आहेत.

मुंबई : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे पुन्हा एकदा दिल्लीत उपोषणाला बसणार आहेत. देशभरात लोकायुक्तांची नियुक्ती व्हावी, तसेच शेतकऱ्यांबाबतच्या स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात, यासाठी ते उपोषण करणार आहेत. या संदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आज पत्र लिहिलं आहे. सत्तेत येऊन तीन वर्षे झाली तरी मोदी सरकारने अद्याप लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्त केलेले नाहीत. अद्याप सरकारकडून भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी निश्चित असा कायदा करण्यात आलेला नाही. अशा शब्दात अण्णा हजारेंनी मोदी सरकारवर टीका केली आहे. अण्णा हजारेंचं मोदींना पत्र
''भ्रष्टाचारमुक्त भारताचं स्वप्न पाहत 2011 साली दिल्लीच्या रामलिला मैदानावर देशव्यापी आणि ऐतिहासिक आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाची दखल घेत 27 ऑगस्ट 2011 रोजी संसदेत 'सेन्स ऑफ हाऊस' नावाने ठराव पास करण्यात आला. ज्यामध्ये केंद्रात लोकपाल, राज्यात लोकायुक् आणि सिटिझन चार्टर यांची नियुक्ती करण्याबाबतच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर कायदा बनवण्यासाठी निर्णय घेण्यात आला. मात्र आज सहा वर्षांनंतरही देशात भ्रष्टाचार रोखणाऱ्या एकाही कायद्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही.'' असं अण्णा हजारेंनी पत्रात म्हटलं आहे.
''सत्तेत येऊन तीन वर्ष झाली, तरीही उत्तर नाही''
''सत्तेत येऊन तीन वर्ष झाली तरीही लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्तीबाबत तुम्ही अजून काहीही उत्तर दिलेलं नाही. संसदेत विरोधी पक्षात असताना तुम्हीही या कायद्याला संपूर्ण पाठिंबा दिला होता. 2014 साली तुमचा पक्ष सत्तेत आला. लोकपाल आंदोलनानंतर देशभरातील जनतेने मोठ्या अपेक्षेने तुमच्या नेतृत्वात तुमच्या पक्षाच्या हातात सत्ता दिली. मी गेल्या तीन वर्षात तुम्हाला अनेकदा पत्र लिहिली. मात्र तुम्ही अजून त्याला एकदाही उत्तर दिलं नाही आणि काही अंमलबजावणीही केली नाही. शिवाय कधी 'मन की बात'मध्येही त्याचा उल्लेख केला नाही, किंवा जनतेशी संवाद साधतानाही लोकपालचा विषय काढला नाही. मग भारत भ्रष्टाचारमुक्त कसा होईल?'' असं अण्णा हजारेंनी पत्रात लिहिलं आहे.
''तुमच्या करण्यात आणि बोलण्यात अंतर''
''विरोधीपक्षाचं सरकार आहे त्या राज्यात ठिक आहे. मात्र तुमचं सरकार असलेल्या राज्यातही तुमच्या पक्षाने लोकायुक्ताची नेमणूक केलेली नाही. यावरुन तुमची कायद्याची अंमलबजावणी करण्याची इच्छा नसल्याचं स्पष्ट होते. तुमच्या बोलण्यात आणि करण्यात फरक आहे. त्यामुळे भ्रष्टाचार मुक्त भारत कसा होईल?'' असा सवाल अण्णा हजारेंनी केला आहे.
''देशाच्या भल्यासाठी पुन्हा आंदोलन''
''यापूर्वी 28 मार्च 2017 रोजी तुम्हाला पत्र लिहिलं होतं आणि सांगितलं होतं की, लोकपाल आणि लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी नाही झाली तर माझं पुढचं पत्र दिल्लीत होणाऱ्या आंदोलनाविषयी असेल. त्यानुसार देशाच्या भल्यासाठी मी पुन्हा एकदा दिल्लीत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.'' असं अण्णा हजारेंनी पत्रात म्हटलं आहे.
''पुढच्या पत्रात आंदोलनाची तारीख आणि जागा निश्चित करणार''
''गेल्या 35 वर्षांपासून मी आंदोलन करत आहे. मात्र कधीही कोणत्या पक्षासाठी किंवा कोणत्या व्यक्तीसाठी आंदोलन केलं नाही. केवळ देशाच्या आणि जनतेच्याच भल्याचा विचार केला. गेल्या तीन वर्षांपासून तुमच्या सरकारला वारंवार पत्र लिहून लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्ती करणं, तसंच शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्याविषयी अनेकदा मागणी केली. मात्र याला तुम्ही काहीही उत्तर दिलं नाही किंवा कोणती कारवाईही केली नाही. त्यामुळे आता दिल्लीत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत आंदोलन दिल्लीत चालूच ठेवलं जाईल. आंदोलनाची तारीख आणि ठिकाण पुढच्या पत्रात कळवलं जाईल'' असंही अण्णा हजारेंनी पत्रात पंतप्रधान मोदींना लिहिलं आहे.
संबंधित बातम्या :

विरोधी पक्षनेत्याशिवाय लोकपाल नियुक्त करा : सुप्रीम कोर्ट

… तर पुन्हा रामलीलावर आंदोलन, अण्णा हजारेंचा इशारा

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi News : ना कॅश, ना क्रेडिट कार्ड! परदेश दौऱ्यावर पंतप्रधान मोदी पेमेंट कसे करतात? पैसे कसे देतात? 
ना कॅश, ना क्रेडिट कार्ड! परदेश दौऱ्यावर पंतप्रधान मोदी पेमेंट कसे करतात? पैसे कसे देतात? 
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
Vietnam Boat Capsize : धक्कादायक! भारतीय प्रवाशांची बोट उलटून व्हिएतनाममध्ये 15 पर्यटकांचा मृत्यू, मदतीसाठी हेल्पलाईन जारी
धक्कादायक! भारतीय प्रवाशांची बोट उलटून व्हिएतनाममध्ये 15 पर्यटकांचा मृत्यू, मदतीसाठी हेल्पलाईन जारी
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...

व्हिडीओ

Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vinayak Raut Daughter-in-law Girija Raut Marathi News: हनिमूनमध्ये शारीरिक संबंधास नकार, मी प्रश्न विचारताच पती म्हणाला...; विनायक राऊतांच्या सूनेचे हादरवणारे आरोप, पोलिसांच्या तक्रारीत काय काय?
हनिमूनमध्ये शारीरिक संबंधास नकार, मी प्रश्न विचारताच पती म्हणाला...; विनायक राऊतांच्या सूनेचे हादरवणारे आरोप, पोलिसांच्या तक्रारीत काय काय?
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Dive Ghat Video: झाला देव वारकरी...बघं वारी आली दारी; दिवे घाटातील आयुष्यभर हृदयात जपून ठेवणारा क्षण; पाहा 5 VIDEO
झाला देव वारकरी...बघं वारी आली दारी; दिवे घाटातील आयुष्यभर हृदयात जपून ठेवणारा क्षण; 5 VIDEO
Pune Moshi Building Collapse: तब्बल 81 तासांनंतर रेस्क्यू ऑपरेशन अखेर पूर्ण, मृतांची संख्या 9 वर, सुदैवाने 14 कामगार बचावले; मोशी दुर्घटनेत आतापर्यंत काय काय घडलं?
तब्बल 81 तासांनंतर रेस्क्यू ऑपरेशन अखेर पूर्ण, मृतांची संख्या 9 वर, सुदैवाने 14 कामगार बचावले; मोशी दुर्घटनेत आतापर्यंत काय काय घडलं?
Solapur News : तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
Rajpal Yadav : 85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
Embed widget