एक्स्प्लोर

अण्णांच्या कोअर कमिटीत फूट, सरकारने उपोषण गुंडाळलं?

रामलीला मैदानावर संध्याकाळी पाच वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातून पाणी पिऊन अण्णांनी आपलं उपोषण सोडलं.

नवी दिल्ली : जनलोकपाल आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी गेल्या सात दिवसांपासून सुरु असलेलं अण्णा हजारे यांचं आंदोलन कुठल्याही ठोस घोषणेशिवाय सरकारनं गुंडाळलं का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अण्णा हजारे यांनी केलेल्या मागण्यांबाबत केंद्र सरकारकडून केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी जे आश्वासन पत्र वाचून दाखवलं त्यात, विचार करु, केले जाईल, अशा प्रकारच्या शब्दांचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे हे उपोषण सरकारनं अत्यंत धूर्तपणे गुंडाळलं का, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. दिल्लीतील रामलीला मैदानावर संध्याकाळी पाच वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातून पाणी पिऊन अण्णांनी आपलं उपोषण सोडलं. यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजनही उपस्थित होते. मागण्या मान्य झाल्या असल्या तरी त्या पूर्ण होण्यासाठी सहा महिन्यांची वाट बघणार, नाहीतर पुन्हा आंदोलन करणार, असा इशाराही अण्णांनी यावेळी दिला. मात्र अण्णा हजारेंना यापुढे उपोषण करावं लागणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. अण्णा हजारेंच्या बहुतांश मागण्या सरकारने तत्वत: मान्य केल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी अण्णांच्या मान्य झालेल्या मागण्या वाचून दाखवल्या. मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर अण्णांनी उपोषण मागे घेतलं, मात्र त्यांच्या कोअर कमिटीतच फूट पडल्याचं समोर आलं आहे. कोणतंही ठोस आश्वासन न देता सरकारनं तोंडाला पान पुसल्याचा आरोप कोअर कमिटीच्या सदस्यांनी केला आहे. महाराष्ट्रातील काही नेत्यांनी फूस लावत या आंदोलनात फूट पाडल्याचा दावाही कमिटीच्या सदस्यांनी केला.

सातव्या दिवशी अण्णा हजारेंचं उपोषण मागे

जनलोकपाल, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचे बदल या मागण्यांसाठी अण्णांचं गेल्या सात दिवसांपासून रामलीलावर उपोषण सुरु होतं. 23 मार्चला म्हणजे शहीद दिनाच्या दिवशी अण्णांनी उपोषणाची सुरुवात केली होती. अण्णांच्या आंदोलनातून काय हाती लागलं? कृषीमूल्य आयोगाला स्वायत्तता देण्यासाठी उच्चस्तरीय समिती कृषी अवजारांवरील जीएसटी 12 टक्क्यांवरुन 5 टक्क्यांवर आणणार लोकपालच्या निर्णयाबाबत कालमर्यादा निश्चित करण्याची मागणी मान्य निवडणूक सुधारणांबाबत सरकार सकारात्मक पाऊल उचलणार अण्णांच्या नेमक्या मागण्या काय आहेत? - शेतकऱ्यांचे प्रश्न कृषी उत्पन्नाला उत्पादन खर्चाच्या आधारावर 50 टक्के अधिक भाव मिळावा शेतीवर अवलंबून असलेल्या 60 वर्षांवरील शेतकरी आणि मजुरांना दरमहा 5 हजार रुपये पेन्शन द्यावं कृषीमूल्य आयोगाला स्वायत्तता द्यावी, सरकारी हस्तक्षेप नसावा पिकाचा सामूहिक नव्हे, तर वैयक्तिक विमा असावा - लोकपाल, लोकायुक्त संदर्भातल्या मागण्या जनलोकपाल कायदा त्वरीत लागू करावा, लोकपालची नियुक्ती व्हावी लोकपाल कायदा कमकुवत करणारे कलम 63 आणि 44 मध्ये बदल करावा केंद्राच्या लोकपालप्रमाणे प्रत्येक राज्यात सक्षम लोकायुक्त कायदा लागू करावा - निवडणुकीसंदर्भातल्या मागण्या बॅलेट पेपरवर उमेदवाराचा कलर फोटो हेच निवडणूक चिन्ह असावं मतमोजणीसाठी टोटलायझर मशिनचा उपयोग केला जावा NOTA ला Right To Reject चा अधिकार दिला जावा लोकप्रतिनिधिला परत बोलावण्याचा Right To Recall अधिकार जनतेला असावा

महत्त्वाच्या बातम्या

इंडिया आघाडीचा आज सुप्रीम कोर्टावर अभूतपूर्व मोर्चा, पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह इंडिया आघाडीची भेट का नाकारली? चार कारणे दिली!
इंडिया आघाडीचा आज सुप्रीम कोर्टावर अभूतपूर्व मोर्चा, पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह इंडिया आघाडीची भेट का नाकारली? चार कारणे दिली!
Sunetra Pawar on Someshwar Sugar Factory Election Result : निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
सणांपूर्वीच घरघुती बजेट कोलमडलं! 53 टक्के कुटुंब आर्थिक संकटात, सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर 
सणांपूर्वीच घरघुती बजेट कोलमडलं! 53 टक्के कुटुंब आर्थिक संकटात, सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर 
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune News: राजगड किल्ल्यावर पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू; मालकाच्या मृत्यूनंतरही निष्ठावान जुली राहिली सोबत, स्ट्रेचरच्या सहाय्याने किल्ल्यावरून खाली आणताना मागे-मागे आली अन्...
राजगड किल्ल्यावर पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू; मालकाच्या मृत्यूनंतरही निष्ठावान जुली राहिली सोबत, स्ट्रेचरच्या सहाय्याने किल्ल्यावरून खाली आणताना मागे-मागे आली अन्...
इंडिया आघाडीचा आज सुप्रीम कोर्टावर अभूतपूर्व मोर्चा, पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह इंडिया आघाडीची भेट का नाकारली? चार कारणे दिली!
इंडिया आघाडीचा आज सुप्रीम कोर्टावर अभूतपूर्व मोर्चा, पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह इंडिया आघाडीची भेट का नाकारली? चार कारणे दिली!
Sunetra Pawar on Someshwar Sugar Factory Election Result : निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
Someshwar Factory Election: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
WCL 2026 : 6 चेंडू, 12 धावा अन् काळजाचा ठोका चुकवणारा ड्रामा! भारत-बांगलादेश मॅचचा थरारक शेवट, ज्याने सगळेच चक्रावले
6 चेंडू, 12 धावा अन् काळजाचा ठोका चुकवणारा ड्रामा! भारत-बांगलादेश मॅचचा थरारक शेवट, ज्याने सगळेच चक्रावले
Abhijeet Dipke: आजीला शेवटचं पाहता आलं नाही, चितेपाशी जाताच अभिजीत दिपके ढसाढसा रडायला लागले
आजीला शेवटचं पाहता आलं नाही, चितेपाशी जाताच अभिजीत दिपके ढसाढसा रडायला लागले
Abhishek Sharma World Record : अभिषेक शर्माचं वादळ आलं अन् सूर्याचा विक्रम वाहून गेला! टी-20 क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम
अभिषेक शर्माचं वादळ आलं अन् सूर्याचा विक्रम वाहून गेला! टी-20 क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम
Chanakya Niti: कधी बोलावं? कधी शांत राहावे? चाणक्यनीतीचे 6 तत्त्व जाणून घ्या, जी तुमच्या उपयोगी येतील...
कधी बोलावं? कधी शांत राहावे? चाणक्यनीतीचे 6 तत्त्व जाणून घ्या, जी तुमच्या उपयोगी येतील...
Embed widget