एक्स्प्लोर
आंध्रप्रदेश विधानसभा निवडणूक : जगमोहन रेड्डींच्या वायएसआर काँग्रेसची सत्ता स्थापनेकडे वाटचाल
आंध्रप्रदेश विधानसभा निवणुकीच्या निकालात वायएसआर काँग्रेसला बहुमत मिळालं आहे. जगमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसने 175 पैकी 146 जागांवर आघाडी घेतली आहे.
हैदराबाद : आंध्रप्रदेश विधानसभा निवणुकीच्या निकालात वायएसआर काँग्रेसला बहुमत मिळालं आहे. जगमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसने 175 पैकी 146 जागांवर आघाडी घेतली आहे.
चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पक्षाला 2014 मध्ये याठिकाणी बहुमत मिळालं होतं. मात्र वायएसआरला मिळालेल्या आघाडीनंतर चंद्राबाबू नायडू यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहेत.
आंध्रप्रदेशात सध्या वायएसआर काँग्रेस 146 जागावर आघाडीवर आहे, तर तेलुगू देसम पक्ष 24 आणि इतर 1 जागेवर आघाडीवर आहे. आंध्रप्रदेशात सत्तास्थापनेसाठी 88 जागांची आवश्यकता आहे. वायएसआरने 146 जागांवर आघाडी मिळवली असल्याने जगमोहन रेड्डी यांचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत तेलुगू देसम पक्षाने भाजपसोबत युती केली होती. त्यामुळे भाजपच्या मतांचा त्यांना फायदा झाला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement