एक्स्प्लोर
Special Report Digital Arrest: 'ED अधिकारी आहोत', मुंबईतल्या दाम्पत्याला तब्बल 58 कोटींचा गंडा!
नाशिक आणि मुंबईत 'डिजिटल अरेस्ट' (Digital Arrest) च्या नावाने सायबर गुन्हेगारांनी ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करत कोट्यवधी रुपयांना गंडा घातल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. यात नाशिकमधील अनिल लालसरे (Anil Lalasare) दाम्पत्याची ७२ लाखांची फसवणूक झाली. 'तुमच्या आधार कार्डवरून क्रेडिट कार्ड इश्यू करण्यात आलंय आणि तुम्हाला बहात्तर लाख रुपयांचा दंड झालाय,' असं सांगून सायबर भामट्यांनी लालसरे यांची फसवणूक केली. तर मुंबईतील एका वृद्ध दाम्पत्याला ईडी (ED) अधिकारी असल्याचे भासवून तब्बल ५८ कोटी १३ लाखांना लुटण्यात आले. याशिवाय, नाशिकमध्येच आणखी एका व्यक्तीची ६ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी 'डिजिटल अरेस्ट' नावाचा कोणताही प्रकार अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट केले आहे. नागरिकांनी अशा बनावट कॉल्सवर विश्वास न ठेवता, अनोळखी नंबर ब्लॉक करावा आणि तात्काळ सायबर क्राईम हेल्पलाइन क्रमांक १९३० वर तक्रार करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
छत्रपती संभाजी नगर
राजकारण
Advertisement
Advertisement

















