Anand Mahindra | पहिल्यांदा गरजूंना कोरोनाची लस द्यावी, आनंद महिंद्रा यांचं राज्य सरकारला आवाहन
महाराष्ट्रात कोरोनाच्या लसीकरणाचा (corona vaccination) वेग वाढवावा असं सांगत आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी गरजूंना कोरोनाच्या लसीकरणात प्राधान्य देण्यात यावं असं राज्य सरकारला आवाहन केलं आहे.
मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. देशात कोरोनाच्या सर्वाधिक रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्राचा क्रमांक अव्वल आहे. त्यावर काळजी व्यक्त करत उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे खास अपील केली आहे. कोरोनाच्या लसीकरणामध्ये सर्वप्रथम गरजूंना प्राधान्य द्यावं असं त्यांनी म्हटलं आहे.
आनंद महिंद्रा यांनी सांगितलं आहे की गरजेनुसार कोरोनाची लस देण्यात यावी, त्याला लागणाऱ्या सर्व परवानग्या लवकरात लवकर देण्यात याव्यात. आपल्या ट्वीटच्या माध्यमातून त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे मागणी केली आहे. या वेळी कोरोना लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी देण्यात यावी जेणेकरुन कमीत कमी लोकांमध्ये संक्रमण होऊ शकेल.
Over half the new daily cases are in Maharashtra.The state is the nerve-centre of the country’s economic activity & more lockdowns will be debilitating. Maharashtra needs emergency permission to vaccinate EVERY willing person. No shortage of vaccines. @PMOIndia @drharshvardhan https://t.co/AemBFcrAd7
— anand mahindra (@anandmahindra) March 15, 2021
"
Coronavirus | 'मोदी ऑन अॅक्शन मोड', कोरोनाच्या स्थितीवर आज 11 वाजता मुख्यमंत्र्यासोबत बैठक घेणार
आनंद महिंदा म्हणाले की, "सध्या देशात असलेल्या कोरोनाच्या संख्येपैकी अर्धे रुग्ण महाराष्ट्रात आहेत. हे राज्य देशाच्या आर्थिक व्यवहारांचे केंद्र आहे. या राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागल्यास आर्थिक स्थिती आणखी दुर्बल होऊन जाईल. आनंद महिंदा यांनी केलेल्या या ट्वीटमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना टॅग केलं आहे."
आनंद महिंदा आपल्या पुढच्या ट्वीटमध्ये म्हणतात की, "कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे आता लसीकरणाच्या कामात वेग घेणं गरजेचं आहे. आपण असं नाही केलं तर आपल्याला नुकसान होऊ शकतं. गेल्या आठवड्यात उपमुख्यंमत्री अजित पवार यांनी सांगितलं होतं की 18 वर्षाखालील मुलांच्या लसीकरणासाठी पुण्यामध्ये लसीकरण सेंटरची सुरुवात करण्याची परवानगी द्यावी."