एक्स्प्लोर

नियमांनी थट्टा मांडली! दुचाकीवरील अजब नंबर प्लेटमुळे तरुणीला घराबाहेर पडणे झालंय कठीण

Delhi Number Plate trolling : आपला वाहन क्रमांक खास असावा यासाठी काहीजण अधिक पैसे मोजतात. तर, अनेकजण जो क्रमांक मिळतो त्यात समाधानी असतात. नियमांने मिळालेल्या वाहन क्रमांकाने एक मोठा गोंधळ उडाला आहे.

Delhi RTO Number Controversy :  जरा विचार करा, तुमच्या कारचा अथवा दुचाकीवरील क्रमांक हा तुमच्यासाठी लाज आणणारा, मनस्ताप देणारा ठरत असेल तर तुम्ही काय करणार? दिल्लीतील एका विद्यार्थीनीवर अशी वेळ आली आहे. तिच्या दुचाकीवर असलेल्या क्रमांकामुळे तिला ट्रोलिंग, मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. 

प्रीती (बदललेले नाव) ही दिल्लीतील मध्यमवर्गीय कुटुंबातील कॉलेजमध्ये शिक्षण घेणारी मुलगी आहे. मागील महिन्यात तिचा वाढदिवस होता. वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून तिने आपल्या वडिलांकडे दुचाकीची मागणी केली होती. वडिलांनी मुलीची इच्छा पूर्ण केली आणि एक दुचाकी बुक केली. इथपर्यंत सर्व ठीक होते. मात्र, या दुचाकीला मिळालेल्या क्रमांकामुळे प्रीती आणि तिच्या कुटुंबीयांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. प्रीतीला परिवहन कार्यालयाकडून मिळालेल्या क्रमांकामध्ये S.E.X.ही अक्षरे होती. 

दुचाकीच्या नंबरप्लेटवर असलेले ही अक्षरे कुटुंबाच्या मानसिक त्रासाचे कारण होऊ शकते असा अंदाज प्रीतीच्या भावालादेखील आला नाही. गाडीच्या नंबरप्लेटवर असलेली ही अक्षरे पाहून लोकांची शेरेबाजी सुरू झाली. रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांनी दुचाकी चालवत असलेल्या प्रीतीच्या भावावर शेरेबाजी केली. 

कुटुंबाच्या अडचणीत वाढ

प्रीतीच्या भावाने घरी आल्यानंतर ही घटना कुटुंबीयांना सांगितली. भावावर ओढावलेल्या प्रसंगामुळे प्रीती चांगलीच धास्तावली आहे. तिने दुचाकीचा क्रमांक बदलवून घेण्याची मागणी वडिलांकडे केली. मात्र, आता नियमांमुळे वाहन क्रमांक बदलता येणार नसल्याचे दिल्लीती एका परिवहन अधिकाऱ्याने सांगितले. आतापर्यंत या सिरीजच्या शेकडो वाहनांना क्रमांक देण्यात आले असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. दिल्ली परिवहन आयुक्त के.के. दहिया यांनी सांगितले की, एकदा वाहनाला क्रमांक दिल्यानंतर त्याला बदलण्याची कोणतीही तरतूद नाही. वाहनांना क्रमांक देण्याची प्रक्रिया एका ठरलेल्या पॅटर्ननुसार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

सांकेतिक क्रमांकामुळे गोंधळ 

केंद्रशासित प्रदेश असलेल्या दिल्लीत वाहन क्रमांकासाठी एक वेगळी पद्धत आहे. उदाहरणार्थ  DL 9 CAA 1111 या क्रमांकात  DL म्हणजे दिल्ली, पुढील सांकेतिक शब्द C हा वाहन प्रकार सांगणारा आहे. कार, एसयुव्हीसाठी C हा शब्द , दुचाकीसाठी S, इलेक्ट्रिक वाहनासाठी E, सार्वजनिक वाहतुकीतील बसेससाठी P, तीनचाकी रिक्षांसाठी R, टुरिस्ट परवानाधारक वाहनांसाठी T,पिक अप वाहनांसाठी V, भाडेतत्वावर असलेल्या वाहनांसाठी Y हे सांकेतिक अक्षर असतात. त्यामुळे दुचाकीवरील क्रमांकामुळे मोठा गोंधळ झाला असल्याचे दिसून येते.  

इतर महत्त्वाच्या बातम्या:

Omicron : तुम्हाला ओमिक्रॉनची लागण झाल्याचं कसं ओळखणार? जाणून घ्या कसं शोधायचं या नव्या व्हेरियंटला

Maharashtra School Reopen : नाशिकमध्ये 10 डिसेंबर, मुंबई-पुण्यात 15 डिसेंबर, तुमच्या जिल्ह्यात शाळा कधी उघडणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुस्लिम आई अन् पंजाबी वडिलांचा मुलगा आहे 'हा' 44 वर्षांचा अभिनेता; 100 वेळा इंडस्ट्रीत झाला रिजेक्ट, मग नशीब चमकलं अन्
मुस्लिम आई अन् पंजाबी वडिलांचा मुलगा आहे 'हा' 44 वर्षांचा अभिनेता; 100 वेळा इंडस्ट्रीत झाला रिजेक्ट, मग नशीब चमकलं अन्
Kolhapur ZP : कोल्हापूर जिल्हा परिषदेला तब्बल 57 कोटींचा गंडा घालण्याचा डाव, मुख्य लेखपालांच्या बनावट सही आणि स्टॅम्पचा वापर!
कोल्हापूर जिल्हा परिषदेला तब्बल 57 कोटींचा गंडा घालण्याचा डाव, मुख्य लेखपालांच्या बनावट सही आणि स्टॅम्पचा वापर!
Gaja Marne: 'ए त्याला मारा, माज आलाय...', मुरलीधर मोहोळांच्या माणसाला मारताना गजा मारणे स्पॉटवर? CCTV फुटेज समोर
'ए त्याला मारा, माज आलाय...', मुरलीधर मोहोळांच्या माणसाला मारताना गजा मारणे स्पॉटवर? CCTV फुटेज समोर
Elon Musk : जगातील अब्जाधीशांच्या यादीत उलटफेर, डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू एलन मस्क यांना धक्का, टेस्लाचे शेअर...
डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू एलन मस्क यांना धक्का,अब्जाधीशांच्या यादीत उलटफेर, कारण काय...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 AM : 26 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMumbai Babulnath Mandir Mahashivratri 2025 : महाशिवरात्रीनिमित्त बाबुलनाथ मंदिरात भाविकांची गर्दीTrimbakeshwar Parli Vaijnath Mahashivratri 2025 : महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंगांमध्ये दर्शनाची लगबगBhimashankar Mahashivratri 2025:महाशिवरात्रीनिमित्त भीमाशंकर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुस्लिम आई अन् पंजाबी वडिलांचा मुलगा आहे 'हा' 44 वर्षांचा अभिनेता; 100 वेळा इंडस्ट्रीत झाला रिजेक्ट, मग नशीब चमकलं अन्
मुस्लिम आई अन् पंजाबी वडिलांचा मुलगा आहे 'हा' 44 वर्षांचा अभिनेता; 100 वेळा इंडस्ट्रीत झाला रिजेक्ट, मग नशीब चमकलं अन्
Kolhapur ZP : कोल्हापूर जिल्हा परिषदेला तब्बल 57 कोटींचा गंडा घालण्याचा डाव, मुख्य लेखपालांच्या बनावट सही आणि स्टॅम्पचा वापर!
कोल्हापूर जिल्हा परिषदेला तब्बल 57 कोटींचा गंडा घालण्याचा डाव, मुख्य लेखपालांच्या बनावट सही आणि स्टॅम्पचा वापर!
Gaja Marne: 'ए त्याला मारा, माज आलाय...', मुरलीधर मोहोळांच्या माणसाला मारताना गजा मारणे स्पॉटवर? CCTV फुटेज समोर
'ए त्याला मारा, माज आलाय...', मुरलीधर मोहोळांच्या माणसाला मारताना गजा मारणे स्पॉटवर? CCTV फुटेज समोर
Elon Musk : जगातील अब्जाधीशांच्या यादीत उलटफेर, डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू एलन मस्क यांना धक्का, टेस्लाचे शेअर...
डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू एलन मस्क यांना धक्का,अब्जाधीशांच्या यादीत उलटफेर, कारण काय...
Mahakumbh 2025 : आज महाकुंभाचा शेवटचा दिवस, पहाटेपर्यंत 41 लाख भाविकांनी घेतली डुबकी; 45 दिवस चाललेल्या महाकुंभाची सांगता महाशिवरात्री उत्सव स्नानाने होणार
आज महाकुंभाचा शेवटचा दिवस, पहाटेपर्यंत 41 लाख भाविकांनी घेतली डुबकी; 45 दिवस चाललेल्या महाकुंभाची सांगता महाशिवरात्री उत्सव स्नानाने होणार
Govinda Reaction Amidst Divorce Rumors: 30 वर्षीय मराठी अभिनेत्रीसोबतचं अफेअर घटस्फोटाचं कारण? गोविंदा म्हणाला,
30 वर्षीय मराठी अभिनेत्रीसोबतचं अफेअर घटस्फोटाचं कारण? गोविंदा म्हणाला, "मी सध्या माझ्या..."
Shaktipeeth Highway: शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध, MSRDC चा मोठा निर्णय; कोल्हापुरला वळसा देत कोकणाकडे वळवणार?
शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध, MSRDC चा मोठा निर्णय; कोल्हापुरला वळसा देत कोकणाकडे वळवणार?
EPFO द्वारे यूपीएस योजना राबवली जाणार, सर्वांना पेन्शन देण्यासाठी सरकारचं पाऊल, योजनांचं एकत्रीकरण करणार
सर्वांना पेन्शन देण्याची सरकारची तयारी, EPFO द्वारे यूपीएस योजना राबवली जाणार, योजनांचं एकत्रीकरण करणार
Embed widget