एक्स्प्लोर

Naxalism : मार्च 2026 पर्यंत देशातील नक्षलवादाचा समूळ नाश करणार; अमित शाहांचा विश्वास

Naxalism In India : नक्षलवादाचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या जिल्ह्यांची संख्या फक्त 3 उरली आहे, पुढच्या वर्षापर्यंत पूर्ण नक्षलवाद संपवणार असल्याचा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी व्यक्त केला.

नवी दिल्ली : देशभरातून नक्षलवादाचे (Naxalism In India) जलदगतीने उच्चाटन होत असून पुढच्या वर्षी म्हणजे 31 मार्च 2026 पर्यंत देशातून नक्षलवाद संपणार असा विश्वास देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी व्यक्त केला. नक्षलवादाने सर्वाधिक प्रभावित असलेल्या जिल्ह्यांची संख्या कमी होऊन आता ती तीनवर आली आहे, तर देशातील केवळ 11 जिल्ह्यांमध्येच नक्षलवादाचा काहीसा प्रभाव उरला असल्याची माहिती अमित शाहांनी दिली.

एकेकाळी भारताच्या दहा राज्यांमधील 126 जिल्हे नक्षलप्रभावित होते. मात्र आता हा आकडा हाताच्या बोटावर मोजण्याइतपत मर्यादित झाला आहे. त्यात पुढच्या वर्षापर्यंत नक्षलवाद पूर्णपणे संपणार असल्याचा विश्वास अमित शाहांनी व्यक्त केला.

Amit Shah On Naxalism In India : काय म्हटलंय अमित शाहांनी?

अमित शाहांनी त्यांच्या सोशल मीडियावरुन नक्षलवादासंबंधी माहिती दिली. ते म्हणाले की, नक्षलवाद संपवण्यात ऐतिहासिक टप्पा पार पडला असून सर्वाधिक प्रभावित जिल्ह्यांची संख्या 6 वरून फक्त 3 वर आली आहे. तर नक्षलप्रभावित जिल्ह्यांची संख्या 18 वरून 11 पर्यंत कमी झाली आहे. मोदीजींच्या दहशतवादमुक्त भारताच्या दृष्टिकोनातून, बंडखोरीविरोधी अथक कारवाया आणि लोककेंद्रित विकास डाव्या विचारसरणीच्या अतिरेक्यांचा प्रभाव करत आहे. 31 मार्च 2026 पर्यंत, भारत नक्षलवादाच्या धोक्यापासून मुक्त होईल.

Bhupathi Surrender : नक्षलवादी भूपती महाराष्ट्र सरकारसमोर शरण

गडचिरोलीतील नक्षलवादविरोधी लढ्याला आज मोठं यश मिळालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत आज तब्बल 60 नक्षल्यांनी आपली शस्त्र खाली ठेवली. त्यात कुख्यात नक्षलवादी आणि नक्षल्यांच्या पॉलिट ब्युरोचा सदस्य सोनू उर्फ भूपती याचाही समावेश आहे. महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवर सक्रिय असलेला भूपती दीर्घकाळ नक्षल्यांचा रणनितीकार मानला जात होता. अनेक मोठ्या नक्षलवादी नेत्यांना घडवण्यात त्याची मोठी भूमिका होती. भूपतीनं आपल्या इतर साथीदारांसह आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला. भूपतीच्या आत्मसमर्पणानंतर नक्षलमुक्त महाराष्ट्राच्या मोहिमेला मोठं बळ मिळालं आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आत्मसर्पण केलेल्या नक्षल्यांना संविधानाची प्रत सुपूर्द केली.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कृषी समृद्धी योजनेला मंजुरी, शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार, 5668 कोटी मंजूर : दत्तात्रय भरणे
कृषी समृद्धी योजनेतून शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान : दत्तात्रय भरणे
Asia Cup : आशिया कप ट्रॉफीसाठी बीसीसीआयचं मोठं पाऊल, आयसीसीच्या बैठकीत मुद्दा मांडला, अखेर काय ठरलं?
आशिया कप साठी बीसीसीआयचं मोठं पाऊल, ICC च्या बैठकीत मुद्दा मांडला, काय घडलं? 
Rahul Gandhi on Parth Pawar : मतचोरी करुन बनलेल्या सरकारची जमीन चोरी, मोदीजी तुमचं शांत राहणं खूप काही सांगतं, पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी राहुल गांधींचा हल्लाबोल
पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण, राहुल गांधींचा राज्य सरकारवर हल्लाबोल अन् थेट मोदींना सवाल
नितेश राणेंनी पालकमंत्री म्हणून भान ठेवलं पाहिजे; महायुतीवरुन दीपक केसरकरांचा राणेंना घरचा अहेर
नितेश राणेंनी पालकमंत्री म्हणून भान ठेवलं पाहिजे; महायुतीवरुन दीपक केसरकरांचा राणेंना घरचा अहेर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Land Scam: '…या प्रकरणी कारवाई केली जाईल', पोलीस आयुक्त Amitesh Kumar यांचा इशारा
Parth Pawar Land Scam:: रद्द केला व्यवहार, वाचणार पार्थ पवार? Special Report
Lonar Lake : लोणारच्या खाऱ्या पाण्यात चक्क मासे, पर्यावरणाला मोठा धोका Special Report
Manoj Jarange vs Dhananjay Munde : जरांगेंच्या हत्येचा कट? कोण जानी दुश्मन? Special Report
Devendra Fadnavis : जमीन व्यवहार प्रकणात कुणालाही सोडणार नाही,दोषींवर कारवाई होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कृषी समृद्धी योजनेला मंजुरी, शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार, 5668 कोटी मंजूर : दत्तात्रय भरणे
कृषी समृद्धी योजनेतून शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान : दत्तात्रय भरणे
Asia Cup : आशिया कप ट्रॉफीसाठी बीसीसीआयचं मोठं पाऊल, आयसीसीच्या बैठकीत मुद्दा मांडला, अखेर काय ठरलं?
आशिया कप साठी बीसीसीआयचं मोठं पाऊल, ICC च्या बैठकीत मुद्दा मांडला, काय घडलं? 
Rahul Gandhi on Parth Pawar : मतचोरी करुन बनलेल्या सरकारची जमीन चोरी, मोदीजी तुमचं शांत राहणं खूप काही सांगतं, पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी राहुल गांधींचा हल्लाबोल
पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण, राहुल गांधींचा राज्य सरकारवर हल्लाबोल अन् थेट मोदींना सवाल
नितेश राणेंनी पालकमंत्री म्हणून भान ठेवलं पाहिजे; महायुतीवरुन दीपक केसरकरांचा राणेंना घरचा अहेर
नितेश राणेंनी पालकमंत्री म्हणून भान ठेवलं पाहिजे; महायुतीवरुन दीपक केसरकरांचा राणेंना घरचा अहेर
शरद पवारांच्या खासदारकीची गोपीचंद पडळकरांना चिंता; म्हणाले, 10 आमदारांवर राज्यसभेत कसं जाणार?
शरद पवारांच्या खासदारकीची गोपीचंद पडळकरांना चिंता; म्हणाले, 10 आमदारांवर राज्यसभेत कसं जाणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 नोव्हेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 नोव्हेंबर 2025 | शुक्रवार
मोठी बातमी! अखेर पुण्यातील जमिनीचा व्यवहार रद्द, अजित पवारांनी दिली माहिती; कुणाचे फोन आले, कुणी मदत केली सर्व चौकशी होणार
मोठी बातमी! अखेर पुण्यातील जमिनीचा व्यवहार रद्द, अजित पवारांनी दिली माहिती; कुणाचे फोन आले, कुणी मदत केली सर्व चौकशी होणार
Shiv Nadar : दररोज एक दोन नव्हे तब्बल 7 कोटी रुपये दान, शिव नादर यांनी एका वर्षात किती कोटी रुपये दान केलं? पहिल्या स्थानावर कोण?
दररोज एक दोन नव्हे तब्बल 7 कोटी रुपये दान, शिव नादर यांनी एका वर्षात किती कोटी रुपये दान केलं? पहिल्या स्थानावर कोण?
Embed widget