एक्स्प्लोर

50 वर्ष सत्तेत राहण्याचं स्वप्न पाहा, अमित शाहांचा कार्यकर्त्यांना सल्ला

आगामी 50 वर्षात सत्तेत राहण्याचं स्वप्न पाहा, असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं.

गाझियाबाद : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला आहे. आगामी 50 वर्षात सत्तेत राहण्याचं स्वप्न पाहा, असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं. अमित शाह म्हणाले की , "निवडणुकीतील विजयाची कल्पना ही केवळ पाच वर्ष, दहा वर्ष, 15 वर्ष करु नका. तर ज्या प्रमाणे काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून प्रदीर्घकाळ ग्रामपंचायत ते पार्लिमेंटचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून राज्य केले. त्याच प्रमाणे 50 वर्ष सत्तेत राहण्याचा संकल्प करा." ते पुढे म्हणाले की, "केवळ निवडणुकीत विजय मिळवणं, इतकंच आपलं लक्ष्य असून उपयोग नाही. तर विकासाच्या प्रक्रियेत शेवटच्या घटकापर्यंत काम पोहोचलं पाहिजे. गेल्या चार वर्षात मोदी सरकारने एकही काम असे केलं नाही, ज्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांना अपमान सहन करावा लागेल. सरकारच्या कामामुळे कार्यकर्ते ताठ मान करुन जनतेत जात आहेत." सर्जिकल स्ट्राईकबाबत बोलताना अमित शाह म्हणाले की, "आम्हाला देशात शांतता हवी आहे. त्यासाठी देशाच्या सीमा बळकट करणं, यावर आमचा विशेष भर आहे. सर्जिकल स्ट्राईकनंतर जगातील इतर देशांचा भारताकडे पाहाण्याचा दृष्टीकोन बदलला आहे." स्वच्छ भारत अभियानाबाबत बोलताना अमित शाह म्हणाले की, "स्वच्छ भारतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील प्रत्येक गावात शौचालये बांधण्याचा संकल्प केला आहे. पण काँग्रेस त्याची खिल्ली उडवत आहेत. पण तरीही मोदी सरकारने देशभरात 7.5 कोटी पेक्षा जास्त शौचालये बांधून महिलांना सन्माने जगण्याचा अधिकार दिला." दरम्यान, अमित शाहांच्या वक्तव्याचा काँग्रेसने चांगलाच समाचार घेतला. अमित शाह हे अतिशय घाबरलेले सेनापती असल्याचं सांगत, काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी भाजपवर तोंडसुख घेतलं आहे. सुरजेवाला म्हणाले की, "अहंकाराने मदमस्त झालेले अमित शाह हे विसरत आहेत की, हा देश लोकशाही व्यवस्था मानणारा आहे. तुम्हाला जनतेने पाच वर्षांसाठी निवडणून दिलं आहे, 50 वर्षांसाठी नाही. जर तुम्हाला लोकशाही संपवायची असेल, तर ती संपवता येणार नाही. या देशातील जनताच निर्णय करेल की, पुढची पाच वर्ष कुणाच्या हातात सत्ता द्यायची. जनमत बदलत आहे. मतदार त्यांना घरचा रस्ता दाखवण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे घाबरलेले अध्यक्ष लोकशाहीविरोधी वक्तव्य करत आहेत."
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Dombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!Dombivli Blast Public Reaction : संसार उघड्यावर पडला, भरपाई कोण देणार ? डोंबिवलीकर संतप्तTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 10 PM : 23 May 2024: ABP MajhaDombivli Boiler Blast Special Report : डोंबिवलीत मृत्यूचे कारखाने...आजपर्यंत किती स्फोट झाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
Embed widget