एक्स्प्लोर
अमित शाहांना मंत्रीपद नको, भाजपाध्यक्ष पदावर कायम रहायचं आहे : सूत्र
भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी गुजरातच्या गांधीनगरमधूल लोकसभा निवडणूक लढली. मोठ्या मताधिक्याने शाह या निवडणुकीत जिंकले. त्यानंतर आता शाहांना केंद्रात एखादे मोठे मंत्रीपद दिले जाईल, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत आहे.
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी गुजरातच्या गांधीनगरमधूल लोकसभा निवडणूक लढली. मोठ्या मताधिक्याने शाह या निवडणुकीत जिंकले. त्यानंतर आता शाहांना केंद्रात एखादे मोठे मंत्रीपद दिले जाईल, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत आहे. परंतु या चर्चांना पूर्णविराम मिळणार असल्याचे दिसत आहे. अमित शाह यांना केंद्रात मंत्रीपद नको आहे, त्यांना भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदावर कायम राहायचे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला मोठे यश मिळवून देण्यात शाह यांचा महत्वाचा वाटा आहे. त्यामुळे शाह यांना मोदींच्या मंत्रीमंडळात महत्त्वाचे मंत्रीपद मिळेल, अशा शक्यता वर्तवण्यात येत होत्या. काही वृत्तपत्रांनी शाह यांना गृहमंत्रीपद मिळेल, असे भाकित केले होते. परंतु ही सर्व भाकितं खोटी ठरतील. टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार शाह मोदींच्या मंत्रीमंडळात नसतील. ते पक्षाध्यक्ष पदावर कायम राहणार आहेत.
अमित शहा हे मंत्री होण्यास इच्छूक नाहीत. त्यांना पक्षाच्या अध्यक्षपदी कायम राहायचे आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे, दरम्यान भारतीय जनता पक्षाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती घोषित करण्यात आलेली नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement