एक्स्प्लोर

दावोसमधून महत्वाची बातमी समोर! हैदराबादमध्ये होणार 20000 कोटींची गुंतवणूक, नोकरीच्या मोठ्या संधी

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. हैदराबादमध्ये मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

Hyderabad Job News : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. हैदराबादमध्ये मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. अमेरिकन कंपनी टिलमन ग्लोबल होल्डिंग्ज 15,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह तेलंगणामध्ये 300 मेगावॅट क्षमतेचे अत्याधुनिक डेटा सेंटर उभारणार आहे. कंपनीने यासाठी तेलंगणा सरकारसोबत सामंजस्य करार केला आहे.

दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) दरम्यान ही घोषणा करण्यात आली असल्याची माहिती तेलंगणा सरकारने एका निवेदनात दिली आहे. यामध्ये ऊर्जा कार्यक्षम प्रणाली, प्रगत शीतकरण तंत्रज्ञान आणि मजबूत सायबर सुरक्षा उपायांचा समावेश असणार आहे. ज्यामुळं तेलंगणाच्या डिजिटल इकोसिस्टममध्ये नावीन्यपूर्णतेला चालना मिळेल. तेलंगणाचे उद्योग मंत्री डी. श्रीधर बाबू यांनी दिलेल्या माहितीनुसार, टिलमन ग्लोबल होल्डिंग्जची गुंतवणूक आमच्या राज्याची गुंतवणूकदार-अनुकूल धोरणे आणि जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांना आकर्षित करण्याची क्षमता दर्शवते. टिलमन ग्लोबल होल्डिंग्ससोबतची ही भागीदारी जागतिक डेटा सेंटर हब म्हणून हैदराबादची प्रतिष्ठा आणखी वाढवेल. टिलमन ग्लोबल होल्डिंग्जचे अध्यक्ष सचित आहुजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, तेलंगणा दूरदर्शी नेतृत्व, भक्कम पायाभूत सुविधा आणि प्रतिभावान कार्यबल यांचे आदर्श उदाहरण आहे. 

दरम्यान, गुंतवणूक आणि पायाभूत सुविधांमध्ये जागतिक आघाडीवर असलेल्या ब्लॅकस्टोनने 4,500 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह येथे अत्याधुनिक 150 मेगावॅट डेटा सेंटर सुविधेची स्थापना करून डेटा सेंटर वातावरणात प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. यासंदर्भातील सामंजस्य करार तेलंगणा सरकार आणि ब्लॅकस्टोन लुमिना (ब्लॅकस्टोनचे डेटा सेंटर युनिट) आणि जेसीके इन्फ्रा यांच्यात बुधवारी दावोस येथे झालेल्या WEF बैठकीत करण्यात आला, असे सरकारने एका निवेदनात म्हटले आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : दावोस दौऱ्यात ६१ एमओयू केलेत,  एकूण १५ लाख ७१ कोटींची गुंतवणूक- फडणवीसDattatray Bharne Pune | क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे हॉलीबॉल खेळताना जमिनीवर कोसळले ABP MajhaPune : पुण्यात क्रौर्याची परिसीमा गाठली, शिलाई मशीनच्या कात्रीनं पतीने पत्नीची हत्या केल्याची घटनाNanded  : नांदेडच्या परांडात अंधश्रद्धेच्या कारणावरून 7 वर्षीय चिमुरडीचं अपहरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट
शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
Parli : आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Embed widget