कडी पत्त्याच्या नावाखाली अमेझॉनवरुन तब्बल एक टन गांजाची तस्करी, दोघांना अटक
विशाखापट्टनमहून मध्य प्रदेशमध्ये कडी पत्त्याच्या नावाखाली गांजाची (Marijuana) ही तस्करी होत होती.

भोपाळ : अमेझॉन या ऑनलाईन शॉपिंगच्या माध्यमातून गांजाची (Marijuana) मोठी तस्करी होत असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी 20 किलो गांजासह दोन आरोपींना अटक केली आहे. मध्य प्रदेश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, से ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon च्या माध्यमातून विशाखापट्टनमवरून मध्य प्रदेशमध्ये कडी पत्त्याच्या नावाखाली गांजाची ही तस्करी होत होती. आतापर्यंत जवळपास एक टन गांजाची तस्करी केल्याचं समोर आलं आहे.
या प्रकरणी सूरज उर्फ कल्लू आणि पिंटू उर्फ बिजेंद्रल सिंह तोमर या दोन आरोपींनी अटक केली आहे. 20 किलो गांजाची एक खेप विशाखापट्टनमवरुन अमेझॉनच्या माध्यमातून मागवली होती. भिंड जिल्ह्यातील पोलीस अधिक्षक मनोज कुमार यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं की, गेल्या चार महिन्यांपासून अमेझॉनवरुन ही तस्करी सुरु होती. त्यामध्ये तब्बल एक टन गांजाची तस्करी करण्यात आली आहे. याची किंमत ही एक कोटी 10 लाख रुपये असल्याचं सांगण्यात येतंय.
या दोन्ही आरोपींची अधिक चौकशी केली असता त्यांच्या आणखी एका सहकाऱ्याची माहिती समोर आली आहे. त्याला पोलिसांनी हरिद्वारमधून अटक केली आहे. आरोपी सूरज हा कडी पत्त्याच्या नावाखाली ग्वाल्हेर, भोपाळ, कोटा, आग्रा आणि इतर ठिकाणी मादक पदार्थांची तस्करी करत होता. या व्यापारात अमेझॉनची भागिदारी ही 66.66 टक्के इतकी होती. आरोपी सूरजने एका कपड्याच्या कंपनीच्या नावाखाली हर्बल उत्पादनं आणि कडी पत्ता उत्पादनाचा विक्रेत्याच्या नावाखाली रजिस्ट्रेशन केलं होतं. त्यानंतर त्याला अमेझॉनवर बारकोड मिळाला होता.
या घटनेची दखल CAIT इंडियाने घेतली असून त्यांनी अमेझॉनकडून खुलासा मागवला आहे. अशा प्रकारचा अवैध व्यापार अमेझॉनच्या माध्यमातून होत असून तो घातक आहे. मनी लॉंड्रिंग आणि इतर प्रकारच्या अपराधासाठी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर होत असेल तर त्याचा वापर देशविघातक कृत्यासाठी केला जाण्याची जास्त शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Mumbai Drug Case: आर्यन खानला गांजा दिला होता, अनन्याने NCB ला दिली माहिती
- 'या' देशात कोरोनाची लस घेतल्यानंतर रेस्टॉरन्टमध्ये मोफत जेवण, बीयर, दारू, गांजा आणि बरंच काही....
- गांजा तस्करीत गुंतलेल्या हैदराबादच्या शिक्षकाला अटक, नागपूर पोलिसांची कारवाई
Before You Go
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल





















