Amarnath Yatra Suspended : अमरनाथमध्ये मुसळधार पावसामुळे यात्रा स्थगित, हजारो भाविकांना सुरक्षित स्थळी हलवलं
Amarnath Yatra Suspended : अमरनाथ गुहेजवळ पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण झाली आहे. खबरदारी म्हणून प्रशासनाने अमरनाथ यात्रा पुढील काही काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
Amarnath Yatra Suspended : मुसळधार पावसामुळे अमरनाथ गुहेजवळ पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण झाली आहे. खबरदारी म्हणून प्रशासनाने अमरनाथ यात्रा पुढील काही काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. गुहेच्या आजूबाजूच्या डोंगरात पडलेल्या पावसामुळे आज दुपारी तीनच्या सुमारास जलाशय आणि जवळचे झरे तुडुंब भरले. गुहेजवळ पूर आल्यामुळे तत्काळ अलर्ट जारी करण्यात आला असून आतापर्यंत चार हजार पेक्षा जास्त भाविकांना पूर बाधित क्षेत्रातून बाहेर काढण्यात आले आहे.
अमरनाथ गुहेजवळ यापूर्वी 8 जुलै रोजी ढगफुटी झाली होती. या घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला होता तर 40 हून अधिक जण बेपत्ता झाले होते. 8 जुलै रोजी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास ढगफुटी झाली होती. या ढगफुटीमुळे गुहेजवळ बांधलेले अनेक तंबू नष्ट झाले होते. सुरक्षा दलांच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी तातडीने बचावकार्य सुरू केले होते. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी लष्कराच्या हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला. त्यानंतर 16 जुलै रोजी पुन्हा यात्रा सुरू करण्यात आली होती.
अडीच लाख भाविकांनी घेतले बाबा बर्फानींचे दर्शन
43 दिवसांची अमरनाथ यात्रा 30 जून रोजी सुरू झाली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी आतापर्यंत अडीच लाखांहून अधिक भाविकांनी पवित्र गुहेत बाबा बर्फानींचे दर्शन घेतले आहे.
36 भाविकांचा मृत्यू
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षी अमरनाथ यात्रेदरम्यान 36 यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. यात 8 जुलै रोजी अमरनाथ गुहेजवळ झालेल्या ढगफुटीनंतर आलेल्या पुरात 15 यात्रेकरूंना आपला जीव गमवावा लागला. महाराष्ट्रातून देखील लाखो भाविक अमरनाथ यात्रेसाठी गेले आहेत. या पूर्वी पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील दोन भाविकांचा यात्रेदरम्यान मृत्यू झाला होता. तर 22 जुलै रोजी नाशिक शहरातील जे रंजना रामचंद्र शिंदे यांचे अंबरनाथ यात्रेदरम्यान निधन झाले.
महत्वाच्या बातम्या
Nashik News : अमरनाथ यात्रेला गेलेल्या नाशिकच्या भाविक महिलेचा मृत्यू, काही अंतरावर होती अमरनाथ गुहा