'अमर जवान ज्योती' वरुन राजकारण तापलं! विलिनीकरणावरुन राहुल गांधींची टीका, भाजपचं प्रत्युत्तर
'अमर जवान ज्योती' च्या विलिनीकरणाबाबत ट्वीट शेअर करून राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी टीका केली आहे.
Amar Jawan Jyoti : इंडिया गेट (India Gate) लॉनवरील अमर जवान ज्योती (Amar Jawan Jyoti) ही आज (शुक्रवार) नॅशनल वॉर मेमोरियल (National War Memorial) मशालीमध्ये विलीन केली जाणार आहे. 'अमर जवान ज्योती' च्या या विलिनीकरणाबाबत ट्वीट शेअर करून राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी टीका केली आहे.
राहुल गांधी यांचं ट्वीट
राहुल गांधी यांनी ट्वीटमध्ये लिहिले, 'आपल्या शूर सैनिकांसाठी प्रज्वलित केलेली अमर ज्योत आज विझणार आहे, ही अत्यंत दु:ख देणारी गोष्ट आहे. काही लोक देश प्रेम आणि बलिदान समजू शकत नाहित. आम्ही आपल्या सैनिकांसाठी अमर ज्योत पुन्हा प्रज्वलित करणार आहोत. '
बहुत दुख की बात है कि हमारे वीर जवानों के लिए जो अमर ज्योति जलती थी, उसे आज बुझा दिया जाएगा।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 21, 2022
कुछ लोग देशप्रेम व बलिदान नहीं समझ सकते- कोई बात नहीं…
हम अपने सैनिकों के लिए अमर जवान ज्योति एक बार फिर जलाएँगे!
भाजप सरकारच्या सूत्रांनी या संबंधित त्यांचे मत व्यक्त केले आहे. त्यांनी सांगितले, 'ज्यांनी 7 दशके राष्ट्रीय युद्ध स्मारक बांधले नाही ते आता आपल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्याबाबत बोलत आहेत.'
'अमर जवान ज्योत ही 1971 आणि इतर युद्धातील हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी होती, परंतु त्या हुतात्म्यांची नावे आणि पत्ते तेथे लिहिले गेले नाहित. इंडिया गेटवर कोरलेल्या नावांमध्ये पहिल्या महायुद्धात आणि अँग्लो-अफगाण युद्धात लढलेल्या काही हुतात्म्यांच्या नावांचा समावेश आहे. त्यामुळे ते आपल्या वसाहतवादी भूतकाळाचे प्रतिक आहे, असं म्हणता येईल. 1971 च्या युद्धापूर्वी आणि नंतरच्या युद्धात शहिद झालेल्या जवानांची नावे राष्ट्रीय युद्ध स्मारकात नमूद करण्यात आली आहेत', असंही भाजप सरकारकडून सांगण्यात आलं.
आज दुपारी साढे तीन वाजता एक कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमात अमर जवान ज्योतीला नॅशनल वॉर मेमोरियलच्या मशालीमध्ये विलीन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफचे प्रमुख एअर मार्शल बालबध्रा राधा कृष्ण हे अध्यक्षस्थानी असतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. दोन मशालींची देखभाल करणे दिवसेंदिवस कठीण होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे, सूत्रांनी सांगितले.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- पंतप्रधान मोदी जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते, जो बायडेन आणि बोरिस जॉन्सन यांना टाकलं मागे
- Amar Jawan Jyoti : अमर जवान ज्योती राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या मशालीमध्ये होणार विलीन
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha