एक्स्प्लोर
Advertisement
स्पेशल रिपोर्टः अजित डोभाल... भारताचा चाणक्य
नवी दिल्लीः ऑपरेशन म्यानमार आणि आता ऑपरेशन पीओके या भारताच्या मोहिमा यशस्वी करण्यामागे एक मास्टरमाईंड आहे. या मास्टरमाईंडला भारताचा चाणक्य ही उपमा दिली तरी अतिशयोक्ती ठरणार नाही.
अजित डोभाल असं या शत्रूच्या काळजाला धडकी भरवणाऱ्या व्यक्तिचं नाव आहे. डोभाल यांचं वय 70 वर्षे आहे, मात्र कामगिरी तरुणालाही लाजवणारी आहे. ऑपरेशन पीओकेनंतर भारताचा हा एक्का पुन्हा एकदा सिद्ध झाला.
ऑपरेशन पीओकेआधी जून 2015 मध्ये ऑपरेशन म्यानमार हे एक असंच ऑपरेशन राबवण्यात आलं होतं. अजित डोभाल हेच नाव या ऑपरेशनचं मास्टर माईंड होतं. म्यानमारच्या हद्दीत तब्बल 2 किलोमीटर आत घुसून 100 फुटीरतावाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. 4 जून 2015 ला मणिपूरच्या चंदेलमध्ये 18 जवानांच्या बलिदानाचा हा बदला होता.
तगडा अनुभव पाठीशी
- इंदिरा गांधींसोबत अजित डोभाल यांना कामाचा अनुभव
- अटबिहारी वाजपेयी यांनाही अजित डोभाल यांची साथ
- आजही पंतप्रधान मोदींच्या दहशतवादविरोधी मोहिमेचा हुकमी चेहरा
- 48 वर्षांची सेवा, एकही कामगिरी फ्लॉप नाही
- 1999 च्या कंधार विमान अपहरण प्रकरणातील चर्चेत महत्त्वाची भूमिका
- आईसी 814 विमानातील 176 प्रवाशांची सुखरुप सुटका
- 80 च्या दशकात मिझो नॅशनल आर्मीच्या दहशतवाद्यांचा खात्मा
- या पराक्रमामुळे इंदिरा गांधींकडून भारतीय पोलीस पदक प्रदान
- पोलीस पदकासाठी 17 वर्षांची अट असताना 6 व्या वर्षीच सन्मान
- सेनेचे अधिकारी नसतानाही 1988 मध्ये कीर्ति चक्र सम्मान
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement