एक्स्प्लोर
एअर इंडियाची सुपर सेल ऑफर, 1499 रु. विमान प्रवास
मुंबई: एअर इंडियानं अवघ्या 1500 रुपयात विमान प्रवास करता येणार आहे. देशांर्तग प्रवासासाठी सुपर सेल ऑफर देण्यात आली आहे. सर्वात कमी किंमत 1499 रु. आहे. ज्यामध्ये टॅक्सचाही समावेश आहे. सुपर सेलची ही खास ऑफर 21 मे ते 25 मे या दरम्यान बुकिंग करता येणार आहे.
या ऑफरनुसार, जुलै ते 30 सप्टेंबरपर्यंत प्रवास करता येणार आहे. यासाठी 25 मेपर्यंत तिकीट बुक करता येणार आहे. त्यामुळे 1499 रुपयात देखील तिकीट बुक करता येणार आहे. जुलै-सप्टेंबर आणि जानेवारी-मार्च यादरम्यान, वर्षभराच्या तुलनेने कमी प्रवासी प्रवास करतात.
मागील आठवड्यात स्पाइसजेट, इंडिगो आणि एअर एशिया इंडिया या तीन विमान कंपन्यांनी अशाच ऑफर आणल्या आहेत. स्पाइसजेटनं अवघ्या 511 रुपयात तर इंडिगोनं अवघ्या 800 रु. विमान प्रवासाची ऑफर आणली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement