Air India Plane Crash Ahmedabad : कसा असतो ब्लॅक बॉक्स? अपघाताच्या कारणांपर्यंत पोहोचता येणार, जाणून घ्या सविस्तर माहिती
अपघाताआधी नेमकं काय घडलं याचा अंदाज येऊ शकेल अशी काही उपकरणं विमानात असतात. ब्लॅक बॉक्स अशा उपकरणांपैकीच एक. जाणून घेऊयात याबाबतची सविस्तर माहिती.

Air India Plane Crash Ahmedabad : गुजरातमधील अहमदाबादमध्ये विमानाचा मोठा अपघात (Air India Plane Crash Ahmedabad ) झाल्याची घटना गुरुवारी घडली. या अपघातात एकूण 265 जणांचा मृत्यू झाला असून, यामध्ये विमानातील 241 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या घटनेनंतर शोध सुरु झाला आहे कारणांचा आणि उपकरणांचा. अपघाताआधी नेमकं काय घडलं याचा अंदाज येऊ शकेल अशी काही उपकरणं विमानात असतात. ब्लॅक बॉक्स अशा उपकरणांपैकीच एक आणि दुसरं नाव म्हणजे DVR अर्थात डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर. हे आजुबाजुच्या विमानांच्या सीसीटीव्हीचं फुटेज असतं. अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर विमानाचा ब्लॅक बॉक्स यंत्रणांच्या हाती आला आहे.
कसा असतो ब्लॅक बॉक्स?
नाव ब्लॅक बॉक्स असलं तरी हा बॉक्स ऑरेंज म्हणजेच नारंगी रंगाचा असतो.
अपघात स्थळी दूरवरून दिसावा यासाठी त्याचा रंग ऑरेंज असतो.
विमानाच्या मागील भागात असतो दुर्घटनेच्या काळातही या भागाचं तुलनेनं कमी नुकसान होतं
ब्लॅक बॉक्समध्ये दोन उपकरणं असतात एक कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर, यातून वैमानिक, क्रू यांच्यातील संवाद, ट्राफिक कंट्रोलच्या सूचना, नेहेमीचे रेडिओ ट्रान्समिशन, इंजिनचा आवाज कळतो.
दुसरं डिवाईस असतं फ्लाईट डेटा रेकॉर्डर, यात विमान किती उंचीवर, किती वेगाने, कोणत्या दिशेने उडतंय याची माहिती असते.
हा बॉक्स काही काळ आगीत राहिला तरी सुरक्षित राहतो, एक तासभर 1100 अंश सेल्सिअस एवढं प्रचंड तापमान सहन करु शकतो.
कित्येक महिने पाण्यात राहिला तरीही बॉक्स आणि आतील माहिती सुरक्षित राहते.
20 हजार फूट खोल पाण्याचा दबाव सहन करु शकतो आणि आपली जागा कळावी यासाठीचे सिग्नल देत राहतो
एप्रिलपासून भारतात ब्लॅक बॉक्स एनालिसिस करण्याची लॅब सुरु झाली
एप्रिल पासून भारतात ब्लॅक बॉक्स एनालिसिस करण्याची लॅब सुरु झाली आहे. त्याचीही मदत तपास कामात घेतली जाईल. या ड्रिमलायनर विमानाचे आयुष्य साधारण 40 वर्ष असते, काल अपघात झालेलं विमान हे केवळ 15 वर्षचे होते म्हणजे हे विमान एक प्रकारे तरुण असल्याचं तज्ञ सांगतात. सर्वात आधी ब्लॅक बॉक्ससमधून डीएफडीआर आणि सीडीआर काढतील आणि तपासातील. कॉकपीटमध्ये वैमानिकांची काय चर्चा झाली हे कळेल. एक दोन महिन्यांनी कंपन्यांना मॉनिटर करायचे असते. फ्लाईटसंदर्भात टेक ऑफ दे वर जाईपर्यंत फक्त विमानासंदर्भात बोलायचं असतं. ज्याला स्टराईल कॉकपीट म्हणतात. दोन्ही इंजिनचा थ्रस्ट 80 टक्के कमी झाला होता हे स्पष्ट दिसत आहे.
एटीएस म्हणजे दहशतवाद विरोधी पथकाने अपघातस्थळी फोरेन्सिक तपास केला आहे. ब्लॅक बॉक्स सापडल्याने तपास यंत्रणांना या अपघाताच्या कारणांपर्यंत पोहोचता येईल. आत्तापर्यंत थेट बोललं गेलं नसलं तरी घातपाताची काही शक्यता आहे का? हे सुद्धा तपास यंत्रणांकडून तपासलं जाईल.
महत्वाच्या बातम्या:
Air India Plane Crash In Ahmedabad: एअर इंडियाच्या दुर्घटनाग्रस्त विमानाचा Black Box सापडला; अपघाताच्या कारणांचा उलगडा होणार, A टू Z समजणार!























