एक्स्प्लोर
एअर अॅम्ब्युलन्सचं नजफगडमध्ये इमर्जन्सी लँडिंग
नवी दिल्ली : पाटणाहून दिल्लीला जाणाऱ्या एअर अॅम्ब्युलन्सची नजफगडमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली. विमानतळाच्या शेजारीच असलेल्या एका शेतात या एअर अॅम्ब्युलन्सचं आज दुपारी 2 वाजून 45 मिनिटांनी लँडिंग झालं.
अल्केमिस्ट एअरलाईन्सचं हे एअर अॅम्ब्युलन्स पाटणाहून दिल्लीला जात होत. विमानात एकूण सात प्रवासी होते.
पोलिसांच्या माहितीनुसार, विमानातील सर्व सात प्रवासी सुरक्षित आहे. या सात जणांमध्ये एका डॉक्टरचाही समावेश आहे. इमर्जन्सी लँडिंगच्या वेळी एकाला दुखापत झाली आहे. दोन्ही इंजिनात बिघाड झाल्याने अॅम्ब्युलन्सची इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली.
"पाटणाच्या ज्या रुग्णाला एअर अॅम्ब्युलन्समधून दिल्लीला आणलं जात होतं तो रुग्णालयात पोहोचला आहे. देवेंद्र याच्यावर उपचार सुरु झाले आहेत," अशी माहिती मेदांता हॉस्पिटलचे प्रवक्ते जुगल शर्मा यांनी सांगितलं.
पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement