एक्स्प्लोर
देशभरातील 800 इंजिनीअरिंग कॉलेजेसना टाळं लागणार
कॉलेजमध्ये देण्यात येणाऱ्या अपुऱ्या सुविधा आणि विद्यार्थ्यांची अपुरी संख्या या दोन प्रमुख कारणांसाठी देशातल्या 800 इंजिनीअरिंग कॉलेजेस बंद करण्यात येणार आहे.

मुंबई : देशभरातले 800 इंजिनीअरिंग कॉलेजेसना लवकरच टाळं लागू शकतं. कारण ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन म्हणजेच एआयसीटीईनं या प्रस्तावावर गांभीर्यानं विचार सुरु केला आहे. कॉलेजमध्ये देण्यात येणाऱ्या अपुऱ्या सुविधा आणि विद्यार्थ्यांची अपुरी संख्या या दोन प्रमुख कारणांसाठी देशातल्या 800 इंजिनीअरिंग कॉलेजेस बंद करण्यात येणार आहे. ज्या राज्यातील कॉलेजेस बंद करण्यात येणार आहे त्यामध्ये महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटकचा समावेश आहे.
आणखी वाचा























