Air India Plane Crash : अहमदाबादमध्ये विमानाचा अपघात का झाला? पायलट असलेल्या 'या' युट्यूबरने सांगितलं कारण
Ahmedabad Plane Crash : अहमदाबादमध्ये विमानाचा नेमका का अपघात झाला? याबाबतचे कारण युट्यूबर आणि माजी पायलट गौरव तनेजा यांनी दिले आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलंय ते सविस्तर पाहुयात.

Ahmedabad Plane Crash : अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात झाल्याची घटना घडली आहे. 242 प्रवाशांसह अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरुन लंडनसाठी उड्डाण घेतलेलं विमान (Airplane)अवघ्या 7 मिनिटांत खाली कोसळलं आहे. एअर इंडियाच्या Boeing Dreamliner 787 विमानातील सर्वच्या सर्व 242 प्रवाशांचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. एपी न्यूजने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. दरम्यान, नेमका हा अपघात का झाला? याबाबतचे कारण युट्यूबर आणि माजी पायलट गौरव तनेजा यांनी दिले आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलंय ते सविस्तर पाहुयात.
युट्यूबरने काय लिहिले आहे?
अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर, युट्यूबर आणि माजी पायलट गौरव तनेजा यांनी अपघात का झाले याचे कारण सांगितले आहे. त्यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करुन असे का घडले असावे याची माहिती दिली आहे. युट्यूबवर गौरव तनेजा हे 'फ्लाइंग बीस्ट' नावाचे चॅनल चालवतात. ते माजी कमर्शियल पायलट होते. अहमदाबाद विमान अपघाताबाबत माहिती देताना ते म्हणाले की, 'उड्डाणाच्या वेळी विमानाची दोन्ही इंजिन निकामी झाल्याची शक्यता आहे. या आधुनिक विमानात उड्डाणानंतर लगेचच वीज पूर्णपणे बंद पडल्याने विमान अशा प्रकारे बिघडू शकते, अशी माहिती युट्यूबवर गौरव तनेजा यांनी दिली आहे.
युट्यूबवर गौरव तनेजा यांनी व्यक्त केलं दुःख
युट्यूबवर गौरव तनेजा यांनी विमान अपघाताचे संभाव्य कारण स्पष्ट करताना या अपघातात मृत्यू झालेल्यांसाठी प्रार्थनाही केली आहे. अतिशय दुःख घटना असल्याचे तनेजा म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:


















