एक्स्प्लोर

गुजरात विमान अपघातात 241 जणांचा मृत्यू, एक जण बचावला

गुजरातच्या अहमदाबादमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेत विमानातील सर्वच्या सर्व 242 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त असोसिएट प्रेस (AP) वृत्तसंस्थेने दिलं होतं. मात्र या अपघातातून आश्चर्यकारकरित्या एक जण बचावला आहे.

अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद विमान (Ahmedabad plane crash) दुर्घटनेचा व्हिडिओ समोर आला अन् अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. 242 प्रवाशांसह अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरुन लंडनसाठी उड्डाण घेतलेलं विमान (Airplane)अवघ्या 7 मिनिटांत खाली कोसळलं. विमान दुर्घटनेचे वृत्त समोर येताच विमानातील प्रवाशांसाठी प्रार्थना होऊ लागल्या. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने व बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेत मदतीला सुरुवात केली. मात्र, दुर्घटनेचा व्हिडिओ पाहून मनात जी शंका न राहून होती होती, अखेर तेच घडलं. एअर इंडियाच्या Boeing Dreamliner 787 विमानातील सर्वच्या सर्व 242 प्रवाशांचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र या अपघातातून आश्चर्यकारकरित्या एक जण बचावला आहे.  एपी न्यूजने यासंदर्भातील वृत्त दिले असून गुजरामधील (Gujarat) पोलीस आयुक्तांशी संवाद साधल्यानंतर ही माहिती समोर आली आहे.  

गुजरातच्या अहमदाबादमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेत विमानातील सर्वच्या सर्व 242 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त असोसिएट प्रेस (AP) वृत्तसंस्थेने दिलं होतं. मात्र या अपघातातून आश्चर्यकारकरित्या एक जण बचावला आहे. त्यामुळे 242 पैकी 241 जणांचा मृत्यू झाला. महत्त्वाचं म्हणजे या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे सुद्धा प्रवास करत होते. एअर इंडियाचे Boeing Dreamliner 787 हे विमान अहमदाबादवरुन लंडनकडे निघालं होतं. दुपारी 1 वाजून 31 मिनिटांनी विमानानं लंडनसाठी उड्डाण केल्यानंतर अवघ्या 7 मिनिटात हे विमान कोसळलं. विमानाने हवेत टेक ऑफ केल्यानंतर जवळच असलेल्या मेघानी नगर (Meghani Nagar) या दाट लोकवस्तीच्या भागात जाऊन हे विमान कोसळले (plane crash).  या विमानात 12 क्रू मेंबर्स आणि 230 प्रवासी प्रवास करत होते. क्रू मेंबर्समध्ये मुंबईकर अपर्णा महाडिक या सुद्धा होत्या. अपर्णा महाडिक या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरेंचे भाचे अमोल यांच्या पत्नी होत्या. 

एअर इंडियाच्या दुर्घटनाग्रस्त विमानातील एकूण 242 प्रवाशांमध्ये, 169 भारतीय प्रवासी, 53 ब्रिटीश नागरिक, पोर्तुगालचे 7 आणि कॅनडाचा एक नागरिक प्रवास करत होते, अशी माहिती समोर आली आहे. दुर्दैवाने सर्वच प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून दुर्घटनेनंतर विमानातील प्रवाशांच्या नातेवाईकांनी घटनास्थळावर धाव घेतली. जवळील रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळत आहे. या दुर्घटनेनं अवघा देश शोकसागरात बुडाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन शोक व्यक्त केला. तर, ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी देखील शोक व्यक्त केला आहे. 

हॉस्पिटलमधील 15 डॉक्टर जखमी

विशेष म्हणजे विमानाचा अपघात इतका भयंकर होता की, अहमदाबादच्या बी.जे. मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर हे विमान कोसळलं असून तेथील हॉस्टेलवर जेवण करणाऱ्या भावी डॉक्टरांना भरल्या ताटावरुन उठवण्याचं काम ह्या दुर्घटनेनं केलं. या दुर्घटनेचे काही फोटो समोर आले असून पोटात कालवणारी, अत्यंत ह्रदयद्रावक ही घटना आहे. या दुर्घटनेत येथील 15 डॉक्टर जखमी झाल्याची माहिती आहे. 

हेही वाचा

विमानात 242 प्रवासी, 169 भारतीय, 53 ब्रिटीश नागरिक, 11 लहान मुले; ब्रिटनच्या पंतप्रधानांचं ट्विट

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली

व्हिडीओ

Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ
Special Report on Sambhajinagar Sena : रशीद मामू खैरे, दानवेंमधला सामना पक्षाला महागात पडणार?
Sanjay Kelkar on Thane Mahayuti : ठाण्यातील महायुतीवर नाराजी असली तरी युती धर्म पाळणार
Chandrakant Khaire vs Ambadas Danve : भाजपला सोपं जावं म्हणून दानवेंनी... खैरेंचे स्फोटक आरोप
Anandraj Ambedkar BMC Election : भविष्यात आम्हीही बंधू एकत्र येऊ;आनंदराज आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Embed widget