एक्स्प्लोर

Ahmedabad plane crash: अहमदाबाद एअरपोर्टवरुन एअर इंडियाचं बोईंग विमान उडालं अन् धड्डाम आवाज झाला, काळाकु्ट्ट धूर पसरला, मेघानी नगरच्या इमारती हादरल्या

Ahmedabad plane crash: गुजरातमध्ये 242 प्रवाशांना घेऊन जाणारं विमान रहिवासी भागात कोसळलं! मेघानी नगरमध्ये काळ्या धुराचे लोट, विमानाचे तुकडे झाले आहेत.

Ahmedabad plane crash: गुजरातची राजधानी असलेल्या अहमदाबाद येथे गुरुवारी दुपारी एअर इंडियाचे प्रवाशी विमान कोसळून भीषण अपघात झाला. या अपघाताच्या वेळी विमानामध्ये तब्बल 242 प्रवासी होते. त्यामुळे या दुर्घटनेत खूप मोठी जीवितहानी झाल्याची शक्यता आहे. विमानाने हवेत टेक ऑफ केल्यानंतर जवळच असलेल्या मेघानी नगर (Meghani Nagar) या दाट लोकवस्तीच्या भागात जाऊन हे विमान कोसळले (plane crash). त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सध्या घटनास्थळी प्रचंड काळा धूर असल्यामुळे काहीच दिसत नाही. या दुर्घटनेनंतर अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्याला सुरुवात झाली आहे. अहमदाबादवरुन लंडनला जाणाऱ्या या विमानाने नुकतेच उड्डाण केले होते. त्यामुळे विमानाच्या इंधनाच्या टाक्या पूर्णपणे भरलेल्या होत्या. त्यामुळे विमान कोसळल्यानंतर आगीचा मोठा भडका उडून मोठ्याप्रमाणावर जीवितहानी झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. उड्डाण केल्यानंतर विमान लगेच कोसळले. विमानतळापासून मेघनीनगरचे अंतर सुमारे 15 किलोमीटर आहे.

प्राथमिक माहितीनुसार, एअर इंडियाच्या या विमानाने दुपारी 1 वाजून 31 मिनिटांनी लंडनला जाण्यासाठी हवेत उड्डाण केले. त्यानंतर 1 वाजून 38 मिनिटांनी विमानाचा अखेरचा सिग्नल मिळाला होता. त्यानंतर विमानचा अपघात झाला. एअर इंडियाचे बोईंग ड्रीमलायनर हे विमान अत्यंत उत्कृष्ट विमानांपैकी एक आहे. जगातील अनेक प्रमुख विमान कंपन्या या विमानाचा वापर करतात. या विमानाची प्रवाशी क्षमता 300 इतकी आहे. अपघाताच्यावेळी विमानात 242 प्रवासी होते, असे सांगितले जात आहे.  हा अपघात नेमका कसा झाला, याचे कारण अद्याप समोर येऊ शकलेले नाही.

हा अपघात इतका भीषण होता की, या विमानाचे तुकडे झाले आहेत. अग्निशमन दलाचे जवान याठिकाणी पोहोचले तेव्हा मेघानी नगरमध्ये विमानाचे भाग विखुरले होते. एअर इंडियाच्या विमानाची चाकं आणि इतर भाग पूर्णपणे वेगळे झाले होते. या अपघाताची भीषणता पाहता यामध्ये विमानातील 242 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची दाट शक्यता आहे. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजयकुमार रुपाणीही या विमानातून प्रवास करत होते, अशी माहिती आहे. मात्र, याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. या दुर्घटनेमुळे देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, या अपघातामुळे सध्या मेघानी नगर परिसरातही मोठे नुकसान झाले आहे. अनेक वाहने जळाली असून इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. 

आणखी वाचा

अहमदाबादमध्ये मोठा विमान अपघात; लंडनला जायला निघालेलं एअर इंडियाचे विमान उड्डाणानंतर लगेच कोसळलं

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
IND vs NZ : टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
Embed widget