Ahmedabad Plane Crash: अहमदाबादमध्ये मोठा विमान अपघात; लंडनला जायला निघालेलं एअर इंडियाचे विमान उड्डाणानंतर अवघ्या 5 मिनिटांतच कोसळलं
Ahmedabad Plane Crash: गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमान अपघाताचे वृत्त समोर आले आहे. अपघातस्थळावरून आकाशात धुराचे लोट निघताना दिसत आहेत. बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आहे.

Ahmedabad Plane Crash: गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमान अपघाताचे वृत्त समोर आले आहे. आज गुरुवारी (12 जून) दुपारी गुजरातमधील अहमदाबाद (Ahmedabad Plane Crash) येथे एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळले, या घटनेचे भयानक फोटो समोर येत आहेत. अहमदाबादमधील मेघानीनगर भागात आगीच्या मोठ्या ज्वाळा दिसून येत आहेत, तर धुराचे लोट सर्वत्र पसरले आहेत. अहमदाबाद विमानतळावरून (Ahmedabad Plane Crash) विमानाने उड्डाण केल्यानंतर लगेचच हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते आणि अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर अवघ्या 5 मिनिटांतच मेघानीनगरजवळ कोसळले. विमानतळापासून मेघनीनगरचे अंतर सुमारे 15 किलोमीटर आहे. घटनेनंतर लगेचच अग्निशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग विझवण्यास सुरुवात केली. या विमानात 242 प्रवासी होते. सर्वांचा मृत्यू झाला असण्याची भीती व्यक्त केली जात आहे.(Ahmedabad Plane Crash)
सुरुवातीच्या फोटोंमध्ये विमानाचे तुकडे तुकडे
प्राथमिक माहितीनुसार, सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर हा दुर्दैवी अपघात झाला. विमानतळाच्या सीमेजवळ हे विमान कोसळल्याची माहिती समोर आली आहे. समोर आलेल्या सुरुवातीच्या फोटोंमध्ये विमानाचे तुकडे तुकडे झाल्याचे दिसून येते. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. समोर आलेल्या फोटो आणि व्हिडीओनुसार अपघात झालेल्या विमानाचा एक पंख तुटून पडला आहे असे दिसत आहे. अग्निशमन दलाचे जवान पाणी फवारून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या आग काही प्रमाणात आटोक्यात आली आहे. ही दुर्घटना घडली तेव्हा विमान विमानतळावरून उड्डाण घेत होते. हे विमान एअर इंडियाचे आहे, अशी माहिती आहे.
VIDEO | Ahmedabad: Smoke seen emanating from Adani airport premises, no casualties reported so far.
— Press Trust of India (@PTI_News) June 12, 2025
(Full video available on PTI Videos - https://t.co/n147TvrpG7)
(Source: Third Party) pic.twitter.com/vfRVFoiRG1
विमान ज्या इमारतीवर पडले त्या इमारतीचेही नुकसान
परिसरात मोठ्या गोंधळाचे वातावरण आहे, हा भयानक अपघात पाहून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आणि परिसरातील लोक इकडे तिकडे धावत आहेत. विमानाचे बहुतेक भाग जळून राख झाले आहेत. विमान ज्या इमारतीवर पडले त्या इमारतीचेही नुकसान झाले आहे. या घटनेत अनेक जण दगावल्याची भीती व्यक्त होते आहे. विमानतळाजवळ सिव्हिल हॉस्पिटल आहे, जिथे सर्व डॉक्टरांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत उपलब्ध माहितीनुसार, अहमदाबादहून उड्डाण केलेले हे विमान लंडनच्या दिशेने जात होते.
विमान अपघाताचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये अपघातस्थळावरून आकाशात काळा धूर निघताना दिसत आहे. घटनास्थळी आपत्कालीन पथक तैनात करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी अद्याप अपघाताचे कारण स्पष्ट झालेले नाही. मेघनीनगर परिसरातील धारपूर येथून मोठे धुराचे लोट वरती जाताना दिसत आहेत. बीएसएफ आणि एनडीआरएफच्या पथकांना अपघातस्थळी पाठवण्यात आले आहे. अहमदाबादच्या सरदार पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर अपघात झाला. एअर इंडियाचे विमान कोसळले ज्यामध्ये 242 लोक होतेएअर इंडिया एआय 171 अहमदाबादहून लंडनला जात होते. वेळ 1.10 वाजता, 1.17 वाजता उड्डाण केले. त्यानंतर काही वेळातच विमान कोसळले या घटनेत जवळपासच्या इमारतींचेही नुकसान झाले आहेत.























