एक्स्प्लोर

ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा : तीन मोठी नावं सीबीआयच्या रडारवर

नवी दिल्ली : ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळा सध्या देशात गाजत आहे. या घोटाळ्यात माजी वायूदलप्रमुख एसपी त्यागी यांना अटक करण्यात आली आहे. तर आणखी तीन मोठ्या व्यक्ती सीबीआयच्या रडारवर आहेत. यामध्ये माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एमके नारायणन, माजी एसपीजी डायरेक्टर भरत वीर वांचू आणि सीबीआयचे माजी संचालक अनिल सिन्हा यांचा समावेश आहे. सीबीआयच्या रडारवर असेलेली पहिली व्यक्ती - एमके नारायणन 1955 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी एमके नारायणन दोन वेळा आयबीचे प्रमुख होते. नेहरु-गांधी कुटुंबाचे निकटवर्तीय मानले जाणारे नारायणन हे मनमोहन सिंह सरकारमध्ये 2005 मध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बनले. नारायणन 2010 पर्यंत एनएसए होते आणि त्यानंतर यूपीए सरकारने 2011 मध्ये त्यांची पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी नियुक्ती केली. सीबीआयच्या सूत्रांच्या माहितीनुसार, ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदीतील नियमांमध्ये बदल करण्यासाठी नक्की कुणाच्या सांगण्यावरुन महत्त्वाची भूमिका बजावली, याची चौकशी केली जाईल. ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा : तीन मोठी नावं सीबीआयच्या रडारवर माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एमके नारायणन सीबीआयच्या आतापर्यंतच्या चौकशीत असं समोर आलंय की, नारायणनच ती व्यक्ती आहे, ज्यांनी हेलिकॉप्टरच्या तांत्रिक गोष्टींमध्ये बदलाचे आदेश दिले. ज्यानंतर वायूदलाच्या नियमांमध्ये बदल करुन 6 हजार मीटरपर्यंत उंच उडणाऱ्या हेलिकॉप्टरऐवजी 4 हजार 500 मीटर उंच उडणारे हेलिकॉप्टर खरेदी करण्याचे सूचवले. ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी नियमांमध्ये बदल का केले, याबाबत नारायणन यांच्याकडून सीबीआयला माहिती हवी आहे. शिवाय, खरेदी नियमांमध्ये बदल करण्यामागे राजकीय दबाव होता का, याबद्दलही सीबीआय नारायणन यांच्याकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करेल. सीबीआयच्या रडारवर असेलेली दुसरी व्यक्ती - भरत वीर वांचू गांधी कुटुांबाचे निकटवर्तीय आणि 1976 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी भरत वीर वांचू हे मनमोहन सिंह सरकारदरम्यान 2004 साली एसपीजी प्रमुख होते. ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्यात सोनिया गांधींचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या वांचू यांची याआधीही सीबीआयने चौकशी केली होती. ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा : तीन मोठी नावं सीबीआयच्या रडारवर माजी एसपीजी डायरेक्टर भरत वीर वांचू वांचू 7 मार्च 2005 रोजीच्या बैठकीत सहभागी झाली होते, ज्यामध्ये व्हीआयपींसाठी खरेदी केल्या जाणाऱ्या हेलिकॉप्टरच्या उडण्याची क्षमता 6 हजारवरुन कमी करुन 4 हजार 500 मीटरपर्यंत करण्यासंदर्भात चर्चा झाली होती. वांचूंपासून सीबीआय केवळ हेलिकॉप्टर खरेदी व्यवहारामध्ये बदलांसदर्भात चौकशी करणार नाही, तर आठ हेलिकॉप्टर खरेदी करण्याचं ठरलं असताना 12 का खरेदी केले गेले. सुरुवातीला केवळ 8 हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा प्रस्ताव होता. मात्र, एसपीजी डायरेक्टर वांचू यांच्या सांगण्याने चार अधिकचे हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. सीबीआयच्या रडारवर असेलेली तिसरी व्यक्ती - अनिल सिन्हा अनिल सिन्हा हे सीबीआयचे माजी संचालक आहेत. सीबीआयच्या संचालकपदावरुन निवृत्त झालेले अनिल सिन्हा यांचीही ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्याप्रकरणी सीबीआयकडून चौकशी केली जाणार आहे. सीबीआयच्या सूत्रांच्या माहितीनुसार, अनिल सिन्हा जेव्हा एसपीजीमध्ये आयजी होते, त्यावेळी म्हणजे 8 नोव्हेंबर 2004 रोजी त्यांनी बैठकीत एसपीजीचे प्रतिनिधित्त्व केलं होतं, त्यामध्ये खरेदी करण्यात येणाऱ्या हेलिकॉप्टरच्या उडण्याच्या उंचीच्या क्षमतेला 6 हजार मीटरवरुन कमी करुन 4 हजार 500 मीटर करण्याबाबत चर्चा केली होती. ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा : तीन मोठी नावं सीबीआयच्या रडारवर सीबीआयचे माजी संचालक अनिल सिन्हा अनिल सिन्हा यांच्यावर असाही आरोप आहे की, सीबीआय संचालक असताना हेलिकॉप्टर घोटाळ्याची चौकशी पुढे सरकू दिली नाही. माजी वायूदलप्रमुख एसपी त्यागी यांच्या अटकेनंतर माजी एनएसए एमके नारायणन, माजी एसपीजी प्रमुख भरत वीर वांचू आणि माजी सीबीआय प्रमुख अनिल सिन्हा या तिघांच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi Meets LK Advani : पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
Babri Masjid Verdict : 'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
Sonia Gandhi : 'आणीबाणी ही मोठी चूक होती...', सोनिया गांधींचा खळबळजनक खुलासा, गांधी कुटुंबातील वादाचा पडदा उघडला
'आणीबाणी ही मोठी चूक होती...', सोनिया गांधींचा खळबळजनक खुलासा, गांधी कुटुंबातील वादाचा पडदा उघडला
'सर्व भारतीयांना हाकलून द्या..' अमेरिकन निवडणुकीतील पराभवाचा राग ट्रम्प समर्थकांनी भारतीयांवर काढला, दिवाळीच्या कार्यक्रमात हिंदूंविरोधात घोषणाबाजी
'सर्व भारतीयांना हाकलून द्या..' अमेरिकन निवडणुकीतील पराभवाचा राग ट्रम्प समर्थकांनी भारतीयांवर काढला, दिवाळीच्या कार्यक्रमात हिंदूंविरोधात घोषणाबाजी

व्हिडीओ

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Fire News:कुठे फटाक्यांमुळे तर कुठे शॉर्ट सर्किट... दिवाळीला राज्यात भीषण अग्नितांडव; मुंबई, ठाण्यापासून ते नागपूर चंद्रपुरपर्यंत असंख्य आगीच्या घटना, मोठी वित्तहानी
कुठे फटाक्यांमुळे तर कुठे शॉर्ट सर्किट... दिवाळीला राज्यात भीषण अग्नितांडव; मुंबई, ठाण्यापासून ते नागपूर चंद्रपुरपर्यंत असंख्य आगीच्या घटना, मोठी वित्तहानी
Gold Rate: सोन्याच्या दरात घसरण कायम, सोन्याचे दर वाढणार की आणखी घसरणार? जागतिक सुवर्ण परिषदेनं दिले मोठे संकेत
Gold Rate: सोन्याचे दर वाढणार की घसरणार? जागतिक सुवर्ण परिषदेनं दिले मोठे संकेत
PM Modi Meets LK Advani : पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिलीज करू शकते, हार्दिक पांड्याच्या ट्रेडला दुजोरा!
मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिलीज करू शकते, हार्दिक पांड्याच्या ट्रेडला दुजोरा!
Ashok Saraf : बरेच रोल केले, बरेच रोल करायचे राहिले, मला पत्थर दिल व्हिलनची भूमिका करायचीय : अशोक सराफ
बरेच रोल केले, बरेच रोल करायचे राहिले, मला पत्थर दिल व्हिलनची भूमिका करायचीय : अशोक सराफ
Babri Masjid Verdict : 'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
Jay Pawar : दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण; पण आमच्या आयुष्यातील खरा प्रकाश तुम्ही होता Dad, जय पवार यांनी अजितदादांच्या आठवणींना दिला उजाळा
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण; पण आमच्या आयुष्यातील खरा प्रकाश तुम्ही होता Dad, जय पवारांची अजितदादांच्या आठवणीत भावनिक स्टोरी
Embed widget