एक्स्प्लोर

तिहेरी तलाक आणि हिजाबनंतर आता लग्नाच्या वयावरून वाद, जाणून घ्या काय आहे प्रकरण

Row Over Age in Muslim Marriages: तिहेरी तलाक, हलाला आणि हिजाब वादानंतर मुस्लीम मुलींच्या लग्नाच्या वयावरुन नवीन वाद सुरु झाला आहे. मुस्लीम पर्सनल लॉमध्ये ठरवून दिलेल्या लग्नाच्या वयाचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे.

Row Over Age in Muslim Marriages: तिहेरी तलाक, हलाला आणि हिजाब वादानंतर मुस्लीम मुलींच्या लग्नाच्या वयावरुन नवीन वाद सुरु झाला आहे. मुस्लीम पर्सनल लॉमध्ये ठरवून दिलेल्या लग्नाच्या वयाचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय किशन कौल यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ या प्रकरणावर 7 नोव्हेंबरला सुनावणी करणार आहे.

सोमवारी (17 सप्टेंबर) सर्वोच्च न्यायालयाने पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या (NCPCR) याचिकेवर सुनावणी करण्यास सहमती दर्शवली आहे. पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने मुस्लीम पर्सनल लॉनुसार लग्नासाठी मुलीचे वय 16 वर्ष असणे हे योग्य असल्याचं म्हटलं आहे. गेल्या सुनावणीत सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयातील खंडपीठासमोर हा मुद्दा महत्त्वाचा असल्याचे म्हटले होते. खंडपीठाने या प्रकरणात अधिवक्ता राजशेखर राव यांची अॅमिकस क्युरी म्हणजेच न्याय मित्र म्हणून नियुक्ती केली आहे. पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा बालविवाह कायदा आणि POCSO कायद्यावर परिणाम होईल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. आता सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 नुसार, 18 वर्षाखालील विवाह हा कायदेशीर गुन्हा आहे. अशा प्रकरणांना बालविवाह मानला जातो. भारतात 18 वर्षांखालील मुलींना अल्पवयीन मानले जाते. POCSO कायदा 2012 अंतर्गत अल्पवयीन मुलींशी लैंगिक संबंध ठेवणे हा गुन्हा आहे. त्यामुळेच 16 वर्षांच्या मुलीच्या लग्नाच्या प्रकरणात पेंच अडकला असून तो सोडवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला अॅमिकस क्युरीचीही नियुक्ती करावी लागली आहे. यातच आता तिहेरी तलाक आणि निकाह हलालानंतर लग्नाच्या वयावरून वाद वाढण्याचे चिन्ह आहेत.

तिहेरी तलाक

मुस्लिम महिलेच्या पतीने एकाच वेळी तीनदा तलाक बोलत संबंध तोडले तर त्याला तिहेरी तलाक म्हणतात. तिहेरी तलाकची प्रकरणे पत्र, एसएमएस आणि फोन कॉलद्वारेही नोंदवली गेली आहे. मात्र आता हे भारतात बेकायदेशीर आहे. 19 सप्टेंबर 2018 रोजी भारतात तिहेरी तलाक कायदा म्हणजेच मुस्लिम महिला (विवाह हक्क संरक्षण) कायदा लागू झाला. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शिक्कामोर्तब केल्यानंतर हा कायदा अस्तित्वात आला आहे. 

निकाह हलाला वाद 

निकाह हलालवर भारतात अद्याप बंदी नाही. मात्र याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मुस्लिम पर्सनल अॅप्लिकेशन अॅक्ट 1937 चे कलम 2 निकाह हलाला आणि बहुपत्नीत्वाला मान्यता देते. यासोबतच निकाह हलाला भारतीय संविधानाच्या कलम 14, 15 आणि 21 चे उल्लंघन करत असल्याचे तज्ञांचे मत आहे. यात तिहेरी तलाक पीडितेला पुन्हा तिच्या पतीशी लग्न करण्यासाठी, तिला निकाह हलाला करावा लागतो. यामध्ये ती स्त्री दुसऱ्या पुरुषाशी लग्न करते, त्याच्याशी शारीरिक संबंधही ठेवते आणि नंतर त्याला घटस्फोट देऊन तिच्या पूर्व पतीशी लग्न करते. या संपूर्ण प्रक्रियेला निकाह हलाला म्हणतात. मात्र असेही म्हटले जाते की, जेव्हा एखादी स्त्री दुसऱ्या पुरुषाशी लग्न करते, तेव्हा ती त्याला घटस्फोटासाठी जबरदस्ती करू शकत नाही.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aaditya Thackeray : फडणवीस कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, मनसेवरही हल्लाUddhav Thackeray : सत्तारांची गुंडगिरी मोडण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरेंचं आवाहनNitin Gadkari on Forest Officers : माझ्या तावडीत अधिकारी सापडल्यास धुलाई करेन- नितीन गडकरीABP Majha Headlines :  2 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Embed widget