एक्स्प्लोर
पाकिस्तानवर 'आर्थिक' सर्जिकल स्ट्राईक, 200 टक्के आयात शुल्क करण्याबाबत आज संसदेत प्रस्ताव
या प्रस्तावामध्ये पाकिस्तानमधून होणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या उत्पादनाच्या आयातीवर 200 टक्के दराने सीमा शुल्क लावण्याच्या निर्णयावर एकमताने शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. गेल्या 16 फेब्रुवारीला संसदेत तत्कालीन अर्थमंत्र्यांनी या संदर्भात घोषणा केली होती.
नवी दिल्ली: पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर लावलेल्या आयात बंदीच्या नियमावर आज संसदेत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे, आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत या संदर्भात एक वैधानिक प्रस्ताव मांडणार आहेत.
या प्रस्तावामध्ये पाकिस्तानमधून होणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या उत्पादनाच्या आयातीवर 200 टक्के दराने सीमा शुल्क लावण्याच्या निर्णयावर एकमताने शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. गेल्या 16 फेब्रुवारीला संसदेत तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या संदर्भात घोषणा केली होती.
पाकिस्तानमधून आयात होणाऱ्या सगळ्या वस्तूंवर भारतानं थेट 200 टक्के आयात शुल्क लादल्याने आता पाकिस्तानला भारतात व्यापार करणं कठिण होणार आहे, या निर्णयामुळे पाकिस्तानला मोठा आर्थिक फटका बसणार आहे.
पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानला दिलेला 'मोस्ट फेवर्ड नेशन'चा दर्जा काढण्याचा निर्णय कॅबिनेट कमिटी ऑफ सिक्युरिटीच्या (सीसीएस) बैठकीत घेण्यात आला होता. सोबतच पाकिस्तानवरून येणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या उत्पादनावर 200टक्के सीमा शुल्क लावण्याचा निर्णय देखील घेतला होता.
वाणिज्य मंत्रालयाच्या आकड्यानुसार 2018-19 मध्ये पाकिस्तानमधून 3476 कोटींची आयात व्हायची मात्र फेब्रुवारी 2019 मध्ये झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर हा आकडा आता केवळ 18 कोटींवर आला आहे.
पुलवामा हल्ल्यात 40 जवान शहीद
पुलवामा येथे 14 फेब्रुवारीला झालेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्याला निशाणा बनवण्यात आलं होतं. लष्करावर देशाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. तब्बल 200 किलो स्फोटकांनी भरलेली कार दहशतवाद्यांनी जवानांच्या बसवर आदळली. त्यानंतर मोठा स्फोट झाला आणि त्यात बसचा अक्षरश: चुराडा झाला. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.
संबंधित बातम्या
Pulwama terror attack : दहशतवादावर हल्ला करुन नाही तर संवादातून मार्ग निघेल : नवज्योत सिंह सिद्धू
Pulwama terror attack : ना विसरणार, ना माफ करणार; पुलवामा हल्ल्यानंतर सीआरपीएफचं ट्वीट Pulwama terror attack : 'त्या' शहीद जवानाची कॅन्सरग्रस्त आई अजूनही आपल्या मुलाची वाट पाहतेय Pulwama terror attack : पत्नीला दोन महिन्यात परत येतो म्हणाला अन्... Pulwama terror attack : देशाचं संरक्षण करण्यात 56 इंच छाती असलेल्या पंतप्रधानांना अपयश आलं : शरद पवार Pulwama terror attack : सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यावर विकी कौशल म्हणतो... Pulwama terror attack : हल्ल्याला फक्त पाकिस्तान जबाबदार नाही, फारुख अब्दुल्लांचं वादग्रस्त वक्तव्य Pulwama terror attack : आदिल अहमद दार, आजच्या हल्ल्याचा क्रूरकर्मा! Pulwama terror attack : हल्ला झालेल्या बसमधील जवानांची नावं Pulwama terror attack : बॉलिवूडकरांनीही व्यक्त केला संताप भ्याड हल्ल्याला चोख उत्तर देण्याची हीच वेळ, राज ठाकरेंचे मोदींना आवाहन जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही : नरेंद्र मोदी शहीद जवानांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेणार : माजी लष्करप्रमुखांचा इशारा पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यात मोठा दहशतवादी हल्ला, 39 जवान शहीदअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement