एक्स्प्लोर
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा बंगला रातोरात जमीनदोस्त
आंध्र प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या आदेशानंतर माजी मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांचा बंगला पाडण्यात आला आहे.

हैदराबाद : आंध्र प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या आदेशानंतर माजी मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांचा बंगला पाडण्यात आला आहे. 'प्रजा वेदिका' हे नायडू यांचे निवासस्थान होते. दरम्यान टीडीपीच्या कार्यकर्त्यांनी या तोडकामास जोरदार विरोध केला. तरिदेखील तोडकाम थांबवण्यात आले नाही. एक जेसीबी, सहा ट्रक आणि 30 कामगारांनी तोडकाम पूर्ण केले. मध्यरात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. जगनमोहन रेड्डी यांनी 'प्रजा वेदिका' याच इमारतीत जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन इमारत पाडण्याच्या निर्णयाची घोषणा केली होती. "प्रजा वेदिका ही इमारत तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी नियमांचे उल्लंघन करुन बांधली होती." त्यामुळे या अवैध इमारतीविरोधात कारवाई केल्याचे रेड्डी यांनी सांगितले आहे. दरम्यान रेड्डींच्या या निर्णयाला टीडीपीने "राजकीय द्वेषातून केलेली कारवाई" म्हटले आहे. दरम्यान चंद्राबाबू नायडू यांनी प्रजा वेदिका हा बंगला विरोधी पक्षनेत्याचा बंगला म्हणून घोषित करण्याची मागणी केली होती. परंतु ही मागणी मुख्यमंत्री रेड्डी यांनी फेटाळली. व्हिडीओ पाहा
आंध्र प्रदेश कॅपिटल रिजन डेव्हलपमेंट अथोरिटीने 5 कोटी रुपये खर्च करुन हा बंगला बांधला होता. चंद्राबाबू नायडू या बंगल्याचा उपयोग पक्षाच्या बैठकांसाठी करत होते, असा आरोप होत आहे. दरम्यान तोडकाम करताना कामगारांनी चंद्राबाबू नायडू यांचे सामान बाहेर फेकले असल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला आहे.#WATCH: Demolition of 'Praja Vedike' building underway in Amaravati. The building was constructed by the previous government led by N. Chandrababu Naidu. #AndhraPradesh pic.twitter.com/qRCWjfVTJZ
— ANI (@ANI) June 25, 2019
Demolition of 'Praja Vedike' building underway in Amaravati. The building was constructed by the previous government led by N Chandrababu Naidu #AndhraPradesh pic.twitter.com/DeNs1xqR9f
— ANI (@ANI) June 25, 2019
Andhra Pradesh: Demolition of 'Praja Vedike' building is underway in Amaravati. The building was constructed by the previous government led by N Chandrababu Naidu. pic.twitter.com/ZCpqBzmEZC
— ANI (@ANI) June 26, 2019
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
राजकारण
पुणे
छत्रपती संभाजी नगर























