Afghanistan : खबरदार! भारताकडं वाकड्या नजरेनं पहाल तर सडेतोड उत्तर देऊ; तालिबान्यांना CDS जनरल बिपिन रावत यांचा इशारा
Afghanistan : अफगाणिस्तानवर तालिबानी कब्जा करणार हे निश्चित होतं. पण ते इतक्या जलदगतीने हालचाल करतील आणि अफगाणिस्तानची सत्ता हातात घेतील असं वाटलं नव्हतं असं CDS जनरल बिपिन रावत म्हणाले.

नवी दिल्ली : अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी कब्जा मिळवल्यानंतर आता भारतीय लष्कराकडून मोठं वक्तव्य करण्यात आलं आहे. भारताकडे वाकड्या नजरेने पहाल तर सडेतोड उत्तर देऊ असा इशारा चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत यांनी तालिबानी दहशतवाद्यांना दिला आहे. भविष्यात अफगाणिस्तानमधून भारतीय भूमीत करण्यात येणाऱ्या प्रत्येक दहशतवादी हालचालींना उत्तर देण्याची तयारी भारतीय लष्कराने केली असल्याचं ते म्हणाले.
CDS जनरल बिपिन रावत म्हणाले की, अफगाणिस्तानवर कब्जा केलेल्या तालिबानचे रुप हे 20 वर्षापूर्वी जे होतं तेच आताही आहे. त्यामुळे त्या वेळेप्रमाणेच आताही भारतात घुसखोरी होण्याची शक्यता असून त्यासंबंधीच्या प्रत्येक आव्हानाला तोंड देण्याची तयारी करण्यात आली आहे. या आव्हानाला तोंड देण्यासाठी भारतीय लष्कराने आपातकालीन योजना तयार केली आहे.
CDS जनरल बिपिन रावत पुढे म्हणाले की, अफगाणिस्तानवर तालिबानी कब्जा करणार हे निश्चित होतं. पण ते इतक्या जलदगतीने हालचाल करतील आणि अफगाणिस्तानची सत्ता हातात घेतील असं वाटलं नव्हतं, हे आश्चर्यकारक आहे.
आताची तालिबान ही 20 वर्षापूर्वीची तालिबान असून फक्त त्याचे सहकारी बदलले आहेत असं CDS जनरल बिपिन रावत म्हणाले. त्यामुळे भारताची चिंता वाढली असून या आव्हानाला तोंड आपण आपातकालीन योजना तयार केल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
या आधी 1989 च्या दरम्यान ज्यावेळी रशियाला अफगाणिस्तानमधून पराभूत होऊन परतावं लागलं होतं, त्यानंतर त्या ठिकाणी तालिबानी दहशतवाद्यांच्या मोठ्या प्रमाणावर कारवाया वाढल्या होत्या. या दहशवाद्यांचा वापर करुन पाकिस्तानने भारतातील दहशतवादी कारवाया वाढवल्या होत्या.
संबंधित बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
