एक्स्प्लोर

सलग तिसऱ्यांदा खासदार झालेल्या 71 नेत्यांच्या संपत्तीत 286 टक्क्यांनी वाढ, सुप्रिया सुळेंच्या संपत्तीत 173 टक्क्यांची वाढ; ADRमधून माहिती

ADR Report : 2009 ते 2019 या काळात सलग तीन वेळा खासदार झालेल्या 71 नेत्यांच्या संपत्तीमध्ये सरासरी 286 टक्के वाढ झाली आहे.

ADR Report : 2009 ते 2019 या काळात सलग तीन वेळा खासदार झालेल्या 71 नेत्यांच्या संपत्तीमध्ये सरासरी 286 टक्के वाढ झाली आहे. भाजप खासदार रमेश चंदप्पा जिगाजिनागी यांच्या संपत्तीत सर्वाधिक वाढ झाली आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स  Association for Democratic Reforms (एडीआर)रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे. या रिपोर्ट्सनुसार, ज्या दहा खासदारांची संपत्ती सर्वाधिक वाढली त्यामध्ये भाजपच्या सहा खासदारांचा समावेश आहे. तर शिरोमणी अकाली दल, राष्ट्रवादी काँग्रेस, बीजू जनता दल आणि AIUDF च्या एका खासराचा समावेश आहे. रिपोर्ट्सनुसार, अपक्ष खासदारांसह 71 खासदारांची 2009 मध्ये सरासरी संपत्ती 6.15 कोटी रुपये इतकी होती. 2019 मध्ये यामध्ये 286 टक्क्यांनी वाढ झाली असून त्यांची सरासरी संपत्ती 17.59 कोटी रुपये झाली आहे. दरम्यान, मागील दहा वर्षात भाजपच्या खासदारांच्या संपत्तीमध्ये सरासरी 42 पटीनं वाढ झाल्याचेही रिपोर्ट्समध्ये म्हटलेय.  

जिगाजिनागी यांच्या संपत्तीत सर्वाधिक वाढ - 

ADR च्या रिपोर्ट्सनुसार, कर्नाटकचे भाजप खासदार जिगाजिनागी यांच्याकडे 2009 मध्ये 1.18 कोटी रुपयांची संपत्ती होती.. ती 2014 मध्ये 8.94 कोटी रुपये इतकी झाली. तर 2019 मध्ये 42 पटीनं वाढून 50.41 कोटी रुपये इतकी झाली. 2009 ते 2019 या दरम्यान त्यांच्या संपत्तीमध्ये 4,189 टक्केंची वाढ झाली.  2009 ते 2019 या दरम्यान झालेल्या निवडणुकीवेळी खासदारांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या माहितीच्या आधारावर ही माहिती दिली आहे. 2019 मध्ये सलग सहाव्यांदा खासदार झालेले जिगाजिनागी हे 2016 ते 2019 यादरम्यान केंद्रीय राज्यमंत्री होते.

सुप्रिया सुळेंच्या संपत्तीत 173 टक्क्यांची वाढ -

एडीआरच्या रिपोर्ट्सनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संपत्तीमध्ये 173 टक्क्यांनी वाढ झाली आहे.  2009 मध्ये सुप्रिया सुळे यांची संपत्ती 51.53 कोटी रुपये इतकी होती.  2019 मध्ये 173 टक्क्यांनी वाढून 140.88 कोटी रुपये इतकी झाली. दहा वर्षात सुप्रिया सुळे यांच्या संपत्तीमध्ये 89.35 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.  दरम्यान, AIUDF चे खासदार बदरूद्दीन अजमल यांच्या संपत्तीमध्ये 160 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2009 मध्ये त्यांची संपत्ती 30 कोटी रुपये होती तर 2019 मध्ये त्यांची संपत्ती 78 कोटी रुपये इतकी झाली. 

हरसिमरत कौर बादल यांच्या संपत्तीत 261 टक्क्यांनी वाढ - 

अकाली दलच्या खासदार हरसिमरत कौर बादल यांच्या संपत्तीत 261 टक्क्यांनी वाढ झाल्याचं रिपोर्ट्समधून समोर आले आहे. 2009 मध्ये हरसिमरत कौर बादल यांची एकूण संपत्ती 60.31 कोटी रुपये होती... 2019 मध्ये त्यांची संपत्ती 217.99 कोटी रुपये इतकी झाली. रिपोर्ट्सनुसार, हरसिमरत कौर बादल यांची संपत्ती सर्वाधिक वेगानं वाढली आहे. दहा वर्षात हरसिमरत कौर यांची संपत्ती 157.68 कोटी रुपयांनी वाढली आहे.

वरुण गांधींच्या संपत्ती 5 कोटींवरुन 60 कोटी झाली - 

एडीआरच्या रिपोर्ट्सनुसार, उत्तर प्रदेशमधून तिसऱ्यांदा खासदार झालेले भाजपचे नेते वरुण गांधी यांच्या संपत्तीमध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली. 2009 मध्ये वरुण गांधी यांची संपत्ती 4.92 कोटी रुपये होती. हीच संपत्तीमध्ये 2019 मध्ये वाढून 60.32 कोटी रुपये इतकी झाली. वरुण गांधींच्या संपत्तीमध्ये 1124 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2009 मध्ये मेनका गांधी यांची संपत्ती 17 कोटी रुपये होती, जी 2019 मध्ये 55 कोटी रुपये इतकी झाली. 
 
तिसऱ्यांदा खासदार झालेले नेते कोणत्या पक्षातील किती?

लागोपाठ तीन वेळा खासदार झालेल्या नेत्यांमध्ये भाजपच्या सर्वाधिक नेत्यांचा समावेश आहे. यामध्ये भाजपचे 43 खासदार आहे. दहा वर्षात भाजपच्या या खासदारांची संपत्ती सरासरी 15 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. 2009 मध्ये त्यांचं सरासरी उत्पन्न चार कोटी होतं... जे 2019 मध्ये 20 कोटी रुपये इतकं झालं आहे. 

यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष काँग्रेस आहे... काँग्रेसच्या दहा खासरारांची संपत्ती सरासरी 10 कोटी रुपयांनी वाढली आहे. 2009 मध्ये काँग्रेसच्या खासरांची सरासरी संपत्ती पाच कोटी रुपये होती.. जी 2019 मध्ये 16 कोटी रुपये इतकी झाली आहे. यामध्ये तृणमृल काँग्रेस या पक्षाचा तिसरा क्रमांक लागतो... 71 पैकी तृणमृल काँग्रेसचे सात खासदार आहेत... 2009 मध्ये तृणमूल काँग्रेसच्या खासदारांची सरासरी संपत्त 76 लाख रुपये होती... जी 2019 मध्ये 5.9 कोटी रुपये इतकी झाली आहे. शिवसेना आणि बीजद यांचे प्रत्येकी दोन दोन खासदार आहेत. तर AIMIM, AIUDF, IUML, जद(यू) आणि एनसीपी या पक्षाचे प्रत्येकी एका एका खासदारांचा समावेश आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सावधान! 'या' जिल्ह्यात कोसळणार सर्वात जास्त पाऊस, पंजाबराव डखांचा अंदाज काय?
सावधान! 'या' जिल्ह्यात कोसळणार सर्वात जास्त पाऊस, पंजाबराव डखांचा अंदाज काय?
Sunny Leone Net Worth : ना आयटम साँग, ना कोणता चित्रपट; तरीही 'या' अभिनेत्रीकडे आहे 115 कोटींची संपत्ती
ना आयटम साँग, ना कोणता चित्रपट; तरीही 'या' अभिनेत्रीकडे आहे 115 कोटींची संपत्ती
पावसामुळे मुंबई मेट्रो ठप्प, वादळी वाऱ्याने वाहतूक विस्कळीत; विमानसेवेतही अचानक बदल
पावसामुळे मुंबई मेट्रो ठप्प, वादळी वाऱ्याने वाहतूक विस्कळीत; विमानसेवेतही अचानक बदल
Congress on PM Modi : अडवाणी, मुरली मनोहर जोशीप्रमाणे मोदींनाही 75 वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसच्या बड्या नेत्याचा सवाल
अडवाणी, जोशींप्रमाणे पीएम मोदींनाही 75 वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसचा सवाल
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Baramati Strong Room CCTV : बारामतीमधील स्ट्रॉगरुममधील सीसीटीव्ही 45 मिनिटानंतर सुरु :ABP MajhaWare Nivadnukiche Superfast News:लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 13 May 2024ABP Majha Headlines : 02 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सNeelam Gorhe Voting : निलम गोऱ्हेंनी बजावला मतदानाच हक्क; विरोधकांना उद्देशून काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सावधान! 'या' जिल्ह्यात कोसळणार सर्वात जास्त पाऊस, पंजाबराव डखांचा अंदाज काय?
सावधान! 'या' जिल्ह्यात कोसळणार सर्वात जास्त पाऊस, पंजाबराव डखांचा अंदाज काय?
Sunny Leone Net Worth : ना आयटम साँग, ना कोणता चित्रपट; तरीही 'या' अभिनेत्रीकडे आहे 115 कोटींची संपत्ती
ना आयटम साँग, ना कोणता चित्रपट; तरीही 'या' अभिनेत्रीकडे आहे 115 कोटींची संपत्ती
पावसामुळे मुंबई मेट्रो ठप्प, वादळी वाऱ्याने वाहतूक विस्कळीत; विमानसेवेतही अचानक बदल
पावसामुळे मुंबई मेट्रो ठप्प, वादळी वाऱ्याने वाहतूक विस्कळीत; विमानसेवेतही अचानक बदल
Congress on PM Modi : अडवाणी, मुरली मनोहर जोशीप्रमाणे मोदींनाही 75 वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसच्या बड्या नेत्याचा सवाल
अडवाणी, जोशींप्रमाणे पीएम मोदींनाही 75 वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसचा सवाल
डुकराची किडनी बसवलेल्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू,दोन महिन्यापूर्वीच झालं होतं ऑपरेशन
डुकराची किडनी बसवलेल्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू,दोन महिन्यापूर्वीच झालं होतं ऑपरेशन
Maharashtra Rain : सावधान! येत्या काही तासात नाशिक, पालघरसह 'या' भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा
सावधान! येत्या काही तासात नाशिक, पालघरसह 'या' भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा
Maharashtra Police Bharti : पोलिस भरतीमध्ये मोठी अपडेट; 'त्या' उमेदवारांना पोलिस अधीक्षक कार्यालयात हमीपत्र देण्याची सूचना
पोलिस भरतीमध्ये मोठी अपडेट; 'त्या' उमेदवारांना पोलिस अधीक्षक कार्यालयात हमीपत्र देण्याची सूचना
वादळ वारं सुटलं गं.. रायगडमध्ये अवकाळी, नाशिक, पालघर, पुणे घाटात पुढील 3-4 तासांत पावसाच्या सरी
वादळ वारं सुटलं गं.. रायगडमध्ये अवकाळी, नाशिक, पालघर, पुणे घाटात पुढील 3-4 तासांत पावसाच्या सरी
Embed widget