एक्स्प्लोर

Amit Shah: जम्मू काश्मिरबाबत पंडीत नेहरुंच्या दोन चुका, अमित शाहंच्या वक्तव्यानं काँग्रेस आक्रमक;  लोकसभेत खडाजंगी 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंबाबत (Pandit Jawaharlal Nehru) दिलेल्या वक्तव्यावरुन लोकसभेत गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं

Adhir Ranjan Chowdhury On Amit Shah: संसदेच्या हिवाळी अधिवेशनात  ( winter session of Parliament) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंबाबत (Pandit Jawaharlal Nehru) दिलेल्या वक्तव्यावरुन लोकसभेत गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेत बोलताना गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीरबाबत माजी पंतप्रधान पंडित नेहरु यांनी काही 'चुका' केल्याचे म्हटले. त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसने जोरदार प्रहार केला. लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी आरोप केला की, केंद्र सरकारचे मंत्री आणि भाजपचे अनेक नेते काश्मीरचा प्रश्न आल्यावर पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यावर विनाकारण टीका करू लागतात.

अमित शाह यांनी वस्तुस्थितीचा विपर्यास केल्याचा आरोप

जम्मू-काश्मीरच्या संदर्भात दिवसभर सभागृहात चर्चा झाली. यावर बोलताना काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी 'दूध का दूध और पानी का पानी', असे म्हटलं. त्यावर अशा चर्चेला मी तयार असल्याचे अमित शाह म्हणाले. दरम्यान, अमित शाह यांनी  वस्तुस्थितीचा विपर्यास केल्याचा आरोप अधीर रंजन यांनी केला. जम्मू काश्मीर आरक्षण (दुरुस्ती) विधेयक, 2023' आणि 'जम्मू काश्मीर पुनर्रचना (दुरुस्ती) विधेयक, 2023' वरील चर्चेत भाग घेताना अमित शाहा यांनी पंडित नेहरूंबद्दल वक्तव्य केले होते. सभागृहात पाकव्याप्त काश्मीरचा (पीओके) उल्लेख करत गृहमंत्री यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरु यांनी जम्मू-काश्मीरबाबत दोन 'चुका' केल्याचे म्हटले. शाह यांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी टीका केली. 

नेमकं काय म्हणाले अमित शहा?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, नेहरूंच्या काळात झालेल्या घोडचूकांमुळं काश्मीरला त्रास सहन करावा लागला. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत झालेल्या दोन मोठ्या चुका त्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे झाल्या, ज्याचे परिणाम काश्मीरला भोगावे लागले. सर्वात मोठी चूक म्हणजे जेव्हा आपले सैन्य जिंकत होते, तेव्हा पंजाब भागात पोहोचताच युद्धविराम लागू करण्यात आला आणि पाकव्याप्त काश्मीरचा जन्म झाला. जर युद्धविराम तीन दिवसांनी उशीर झाला असता, तर पाकव्याप्त काश्मीरचा भाग झाला असता. दुसरे म्हणजे हा मुद्दा यूएनमध्ये नेणं ही मोठी चूक झाल्याचे अमित शाह म्हणाले. 

'दूध का दूध और पानी का पानी'

भाजप नेत्यांच्या म्हणण्यानुसार, जर पंडीत नेहरु देशासाठी हानिकारक आहेत आणि तुम्ही (सरकार) देशासाठी फायदेशीर आहात, मग या विषयावर दिवसभर चर्चा व्हायला हवी. दूध का दूध आणि पानी का पानी होईल असे अधिरंजन चौधरी म्हणाले. यावर शाह म्हणाले, “मी कधीही असे म्हटले नाही की नेहरु देशासाठी हानिकारक आहेत. सत्ताधारी पक्षातील एकाही सदस्याने असे सांगितले नाही. काश्मीर समस्येच्या मूळ मुद्द्यावर चर्चा झाली पाहिजे, असे मी म्हटले आहे. याच्या मुळाशी कोण आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

महत्त्वाच्या बातम्या:

Amit Shah : आजच्या निकालांनी सिद्ध केलं जातीच्या राजकारणाचे दिवस संपलेत, अमित शाह यांचं विरोधकांवर टीकास्त्र 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Accident : नाशिकच्या भीषण अपघातात पाच जणांचा दुर्दैवी अंत, मंत्री गिरीश महाजनांनी घेतला मोठा निर्णय
नाशिकच्या भीषण अपघातात पाच जणांचा दुर्दैवी अंत, मंत्री गिरीश महाजनांनी घेतला मोठा निर्णय
IPO Update : शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स कोसळला पण स्टँडर्ड ग्लासचा आयपीओ लिस्ट होताच गुंतवणूकदारांची तगडी कमाई
शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स कोसळला पण स्टँडर्ड ग्लासचा आयपीओ लिस्ट होताच गुंतवणूकदारांची कमाई
Bhiwandi News: मूळव्याधाचा त्रास असह्य झाला, रोजच्या वेदनांनी जीव नकोसा, भिवंडीतील रिक्षाचालकाने आयुष्य संपवलं
मूळव्याधाचा त्रास असह्य झाला, रोजच्या वेदनांनी जीव नकोसा, भिवंडीतील रिक्षाचालकाने आयुष्य संपवलं
Girish Mahajan : नाशिकच्या भीषण अपघातातील मृतांचा आकडा 5 वर, 3 गंभीर; मंत्री गिरीश महाजनांकडून मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत
नाशिकच्या भीषण अपघातातील मृतांचा आकडा 5 वर; मंत्री गिरीश महाजनांकडून मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची शासकीय मदत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 13 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्सSanjay Raut Mumbai : मुख्य आरोपी मोकाट, ..त्यांचे बॉस मंत्रिमंडळात आहेत; बीड प्रकरणावर राऊत आक्रमकABP Majha Marathi News Headlines 10AMHeadlines 10AM 13 January 2025 सकाळी 10 च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Accident : नाशिकच्या भीषण अपघातात पाच जणांचा दुर्दैवी अंत, मंत्री गिरीश महाजनांनी घेतला मोठा निर्णय
नाशिकच्या भीषण अपघातात पाच जणांचा दुर्दैवी अंत, मंत्री गिरीश महाजनांनी घेतला मोठा निर्णय
IPO Update : शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स कोसळला पण स्टँडर्ड ग्लासचा आयपीओ लिस्ट होताच गुंतवणूकदारांची तगडी कमाई
शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स कोसळला पण स्टँडर्ड ग्लासचा आयपीओ लिस्ट होताच गुंतवणूकदारांची कमाई
Bhiwandi News: मूळव्याधाचा त्रास असह्य झाला, रोजच्या वेदनांनी जीव नकोसा, भिवंडीतील रिक्षाचालकाने आयुष्य संपवलं
मूळव्याधाचा त्रास असह्य झाला, रोजच्या वेदनांनी जीव नकोसा, भिवंडीतील रिक्षाचालकाने आयुष्य संपवलं
Girish Mahajan : नाशिकच्या भीषण अपघातातील मृतांचा आकडा 5 वर, 3 गंभीर; मंत्री गिरीश महाजनांकडून मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत
नाशिकच्या भीषण अपघातातील मृतांचा आकडा 5 वर; मंत्री गिरीश महाजनांकडून मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची शासकीय मदत
Nashik Crime : नाशिकमधील पोलीस अंमलदारास 'भाईगिरी' भोवली, पोलीस अधीक्षकांची मोठी कारवाई
नाशिकमधील पोलीस अंमलदारास 'भाईगिरी' भोवली, पोलीस अधीक्षकांची मोठी कारवाई
Yograj Singh : तेव्हा युवराजचा मृत्यू झाला असता, तरी त्याचा अभिमान वाटला असता, कपिल देवला गोळी घालायला गेलो होतो; 'सिक्सर किंग'च्या बापाची सनसनाटी मुलाखत!
तेव्हा युवराजचा मृत्यू झाला असता, तरी त्याचा अभिमान वाटला असता, कपिल देवला गोळी घालायला गेलो होतो; 'सिक्सर किंग'च्या बापाची सनसनाटी मुलाखत!
MAHARERA : स्वयंविनियामक संस्थांमधील 2 वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेले 'ते' प्रतिनिधी तातडीने बदलला, महारेराचे निर्देश, कारण समोर
स्वयंविनियामक संस्थांमधील 2 वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेले 'ते' प्रतिनिधी तातडीने बदलला, महारेराचे निर्देश, कारण समोर
Santosh Deshmukh Case: एसआयटीचा प्रमुख अन् दोन बड्या वकिलांची नावं सांगितली, मस्साजोगच्या गावकऱ्यांच्या 5 मागण्या, संक्रातीला टोकाचं पाऊल उचलण्याचा इशारा
एसआयटीचा प्रमुख अन् दोन बड्या वकिलांची नावं सांगितली, मस्साजोगच्या गावकऱ्यांच्या 5 मागण्या, संक्रातीला टोकाचं पाऊल उचलण्याचा इशारा
Embed widget