'माझे मार्गदर्शक, माझे हिरो, माझे वडील'; सायरस पुनावाला यांना पद्मभूषण जाहीर झाल्यानंतर अदर पुनावालांची भावनिक पोस्ट
अदर पुनावाला (Adar Poonawalla) यांनी खास पोस्ट शेअर केली आहे.
Adar Poonawalla, Cyrus Poonawala : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सायरस पुनावाला (Cyrus Poonawala) यांचं कोरोनाकाळातलं काम आणि वॅक्सिन निर्मीतीतील योगदान यासाठी त्यांना पद्मभूषण पुरस्कर जाहीर करण्यात आला आहे. पुरस्कर जाहीर झाल्यानंतर सायरस पुनावाला यांच्या मुलाने म्हणजेच अदर पुनावाला (Adar Poonawalla) यांनी खास पोस्ट शेअर केली.
अदर पुनावाला यांची पोस्ट
अदर पुनावाला यांनी शेअर केलेल्या पोस्टमधून या वर्षी ज्यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं अशा व्यक्तींना शुभेच्छा दिल्या. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले, 'पद्मभूषण पुरस्कारनं गौरवण्यात आलेल्या सर्व व्यक्तींचे मनःपूर्वक अभिनंदन. माझे गुरू, माझे हीरो, माझे वडील डॉ. सायरस पुनावाला यांचा गौरव केल्याबद्दल मी भारत सरकारचे आभार मानतो.' अदर पुनावाला यांनी ही पोस्ट शेअर करून एक खास फोटो देखील शेअर केला आहे. या फोटोमध्ये सायरस पुनावाला, अदर पुनावाला आणि विलू सायरस पुनावाला हे दिसत आहेत.
View this post on Instagram
1941 मध्ये पुण्यात राहणाऱ्या पारशी कुटुंबामध्ये सायरस पुनावाला यांचा जन्म झाला. सायरस पुनावाला यांचे वडील सोली ए. पुनावाला आणि माता गुल पुनावाला हे घोड्यांचा व्यापार करत होते. सायरस पूनावाला यांनी त्यांचे सुरुवातीचे शिक्षण पुण्यातील द बिशप स्कूल येथून पूर्ण केले आणि बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्समधून पुढील शिक्षण घेतले. 1966 मध्ये सायरस पूनावाला यांनी "सीराम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया" नावाची कंपनी सुरू केली.
महत्त्वाच्या बातम्या:
Padma Awards : प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण तर सुलोचना चव्हाण यांना पद्मश्री, महाराष्ट्रातील 10 जणांचा पद्म पुरस्काराने गौरव
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha