एक्स्प्लोर

Adar Poonawalla : 'रविवारी माझ्या बायकोला माझ्याकडे पाहत बसायला आवडते', 90 तासांच्या कामाच्या वादात अदर पुनावालांची उडी

SN Subrahmanyan 90 Hour Work Week : कामाच्या तासांपेक्षा त्याची गुणवत्ता महत्त्वाची असते असं उद्योगपती अदर पुनावाला यांनी म्हटलं. एसएन सुब्रमण्यन यांच्या एका वक्तव्यावरून यावरून हा वाद सुरू झाला.

Adar Poonawalla : लार्सन अँड टुब्रोचे अध्यक्ष एसएन सुब्रह्मण्यन यांनी 90 तास काम करण्याचं आवाहन केलं होतं. कॉर्पोरेट प्रमुखांनी अशा प्रकारचं वक्तव्य केल्यामुळे देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. सोशल मीडियावर '90 तास' हा ट्रेंड सुरु असतानाच यात उद्योगपती अदर पुनावाल्यांनी उडी घेतलीय. त्यांनी एसएन सुब्रह्मण्यन यांच्या वक्तव्याला विरोध केला आणि आनंद महिंद्रा यांचे समर्थन केलं. रविवारी माझ्या बायकोला माझ्याकडे पाहायला आवडतं असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. कामाच्या तासांपेक्षा कामाचा दर्जा महत्त्वाचा आहे असंही ते म्हणाले. 

अदर पुनावाला म्हणाले की, "होय आनंद महिंद्रा, अगदी माझी पत्नी एन पूनावालांना देखील मी शानदार वाटतो. त्यामुळे तिला रविवारी माझ्याकडे पाहणे आवडते. कामाच्या तासापेक्षा कामाची गुणवत्ता नेहमीच महत्त्वाचे असते."

कर्मचाऱ्यांनी 90 तास काम करण्याचं आवाहन

भारतात कर्मचाऱ्यांनी आठवड्याला 90 तास काम करायला हवं असा सल्ला लार्सन अँड टुब्रोचे चेअरमन एस.एन.सुब्रमण्यम यांनी दिला. खरं तर कर्मचाऱ्यांनी रविवारीही कामावर जायला हवं असं एल अँड टीच्या कर्मचाऱ्यांशी बोलताना सुब्रमण्यम यांनी सांगितलं. रविवारी घरी बसून काय करता? असा सवालही त्यांनी विचारलाय.

एस.एन.सुब्रमण्यम म्हणाले की, "तुम्हा कर्मचाऱ्यांना रविवारीही कामावर बोलवू शकत नाही याचा मला खेद वाटतो. म्हाला रविवारीही बोलवू शकलो तर मला खूप आनंद होईल,कारण मीही रविवारी काम करतो. र्मचारी रविवारी घरी बसून काय करतात? किती वेळ बायकोकडे बघत बसणार? ती तरी तुमच्याकडं किती वेळ बघत बसेल? ला रविवारीही कामावर जाऊ.

आनंद महिंद्रांचे प्रत्युत्तर

एस.एन.सुब्रमण्यम यांच्या या आवाहनानंतर त्यावर उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी प्रतिक्रिया दिली. माझी बायको खूप सुंदर असल्याने मा तिच्याकडे बघत बसायला आवडते असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. ते म्हणाले की, "मी नारायण मूर्ती आणि इतरांचा आदर करतो. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याबाबत मला चुकीचे समजू नका. पण मला वाटते, ही चर्चा चुकीच्या दिशेला जात आहे. कामाच्या दर्जावर आपण अधिक चर्चा करायला हवी. त्यामुळे 40 की 48 किंवा 70 की 90 तास केले, हे महत्त्वाचे नाही. तुम्ही 10 तास चांगले काम करू शकत असाल तर त्यातूनही जग बदलता येते."

बॉलीवूड स्टार दिपीका पदुकोननेही या विधानाचा विरोध केला. ती म्हणाले की, "एवढ्या मोठ्या पदावर बसलेले लोक असं बोलतात हे धक्कादायक आहे. मानसिक आरोग्य खूप महत्वाचं आहे."

याआधी इन्फोसिसचे चेअरमन नारायण मूर्ती यांनी 70 तास कामाचा सल्ला दिला होता. त्यानंतर आता एल अँड टी चे चेअरमन एस.एन.सुब्रमण्यम यांनी 90 तास काम करण्याचा सल्ला दिला. 

दरम्यान, एकीकडे सुब्रमण्यम यांच्या या वक्तव्यावर टीका होत असताना दुसरीकडे मात्र टेस्लाचे इलॉन मस्क यांनी देखील काही दिवसांपूर्वी 80 ते 100 तास काम केल्यानं यश मिळण्याची शक्यता वाढते असं म्हटलं होतं. बॉम्बे शेव्हिंग कंपनीचे सीईओ शंतनू देशपांडे आणि झेप्टोचे सीईओ आदित पलिचा यांनी देखील अधिक तास कामासाठी वेळ घालवण्याचा सल्ला दिला होता. 

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhajinagar ZP Result: अब्दुल सत्तारांचे चिरंजीव जिल्हा परिषदेच्या आखाड्यात विजयी; अंभई गटातून भाजपच्या उमेदवाराला पाडलं
अब्दुल सत्तारांचे चिरंजीव जिल्हा परिषदेच्या आखाड्यात विजयी; अंभई गटातून भाजपच्या उमेदवाराला पाडलं
मोहिते पाटलांसाठी कही खुशी कही गम, माळशिरसमध्ये अर्जुनसिंहांचा जिल्हा परिषदेवर विजय, पण...
मोहिते पाटलांसाठी कही खुशी कही गम, माळशिरसमध्ये अर्जुनसिंहांचा जिल्हा परिषदेवर विजय, पण...
ZP Election Result 2026: भाजप नंबर 1, शिंदे गटही शंभरी पार; जिल्हा परिषदेतील 500 जागांचा चक्रावणारा निकाल, कुणाला किती जागा?
भाजप नंबर 1, शिंदे गटही शंभरी पार; जिल्हा परिषदेतील 500 जागांचा चक्रावणारा निकाल, कुणाला किती जागा?
Vaibhavwadi Panchayat Samiti Election Result 2026: वैभववाडी पंचायत समितीवर नितेश राणेंचे वर्चस्व, भाजपने सर्व जागांवर उधळला विजयाचा गुलाल, PHOTO
वैभववाडी पंचायत समितीवर नितेश राणेंचे वर्चस्व, भाजपने सर्व जागांवर उधळला विजयाचा गुलाल, PHOTO

व्हिडीओ

Bharat Gogawale On Vikas Gogawale : भरतशेठला कुणीही हरवू शकत नाही, मुलाच्या विजयावर प्रतिक्रिया
ZP BJP Result : 731 पैकी 319 कल-निकाल हाती, निकालांमध्ये भाजपची शंभरी
Uddhav Thackeray Special Report : संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना साकडं, ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर?
Ritu Tawde Special Report : रितू तावडेंच्या 'त्या' वक्तव्यावरुन राजकीय वातावरण तापलं, राऊतांची टीका
Ajit Pawar Accident : अजितदादांच्या अपघाताबाबत डीजीसीए अहवालातून शंकांचं समाधान होणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhajinagar ZP Result: अब्दुल सत्तारांचे चिरंजीव जिल्हा परिषदेच्या आखाड्यात विजयी; अंभई गटातून भाजपच्या उमेदवाराला पाडलं
अब्दुल सत्तारांचे चिरंजीव जिल्हा परिषदेच्या आखाड्यात विजयी; अंभई गटातून भाजपच्या उमेदवाराला पाडलं
मोहिते पाटलांसाठी कही खुशी कही गम, माळशिरसमध्ये अर्जुनसिंहांचा जिल्हा परिषदेवर विजय, पण...
मोहिते पाटलांसाठी कही खुशी कही गम, माळशिरसमध्ये अर्जुनसिंहांचा जिल्हा परिषदेवर विजय, पण...
ZP Election Result 2026: भाजप नंबर 1, शिंदे गटही शंभरी पार; जिल्हा परिषदेतील 500 जागांचा चक्रावणारा निकाल, कुणाला किती जागा?
भाजप नंबर 1, शिंदे गटही शंभरी पार; जिल्हा परिषदेतील 500 जागांचा चक्रावणारा निकाल, कुणाला किती जागा?
Vaibhavwadi Panchayat Samiti Election Result 2026: वैभववाडी पंचायत समितीवर नितेश राणेंचे वर्चस्व, भाजपने सर्व जागांवर उधळला विजयाचा गुलाल, PHOTO
वैभववाडी पंचायत समितीवर नितेश राणेंचे वर्चस्व, भाजपने सर्व जागांवर उधळला विजयाचा गुलाल, PHOTO
धाराशिवात एका मताने उलटली सत्ता!  ढोकी पंचायत समितीत ठाकरे गटाने भाजपकडून विजय खेचून आणला, फक्त एका मताने भाजपचा पराभव
धाराशिवात एका मताने उलटली सत्ता!  ढोकी पंचायत समितीत ठाकरे गटाने भाजपकडून विजय खेचून आणला, फक्त एका मताने भाजपचा पराभव
Satara ZP Election Result 2026 : साताऱ्यात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेनं खातं उघडलं, शंभूराज देसाईंचा तारळे जिल्हा परिषद गटात विजयाचा झेंडा, मकरंद पाटील यांना तळदेवमध्ये धक्का
साताऱ्यात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेनं खातं उघडलं, शंभूराज देसाईंनी तारळेचा गड जिंकला, लिंबमध्ये भाजप विजयी
आम्ही फक्त झेंडाच घ्यायचा का? म्हणत ऐन निवडणुकीत मुश्रीफांची साथ सोडलेल्या शीतल फराकटेंना पराभवाचा धक्का; कागलात मंडलिक गटाचे पानिपत, गगनबावड्यात सतेज पाटलांचे वर्चस्व कायम
आम्ही फक्त झेंडाच घ्यायचा का? म्हणत ऐन निवडणुकीत मुश्रीफांची साथ सोडलेल्या शीतल फराकटेंना पराभवाचा धक्का; कागलात मंडलिक गटाचे पानिपत, गगनबावड्यात सतेज पाटलांचे वर्चस्व कायम
मोठी बातमी! भाजप नेत्याला धक्का, माजी मंत्री सुरेश वरपूडकरांची घराणेशाही जनतेनं नाकारली; कुटुंबातील 5 पैकी 4 पराभूत
मोठी बातमी! भाजप नेत्याला धक्का, माजी मंत्री सुरेश वरपूडकरांची घराणेशाही जनतेनं नाकारली; कुटुंबातील 5 पैकी 4 पराभूत
Embed widget