एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बाळांच्या स्तनपानासाठी विधानसभेत खोली उभारा, महिला आमदाराची मागणी
हे प्रकरण आसामचं आहे. अंगूरलता एकेकाळी आसाम मनोरंजन विश्वातील एक ओळखीचा चेहरा आहे. 2015 मध्ये त्यांनी भाजपच्या तिकीटावर विधानसभा निवडणूक लढवली होती.
दिसपूर : अंगूरलता डेका हे नाव सध्या जोरदार चर्चेत आहे. अंगूरलता कोण आहे आणि चर्चेचं कारण काय आहे हे जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो. अंगूरलता एक अभिनेत्री आणि आमदार आहेत. विधानसभेत स्तनपान खोलीची व्यवस्थ करावी, अशी मागणी त्यांनी नुकतीच केली आहे.
हे प्रकरण आसामचं आहे. अंगूरलता एकेकाळी आसाम मनोरंजन विश्वातील एक ओळखीचा चेहरा आहे. 2015 मध्ये त्यांनी भाजपच्या तिकीटावर विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा विजय झाला होता. आसामच्या बतद्रोवा विधानसभा मतदारसंघातून त्या आमदार बनल्या.
मागील महिन्यात 3 ऑगस्टला अंगूरलता यांनी मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर विधानसभेत आल्यावर त्यांना फार अडचणी आल्या. याला कारण होतं ब्रेस्ट फीडिंग अर्थात स्तनपान. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी सांगितलं की, "मला प्रत्येक तासाला माझ्या एक महिन्याच्या मुलीला दूध पाजण्यासाठी घरी जावं लागतं. यामुळे विधानसभेत होणाऱ्या चर्चेत पूर्णत: सहभागी होता येत नाही."
ही अडचण दूर करण्यासाठी त्यांनी विधानसभेत बाळांना दूध पाजण्यासाठी एक स्वतंत्र खोली बनवण्याची मागणी केली आहे. "इतकंच नाही तर सरकारी आणि बिगर सरकारी संस्थांमध्ये काम करणाऱ्या महिलांसाठीही अशाप्रकारच्या विशेष खोलीची व्यवस्था करण्यात यावी," असंही त्या म्हणाल्या.
ऑस्ट्रेलियन खासदाराचं संसदेत स्तनपान
काही महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियामध्येही स्तनपानाचा मुद्दा फार चर्चेत होता. ऑस्ट्रेलियाच्या खासदार लॉरिसा वॉटर्स यांनी संसदेच्या सभागृहातच आपल्या नवजात बाळाला दूध पाजून इतिहास रचला होता. खरंतर ऑस्ट्रेलियाचा कायदा एखाद्या आईला आपल्या बाळाला कोणत्याही ठिकाणी दूध पाजण्याची परवानगी देतो. संसदेत नवजात बाळाला आणून स्तनपान करणाऱ्या खासदार लॉरिसा वॉटर्स पहिल्या महिला बनल्या.
कोण आहे अंगूरलता डेका?
अंगूरलता डेका यांनी आसामच्या मोबाईल थिएटरसाठी पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनजीर भुट्टो यांची भूमिका साकारली होती. यानंतर त्यांनी अनेक चित्रपटही केले. अंगूरलता सुमारे आठ वर्ष आसाममधील लोकप्रिय अभिनेत्री होत्या.
आसाम इंटरटेन्मेंट इंडस्ट्रीचे प्रसिद्ध अभिनेता आकाशदीपसोबत अंगूरलता यांनी लग्न केलं. आकाशदीप यांनीच अंगूरलता यांना राजकारणात येण्यासाठी प्रोत्साहन दिलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement