एक्स्प्लोर

पुलवामाचा बदला : पंतप्रधान मोदी कारवाईवेळी स्वतः अॅक्शन रुममध्ये हजर, असा ठरला अॅक्शन प्लॅन

यामध्ये 325 अतिरेकी आणि त्यांना प्रशिक्षण देणारे 25 प्रशिक्षक अशा एकूण 350 जणांचा खात्मा केला आहे. यामध्ये जैशचा म्होरक्या मसूद अजहरचा मेहुणा युसुफ अजहरचाही खात्मा झाला आहे.

नवी दिल्ली : पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाल्यानंतर भारताने कडक पावले उचलत पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे अड्डे नेस्तनाबूत केले. विशेष म्हणजे हा हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निगराणीखाली केला गेला. पंतप्रधान मोदी कारवाईवेळी स्वतः अॅक्शन रुममध्ये हजर होते,  अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. भारताने पाकिस्तानमध्ये केलेल्या या हवाईहल्ल्यात 350 दहशतवादी ठार झाले आहेत. यामध्ये 325 अतिरेकी आणि त्यांना प्रशिक्षण देणारे 25 प्रशिक्षक अशा एकूण 350 जणांचा खात्मा केला आहे. यामध्ये जैशचा म्होरक्या मसूद अजहरचा मेहुणा युसुफ अजहरचाही खात्मा झाला आहे. असा ठरला अॅक्शन प्लॅन पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः या हल्ल्याच्या वेळी अॅक्शन रुममध्ये उपस्थित होते. सूत्रांच्या मते दहशतवाद्यांचा बदला घेण्यासाठी संरक्षण मंत्र्यांना काही विकल्प दिले होते. यानंतर लष्कर आणि वायुसेनेने एलओसीजवळ हवाई पाहणी केली. यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला. या ड्रोन द्वारे दहशतवाद्यांच्या कॅम्पला निशाणा बनविण्यात आले. या अड्ड्यांची माहिती २०-१२ फेब्रुवारीलाच घेतली होती. मुख्य हल्ला करताना सर्वप्रथम रिफ्युलर टॅंकद्वारे ट्रायल उड्डाण घेतले गेले. मुख्य हल्ला केला त्यावेळी  वायुसेनेने लेजर गायडेड बॉम्बचा वापर केला. पुलवामाचा बदला : ऐकले नाही म्हणून ठोकले, परराष्ट्र मंत्रालयाकडून कारवाईला दुजोरा   पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला जोरदार तडाखा दिला आहे. भारताच्या 12 मिराज-2000 विमानांनी पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे नेस्तनाबूत केले. या कारवाईत अनेक अतिरेकी आणि जैशचे कमांडर ठार झाले आहेत, अशी माहिती परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी दिली आहे. पुलवामामध्ये 14 फेब्रुवारीला हल्ला केला होता. पाकिस्तानला अतिरेक्याविरोधात पुरावे देऊन आणि वारंवार सांगूनही हात वर केले, असेही ते म्हणाले. जैश आणखी हल्ल्याच्या तयारीत होता. अजहरवर कारवाई करण्याची अनेकदा मागणी केली. मात्र पाकने काही पावले उचलली नाहीत. काल रात्री भारतीय वायुदलाने बालकोटमधील जैशच्या अड्ड्यांवर हल्ला केला. हा हल्ला ट्रेनिंग कॅम्पवरच केला. हा कॅम्प मौलाना युसूफ अझर चालवत होता. युसूफ अझर हा मसूद अझरचा नातेवाईक होता, असे गोखले म्हणाले. सैन्याने सामान्य पाकिस्तानी नागरिकांना त्रास होऊ दिला नाही. फक्त दहशतवाद्यांचे अड्डे मिराजच्या रडारवर होते, असे गोखलेंनी सांगितले. पुलवामा हल्ल्यानंतर भारताचा पाकिस्तानला जोरदार तडाखा पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला जोरदार तडाखा दिला आहे. भारताच्या 12 मिराज-2000 विमानांनी पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे नेस्तनाबूत केले. या एअर स्ट्राईकने भारताने दुसरा सर्जिकल स्ट्राईक केला आहे. भारताने आज पहाटे पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ला केल्यानंतर पाकिस्तान घाबरला आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी लष्करी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली.   या कारवाईत भारताने आपल्या मिराज-2000 या विमानांचा वापर केला आहे. मिराज-2000 विमान शक्तिशाली लढाऊ विमान आहे. या विमानांद्वारे एका तडाख्यात शत्रूंच्या अड्ड्यांना नेस्तनाबूत करून टाकण्याची शक्ती असते. संबंधित बातम्या भारताचा पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांवर हवाई हल्ला, जैशचे अड्डे उध्वस्त   भारताने पाकिस्तानात घुसून केलेल्या एअर स्ट्राईकचा व्हिडीओ व्हायरल पाकिस्तानला दणका दिल्यावर भारतीय लष्कराने ट्वीट केली 'ही' कविता पुलवामाचा बदला : पाकिस्तान घाबरला, पाक सरकारने लष्करी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली  'मिराज' ने पाकिस्तानला हादरवले, याआधीही पाकला पाणी पाजले होते, काय आहे मिराज -2000 विमान
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पोलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पोलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पोलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पोलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
Maharashtra Vidhan Sabha Exit Poll 2024: महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकालाची शक्यता, राज्यातील या 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकाल? राज्यातील 'या' 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
Embed widget