Janmashtami 2022 : मथुरेत जन्माष्टमी उत्सवावेळी बांके बिहारी मंदिरात चेंगराचेंगरी, दोन भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
Banke Bihari Mandir : मथुरेमधील प्रसिद्ध बांके बिहारी मंदिरात जन्माष्टमी उत्सवावेळी दुर्घटना घडली आहे. चेंगराचेंगरीत दोन जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.
Banke Bihari Mandir Stampede : कृष्णनगरी मथुरेमध्ये (Mathura) जन्माष्टमी (Janmashtami) उत्सवावेळी मोठी दुर्घटना घडली आहे. वृंदावन (Vrindavan) येथील प्रसिद्ध बांके बिहारी मंदिरात (Banke Bihari Mandir) जन्माष्टमी उत्सवावेळी दुर्घटना घडली आहे. जन्माष्टमी उत्सवावेळी बांके बिहारी मंदिरात चेंगराचेंगरीची (Mathura Stampede) दुर्घटना घडली. या दुर्घटनेत दोन भाविकांचा मृत्यू झाला असून, अनेक भक्तगण जखमी झाले आहेत. बांके बिहारी मंदिरात मंगला आरती दरम्यान ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मंगला आरतीच्या वेळी चेंगराचेंगरी
वृंदावनमध्ये जन्माष्टमीचा मोठा उत्सव साजरा केला जातो. भारतासह जगभरातील भाविक आणि पर्यटक येथे दाखल होत असतात. उत्तर प्रदेशच्या मथुरेमध्ये यंदाही श्रीकृष्ण जन्माचा उत्सव साजरा केला गेला. बांके बिहारी मंदिरात जन्माष्टमीमुळे लाखोंची गर्दी होती. बांके बिहारी मंदिरात पहाटे चार वाजता मंगला आरती केली जाते. जन्माष्टमीवेळी मंगला आरती सुरु असताना चेंगराचेंगरी होऊन दुर्घटना घडली. यामध्ये दोन भाविकांचा मृत्यू झालाय. तसेच अनेक जण जखमी झाले आहेत.
वृंदावनमधील सर्व मंदिरांमध्ये मोठी गर्दी
वृंदावनच्या बांके बिहारी मंदिरात देश-विदेशातील भाविकांची गर्दी नेहमीच असते, मात्र जन्माष्टमीवेळी ही गर्दी वाढते. जन्माष्टमीच्या दिवशी मथुरेमधील 84 किलोमीटरमध्ये असलेल्या सर्व मंदिरांमध्ये प्रचंड गर्दी असते. यंदा जन्माष्टमी साजरी करण्यासाठी सुमारे 50 लाख भाविक मथुरेत पोहोचले होते, ही संख्या परिसराच्या क्षमतेपेक्षा मोठी आहे. सध्या या अपघाताबाबत प्रशासनाकडून कोणतही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
भाविकांना फूटपाथवर झोपून काढावी लागते रात्र
यंदाही जन्माष्टमीच्या वेळी मथुरा-वृंदावनमधील सर्व हॉटेल-लॉज आणि आश्रम भाविकांनी फुललेले पाहायला मिळाले. जन्माष्टमी साजरी करण्यासाठी लाखो लोक आले होते. जागा न मिळाल्याने अनेकांनी फुटपाथवर झोपूनही रात्र काढली. संपूर्ण सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं. शुक्रवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही मथुरेत जाऊन श्रीकृष्णाची पूजा केली, त्यामुळे अनेक लोक मथुरेतही पोहोचले.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- मुंबईत 111, तर ठाण्यात 37 गोविंदा जखमी; काल दिवसभरात 88 गोविंदांवर उपचार करुन डिस्चार्ज
- रात्री साडेअकरा वाजता मुख्यमंत्री चक्क बोटीनं डोंबिवलीत, दहीहंडी उत्सवाला हजेरी; म्हणाले...