एक्स्प्लोर

संभाजीनगर हादरले ! गल्लीत अपरात्री आलेल्या तरुणाला हरकलं,  राग मनात धरला, पोरं बोलवली अन्  क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं ..

Crime News: याप्रकरणी सात जणांविरुद्ध कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी पाच जणांना अटक करण्यात आली आहे .

Chhtrapati Sambhajinagar Crime: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वारंवार गुन्हेगारी घटना समोर येत आहेत . मारहाण, ड्रग सत्र, किरकोळ कारणावरून होणारे खून असे अनेक प्रकार घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार होत आहे .दरम्यान, छत्रपती संभाजीनगरच्या कन्नडमध्ये नागद गावात मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास निर्घृण हत्येच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे .(Crime News) किरकोळ कारणावरून गावातील 25 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आलाय .शुभम रणवीर सिंह राजपूत असे मृत तरुणाचे नाव आहे . गल्लीत अपरात्री आलेल्या तरुणाला हटकल्याचा राग मनात धरून मुख्य आरोपीने पोरं गोळा करत तरुणाला धारदार शस्त्राने हल्ला करत संपवले .याप्रकरणी सात जणांविरुद्ध कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी पाच जणांना अटक करण्यात आली आहे .दोन आरोपी फरार आहेत .

नेमके घडले काय ?

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री शुभम हा ग्रामपंचायतीकडे जाणाऱ्या रस्त्याने जात असताना डीपीजवळ काही तरुणांनी त्याच्यावर हल्ला चढवला. अमोल दशरथ निकम, सचिन दशरथ निकम, शंकर दशरथ निकम, ऋषी गोविंद निकम, अविनाश गोविंद निकम, बंडू शिवसिंह राजपूत आणि सतीश संतोष राजपूत अशी आरोपींची नावे आहेत. या सात जणांविरुद्ध कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. तर दोन आरोपी घटनेनंतर फरार आहेत

मुख्य आरोपी अमोल निकम हा रात्री उशिरा गल्लीत येऊन एका व्यक्तीकडे थांबत असे. त्यामुळे परिसरातील रहिवाशांना त्रास होत असल्याची तक्रार शुभमने केली होती. त्याचप्रमाणे त्याने अमोलला यापूर्वीही हटकले होते. याच गोष्टीचा राग मनात धरून अमोल आणि त्याच्या सहकाऱ्यांनी शुभमला धडा शिकवायचा ठरवले. मंगळवारी रात्री शुभम गावातील रस्त्याने जात असताना अमोल आणि इतरांनी त्याला अडवून धारदार शस्त्राने मानेवर आणि शरीरावर वार केले. रक्ताच्या थारोळ्यात शुभम कोसळला आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच कन्नड ग्रामीण पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर नागद परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून गावात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

संभाजीनगरमध्ये रक्तरंजित थरार !

छत्रपती संभाजीनगरच्या एसएफएस स्कूलच्या मैदानाजवळ मंगळवारी रात्री उशिरा दोन मित्रांमधील सुरू असलेल्या ड्रग्सच्या देवाणघेवाणीतून एका मित्राने दुसऱ्याचा गळा चिरून हत्या केल्याची घटना समोर आली .घटना घडल्यानंतर 24 तासांच्या आत गुन्हे शाखेने आरोपीला अटक केली आहे .पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत व्यक्ती आणि आरोपी सचिन /जंगली जाधव हे मंगळवारी रात्री एस एफ एस शाळेजवळील मोकळ्या मैदानात दारू पिण्यासाठी गेले होते .एका महिलेवरून अचानक त्यांच्यात वाद झाला .शाब्दिक वादाचं रूपांतर हाणामारीत झालं .यातच आरोपीने चाकूने वार करत तरुणाला संपवले व तो घटनास्थळावरून पळून गेला .या घटनेमुळे परिसरात घबराट निर्माण झाली आहे .

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli Century : किंग कोहलीचं शतक अन् रांचीत गोंधळ! चाहता भर मैदानात धावत सुटला, विराटच्या सेलिब्रेशनवेळी नेमकं काय घडलं?
किंग कोहलीचं शतक अन् रांचीत गोंधळ! चाहता भर मैदानात धावत सुटला, विराटच्या सेलिब्रेशनवेळी नेमकं काय घडलं?
Nanded Crime Love Story: सक्षमचा मेंदू डोक्यातून बाहेर आला होता, बाजूला रक्ताने भरलेला फरशीचा तुकडा; आईचा अंगावर शहारे आणणारा जबाब
सक्षमचा मेंदू डोक्यातून बाहेर आला होता, बाजूला रक्ताने भरलेला फरशीचा तुकडा; आईचा अंगावर शहारे आणणारा जबाब
मला आज इथं मत मागताना आनंद होतोय; गुवाहटीफेम शहाजी बापूंच्या सांगोल्यात असं का म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस
मला आज इथं मत मागताना आनंद होतोय; गुवाहटीफेम शहाजी बापूंच्या सांगोल्यात असं का म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस
नगरपालिकेच्या मतदानादिवशी कामगारांना सुट्टी न दिल्यास कारवाई; काय सांगतो लोकप्रतिनिधित्व कायदा?
नगरपालिकेच्या मतदानादिवशी कामगारांना सुट्टी न दिल्यास कारवाई; काय सांगतो लोकप्रतिनिधित्व कायदा?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahayuti clash: महायुतीमध्ये अंतर्गत नाराजी, दिल्लीच्या बैठकीला अजितदादांच्या खासदारांची गैरहजेरी
Eknath khadse : राष्ट्रवादीचा प्रचार करताना भाजपला मतदान करण्याचं खडसेंकडून आवाहन
Mahebub Shaikh on Jaykumar Gore : जयकुमार गोरेंचे नाव गोरे आणि काम काळे, महेबूब शेख यांची टीका
Bhaskar Jadhav vs Vinayak Raut : भास्कर जाधव - विनायक राऊतांमध्ये संघर्ष, रत्नागिरीत नाराजीनाट्य
Maharashtra Local Body Election : बारामती, महाबळेश्वर, फलटणची निवडणूक पुढे ढकलली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli Century : किंग कोहलीचं शतक अन् रांचीत गोंधळ! चाहता भर मैदानात धावत सुटला, विराटच्या सेलिब्रेशनवेळी नेमकं काय घडलं?
किंग कोहलीचं शतक अन् रांचीत गोंधळ! चाहता भर मैदानात धावत सुटला, विराटच्या सेलिब्रेशनवेळी नेमकं काय घडलं?
Nanded Crime Love Story: सक्षमचा मेंदू डोक्यातून बाहेर आला होता, बाजूला रक्ताने भरलेला फरशीचा तुकडा; आईचा अंगावर शहारे आणणारा जबाब
सक्षमचा मेंदू डोक्यातून बाहेर आला होता, बाजूला रक्ताने भरलेला फरशीचा तुकडा; आईचा अंगावर शहारे आणणारा जबाब
मला आज इथं मत मागताना आनंद होतोय; गुवाहटीफेम शहाजी बापूंच्या सांगोल्यात असं का म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस
मला आज इथं मत मागताना आनंद होतोय; गुवाहटीफेम शहाजी बापूंच्या सांगोल्यात असं का म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस
नगरपालिकेच्या मतदानादिवशी कामगारांना सुट्टी न दिल्यास कारवाई; काय सांगतो लोकप्रतिनिधित्व कायदा?
नगरपालिकेच्या मतदानादिवशी कामगारांना सुट्टी न दिल्यास कारवाई; काय सांगतो लोकप्रतिनिधित्व कायदा?
नगरपालिका निवडणुकीत भाजप 175 जागांवर नगराध्यक्षपद जिंकेल, भाजपचा अंतर्गत सर्व्हे काय सांगतो, कोण मोठा भाऊ?
नगरपालिका निवडणुकीत भाजप 175 जागांवर नगराध्यक्षपद जिंकेल, भाजपचा अंतर्गत सर्व्हे काय सांगतो, कोण मोठा भाऊ?
Mumbai News : प्रभादेवीत शाखेसमोरील शेड उभारणीवरुन राडा, समाधान सरवणकर आणि स्थानिकांमध्ये वाद, हेल्मेटनं मारामारीचा व्हिडिओ समोर
प्रभादेवीत शाखेसमोरील शेड उभारणीवरुन राडा, समाधान सरवणकर आणि स्थानिकांमध्ये वाद, हेल्मेटनं मारामारीचा व्हिडिओ समोर
पुण्यातील पंचतारांकीत हॉटेल उडवून देण्याची धमकी; पोलिसांची धावाधाव, कॉल करणाऱ्याला अटक
पुण्यातील पंचतारांकीत हॉटेल उडवून देण्याची धमकी; पोलिसांची धावाधाव, कॉल करणाऱ्याला अटक
फिल्मी स्टाईल थरार! लग्न सुरु असतानाच नवरदेवाच्या मानेत गोळी घातली, नवरीसमोर क्षणात रक्ताच्या थारोळ्यात पडला
फिल्मी स्टाईल थरार! लग्न सुरु असतानाच नवरदेवाच्या मानेत गोळी घातली, नवरीसमोर क्षणात रक्ताच्या थारोळ्यात पडला
Embed widget